Skip to main content

चित्रपट: The Truman Show

लेखक लई भारी यांनी रविवार, 07/02/2021 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी प्राईम वर ब्राउज करत असताना हा चित्रपट दिसला. नेहमीप्रमाणे जरा रेटिंग वर नजर टाकून बघायला घेतला. कथेतले रहस्य पहिल्याच फ्रेम मध्ये प्रेक्षकांना कळून जाते आणि उरलेला चित्रपट, हे रहस्य मुख्य पात्राला कळते का यासंदर्भात आहे.  जिम कॅरी ने साकारलेला ट्रुमन म्हणजे एका टीव्ही शो मधले पात्र आहे. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याला माहीतच नाही आहे की आपल्या भोवती जे जग आहे ते सर्व scripted आहे. त्याच्या भोवती एक बेट तयार केलं आहे जे खर तर एक मोठ्ठा dome आहे.

पौष व. १० श्रीशिवरायांचा वाढता प्रताप! शके १५८१ च्या पौष व. १० रोजी श्रीशिवराय यांनी चालून आलेले आदिलशाहीचे सरदार रस्तुमजमान व फाजलखान यांचा पराभव केला.

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 07/02/2021 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
पौष व. १० श्रीशिवरायांचा वाढता प्रताप! शके १५८१ च्या पौष व. १० रोजी श्रीशिवराय यांनी चालून आलेले आदिलशाहीचे सरदार रस्तुमजमान व फाजलखान यांचा पराभव केला. अफझलखानाच्या वधानंतर श्रीशिवरायांचे महत्त्व फारच बाढून बादशहाचा एक मोठाच डाव फसल्यासारखा झाला होता. आतां विजापूरकरांच्या ताब्यातील प्रांत व किल्ले सोडविणे हेच एक ध्येय शिवाजी महाराजांच्या समोर होते. २८-११-१६५९ रोजी मोठ्या युक्तीने पन्हाळा किल्ला शिवाजी राजांच्या हातांत आला. या समयी कोल्हापूर प्रांतांत विजापूरच्या एका सुभ्याचे काम रस्तुमजमान नांवाचा सरदार पहात असे. त्याच्या प्रांतांतील पन्हाळा किल्ला फारच मजबूत होता.

आज काय घडले... पौष व.८ "बचेंगे तो और भी लढेंगे!"...

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 07/02/2021 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... पौष व.८ "बचेंगे तो और भी लढेंगे!"... शके १६८१ च्या पौष व.८ रोजी राणोजी शिंद्यांचे पराक्रमी चिरंजीव व पानपतच्या संग्रामांतील आघाडीचे वीर दत्ताजी शिंदे यांचे निधन झाले. सन १७६० च्या ३ जानेवारीस दत्ताजी दिल्लोस आले. स्वतःचे शौर्य व फौजेचा दम यांजवर विश्वास ठेवून अब्दालीस जेर करू असा विश्वास त्यांना होता. यांची बायको भागीरथीबाई हिने नारोपंत, बुंदेले, जनकोजी यांच्यामार्फत यांना युद्धापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही. पौष व.८ रोजी दत्ताजी फौजेनिशीं गिलच्यावर चालून गेले.

आज काय घडले... पौष व. ७ स्वामी विवेकानंद यांचा जन्म!

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 07/02/2021 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... पौष व. ७ स्वामी विवेकानंद यांचा जन्म! शके १७८४ च्या पौष व. ७ रोजी भारतीय तत्त्वज्ञानाचा सर्व जगभर प्रसार करणारे थोर पुरुष स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. विवेकानंदांची पूर्वपरंपरा अध्यात्मिक वैभवाने नटलेली आहे. 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी' या उक्तीप्रमाणे विवेकानंद या श्रेष्ठ व्यक्तीच्या कुलाचा इतिहासहि उज्ज्वल असाच आहे. विवेकानंदांचे आजे बाबू दुर्गाचरण दत्त यांनी ऐन वयांतच संन्यास घेऊन परामार्थवृत्ति स्वीकारली होती. दुर्गाचरणांचे चिरंजीव विश्वनाथ बाबू मोठे विद्वान् होते. त्यांची ज्ञानलालसा अतुलनीय अशीच होती. त्यांची पत्नी भुवनेश्वरी ही देखील आदर्श आर्य स्त्री होती.

आज काय घडले... पौष व.६ भरतपूरचा अजिंक्य किल्ला !

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 07/02/2021 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
bharatpur killa शके १७२६ च्या पौष व. ६ रोजी होळकर आणि जाट यांनी भरतपूर येथे इंग्रजांचा प्रचंड पराभव केला. बाजीराव, शिंदे, होळकर यांची सत्ता संपुष्टांत आणण्याचे अनेक प्रयत्न इंग्रजांनी या वेळी चालू केले होते. दीगच्या लढाईनंतर यशवंतराव होळकर भरतपूरच्या आश्रयास ससैन्य येऊन राहिले होते.

गोबी मुसल्लम Gobi Musallam Gobhi Musallam

लेखक काळे मांजर यांनी शनिवार, 06/02/2021 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वतयारीचा वेळ: ३० मिनिटे प्रत्यक्षात लागणारा वेळ: १.५ तास लागणारे जिन्नस: अख्खा फ्लॉवर चटणी साठी कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण पंढरपुरी डाळ्याची मिक्सरमधून अगदी बारीक केलेली पूड ग्रेव्हीसाठी तेल / तूप / बटर यापैकी काहीही कितीही मोहरी जिरे बडीशेप आले किस लसूण किस बारीक कांदा चिरून दोन टोमॅटो बारीक चिरून 7,8 टोमॅटो किसून पल्प मेथी पाला अर्धी किंवा एक मूठ अर्धी वाटी काजू पाण्यात घालून ठेवावेत , मिक्सर मधून वाटून घ्यावेत दही अर्धी वाटी पाणी मीठ साखर मसाले गरम मसाला लवंग ---------------- 1.
Taxonomy upgrade extras

लोकसंख्या - शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 06/02/2021 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/48278 इथे लोकसंख्या वाढीबद्दल थोडे प्रतिसाद आहेत.त्या अनुषंगाने ही शास्त्रीय मुलाखत. ---------------------------------------------------- एप्रिल २००४ मधे पुणे आकाशवाणी केंद्रावर अ.पां.देशपांडे यांनी शास्त्रज्ञ श्री.वसंतराव गोवारीकर यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली होती.त्या मुलाखतीतली लोकसंख्या या मुद्द्यावर गोवारीकर सरांनी मांडलेली मते. वसंतराव , 1991 साली वडोदरा येथील इंडियन सायन्स काँग्रेसचे आपण अध्यक्ष होतात .