Skip to main content

'' मरावे परी लग्न नाही करावे ''

लेखक विवेकवि यांनी बुधवार, 07/05/2008 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या वाढदिवसा निमित्त हे एक नविन विड॑बन मना सज्जना केर वारे करावे पहाटे भल्या रोज पाणी भरावे धुवावी अशी घास घासुन लादी पसारा नको आवरा निट गादी मना सज्जना तोच चंडी उठावी तिची त्या क्षणी जिभ वेगे सुटावी चहा पाजुनि थंड डोके करावे पति चांगला ऎसे नांव मिळावे त्वरेने पुन्हा भात पोळी करावी विळी घेउनी योग्य भाजी चिरावी डबा रोजचा एक जैसा नसावा शिरा न्याहरीला जरुर असावा प्रभाते मनी बायकोला भजावे तरी स्वल्प पैसेच खर्चा मिळावे पगारास हाती तिच्या सोपवावे कमावुन जास्ती तिला तोषवावे तिचें पाय रात्री जरासी चुरावें मका तेल ते चोळुनि जें मुरावे निजायास गादी उशी शाल द्यावी अशी चाकरी नित्य संपन्न व्हावी नकोरे मना बोल ते बायकोचें असे की जणु बाण छातीत टोचें सख्या सांगतो निट ध्यानि धरावें मरावे परी लग्न नाही करावे मरावे परी लग्न नाही करावे. तात्या॑ साठी न आवडल्यास याला बाहेरील रस्ता दाखवावा
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 5059
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया