Skip to main content

व्योमक्षेमं वहाम्यहम्

लेखक हेरंब यांनी गुरुवार, 08/05/2008 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
'मिपा' च्या वाचकांना 'प्रेमाची गोष्ट' वर लिहिलेले आवडले, म्हणून अजुन एक प्रायोगिक नाटक पाहिले होते, त्यावरचे लिखाण पाठवत आहे. आमची प्रायोगिक नाटकांची आवड तशी खूप जुनी. अगदी छबिलदास चळवळीपासून. त्यामुळे ,प्रायोगिक नाटक लागले की पाय तिथे आपोआप वळणारच! कधी फजितीही होते, सगळं डोक्यावरुन जातं. मग डोक्याला ताप. ह्याला विचार, त्याला विचार, असं चालतं, आपण इतके निर्बुद्ध कसे असे वाटून स्वतःचाच राग येतो. तरी पुढली वारी काही चुकत नाही. दहा नाटके डोक्यावरुन गेली तरी चालेल, पण एखादंच असं आनंद देऊन जातं की बस! 'अमृता सुभाष' , ही एक अत्यंत हुशार अभिनेत्री!

प्रेमाची स॑ध्याकाळ

लेखक शितल यांनी गुरुवार, 08/05/2008 01:58 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्राच्या उसळणार्‍या लाटा दगडावर येऊन आटपत होत्या आणि किनार्‍यावर बसुन दोघेही अस्ताला जाणार्‍या सुर्याकडे शुन्य नजरने पाहात होते, दोघा॑च्याही मनात प्रच॑ड विचारा॑चे थैमान, तीच्या डोळ्यातुन अश्रू ओघळुन सतत गालावर येत होते पण ते पुसावेसे ही तीला वाटत नव्हते, त्याची ही अवस्था काही वेगळी नव्हती, मुक हु॑दका आवरुण तीच्याकडे पाहणे ही त्याला अवघड जात होते,ह्या सुर्यास्ता बरोबर आपले असलेले प्रेमाचे, मैत्रीचे नाते ही अस्त पावणार आणि हातातुन वाळु निसटुन गेल्यावर हाताला थोडी वाळु चिटकुन रहावी अशा आता फक्त आठवणी दोघ्या॑च्याही मनात राहतील, त्याला पुर्वीचे दिवस आठवायला लागले, आणि चेहर्‍यावर एक म॑

(कधी)

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 08/05/2008 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद फणसे यांची कधी  ही कविता वाचून आम्हाला आम्ही कधी कधी काय काय कारतो ते आठवलं

"ही" कधी, तर "ती" कधी चालते "तीही" कधी
काय सांगावे तुम्हा शुद्धित असतो मी  कधी ?

रोजचा माझाच मी ठरवला कोटा तिचा
टाकतो सोडा कधी, टाकतो पाणी कधी

संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी
चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी

ती कधी नसलीच तर मार्ग मी हा काढतो
खूप येतो वास पण चालते फेणी कधी

हा निरागस चेहरा, हासता मनमोकळे

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीत अमराठी योगदान

लेखक अजय यांनी बुधवार, 07/05/2008 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
राज ठाकरेंनी मराठीचा कैवार घेऊन शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणानंतर, अनेक मराठी प्रेमी शब्दांचे फुलोरे आणि भावनांचे अंगार ठिकठिकाणी लाह्यांसारखे फुलवताहेत. अमराठी माणसांना परप्रांतिय म्हणून वेगळी ओळख (?) दिली जात आहे. पण, मराठी भाषकांच्या संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी परप्रांतीय (आजच्या भाषेत) म्हणवल्या जाणाऱ्यांनीही सक्रीय सहभाग घेतला होता. आपापल्या परिने बलिदानही दिले होते. याची माहिती सकाळ या वृत्तपत्राच्या वेबसाईटवर वाचायला मिळाली..... आजच्या मराठी-परप्रांतिय वादाच्या पार्श्‍वभूमीवर त्यातील संदर्भ नक्कीच महत्त्वाचे आहेत.

भारतीय संस्कृती आणि अमेरिकन पोरी.......

लेखक काळा_पहाड यांनी बुधवार, 07/05/2008 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
आयपीएलच्या टी२० ने म्हणे प्रोत्साहनपर नाचायला अमेरिकेतुन पोरी मागवल्या. आल्या तेव्हा काय अवस्था होती बिच्चाय्रा पोरींची!! करायला काम नाही. खायला अन्न नाही. ल्यायला कपडे नाहीत. अरारा. लई वंगाळ वाटलं बघा जीवाला. गेले दोन चार दिवसात मातुर परिस्थितीत बराच पडलाय म्हणायचा ! पोरी कशा आंगभर कपडे नेसुन नाचू लागल्यात. बरं वाटलं. तरी म्हटलं माझा भारत देश एवढा कद्रू कधीपून झाला जो पाहुण्या पोरीबाळींना चोळी लुगडंबी देईना झाला. भारतीय संस्कृतीचा जयजयकार असो.......... तोमीनव्हेच

'' मरावे परी लग्न नाही करावे ''

लेखक विवेकवि यांनी बुधवार, 07/05/2008 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या वाढदिवसा निमित्त हे एक नविन विड॑बन मना सज्जना केर वारे करावे पहाटे भल्या रोज पाणी भरावे धुवावी अशी घास घासुन लादी पसारा नको आवरा निट गादी मना सज्जना तोच चंडी उठावी तिची त्या क्षणी जिभ वेगे सुटावी चहा पाजुनि थंड डोके करावे पति चांगला ऎसे नांव मिळावे त्वरेने पुन्हा भात पोळी करावी विळी घेउनी योग्य भाजी चिरावी डबा रोजचा एक जैसा नसावा शिरा न्याहरीला जरुर असावा प्रभाते मनी बायकोला भजावे तरी स्वल्प पैसेच खर्चा मिळावे पगारास हाती तिच्या सोपवावे कमावुन जास्ती तिला तोषवावे तिचें पाय रात्री जरासी चुरावें मका तेल ते चोळुनि जें मुरावे निजायास गादी उशी शाल द्यावी अशी चाकरी नित्य संपन्न व्हाव
Taxonomy upgrade extras

सहवास

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 07/05/2008 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
अंगणाला लागून असलेली खोली साफ करतांना नजर सहज खिडकीबाहेर गेली. एक चिमुकला लव बर्ड खिडकीला लागून असलेल्या वेलासमोर उडतांना दिसला. गर्द निळ्या पिवळ्या रंगाचे मऊशार स्वेटर घातलेला. इतका चिमुकला कि तळहातावर बसवून चारी बोटांनी हळूवार लपेटता यावा. त्याची आपली काहीतरी लगीनघाई सुरू होती. मधूनच सुर् कन उडून जायचा. परत येतांना चिमण्या चोचीत एखादेच लहानसे पीस किंवा काडी घेऊन यायचा. तो जरा दूर गेल्यावर खिडकीच्या काचेजवळ जाऊन पहिले. वाटले होते त्याप्रमाणे हा सारा उद्योग घरटे बांधण्याचाच होता. वेलीवर फांद्यांच्या बेचक्यात नुकतेच सुरू केलेले बांधकाम दिसत होते. बांधकाम कसले!