Skip to main content

(........आकाशाशी जडले नाते !!)

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 23/05/2008 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
(........आकाशाशी जडले नाते !!) प्रभुश्रीराम, गदिमा, सुधीर फडके यांची माफी मागुन हे विडंबन-- ----------------------------------------------------------------------------- आकाशाशी जडले नाते, जेट एअरवेजचे ! टेकओव्हर झाले डेक्कनचे टेकओव्हर झाले डेक्कनचे !! गोयंकाने सहज उचलिले वीर इंडियन्सचे ! पुर्ण जाहले मॅनेजमेंटच्या हेतु अंतरीचे ! कमी जाहले प्रवास भाडे, जो तो झेपावे !!टेकओव्हर झाले डेक्कनचे टेकओव्हर झाले डेक्कनचे !! मुग्ध प्रवासी सहज न्याहळी जेट पंखधारी ! नयनांमाजी एकवटुनिया धावपट्टी सारी ! उडू लागले विमान हळू हळू,
Taxonomy upgrade extras

देवा......एवढी दया नको रे दाखवू...

लेखक सागर यांनी शुक्रवार, 23/05/2008 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
१३ मे, २००८ ला जयपूरला बाँबस्फोट झाले. त्याच शोकांतिकेतून मनात उमटलेली ही कविता.... खरेतर ही कविता नाही... भावना आहेत.... त्यातून समाजप्रबोधन झाले आणि लोकांनी कोणाला जवळ करावे ....करु नये याचा बोध घेतला.... तर ती अतिरेक्यांच्या कारवायांना बळी पडलेल्या प्रत्येक आत्म्याला श्रद्धांजली असेन.
Taxonomy upgrade extras

"थेंब"

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 23/05/2008 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
थेंब हे पावसाचे, धरणीसं सुगंधणारे थेंब हे अत्तराचे, सर्वत्र सुवासणारे || थेंब हे घामाचे, सर्वांग निथळणारे थेंब हे दवाचे, आळवास शोभणारे || थेंब हे जलाचे, तहानेस त्रुप्तणारे थेंब हे ओषधाचे, यातनेस सुप्तणारे || थेंब हे सुरांचे, शांततेस भंगणारे थेंब हे मदिरेचे, क्षणभर विसरवणारे || थेंब हे प्रतिभेचे, कवितेसं श्रुंगारणारे थेंब हे तारुण्याचे, बंधनासं झुगारणारे || थेंब हे मायेचे, मनासं ओलावणारे थेंब हे प्रेमाचे, ह्रुदयास भिजवणारे || थेंब हे अश्रुंचे, डोळ्यातुन ओघळणारे थेंब हे हास्याचे, ओठातुन पाझरणारे || थेंब हे तुषाराचे, मनासं अल्हादणारे थेंब हे थेंबाथेंबाचे, थेंबात नाचणारे || (थेंबाथेंबांत ल
Taxonomy upgrade extras

संपत असताना सारं काही...

लेखक फटू यांनी शुक्रवार, 23/05/2008 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
तसं खालील चित्रात विशेष अस काही नाही... गणपतीपुळेच्या समुद्र किना~यावरील हा सूर्यास्त आहे... समुद्र किनारा आणि सूर्यास्त हे दोन्ही आमचे कमकुवत बिंदू असल्यामुळे आम्हाला राहवलं नाही... बास चढवून टाकलं ते चित्र इथे....
Taxonomy upgrade extras

(उभी भिंत डागाळलेली मुळाशी)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 23/05/2008 02:59 या दिवशी प्रकाशित केले.
नीलहंस यांची 'उभी भिंत डागाळलेली छताशी' ही भेदक कविता वाचून आमच्या डोळ्यांसमोर वेगळेच रंगीत चित्र उभे राहिले! ;) किती रंगल्या पानपिंका मुखाशी, खुजे देव भिंतीवरी मांडलेले उभी भिंत डागाळलेली मुळाशी, वळे ना कधी पोळ निर्ढावलेले कुठे कनवटीचीच काढून चंची लावीत तांबूल होते सुखाने कुठे चार लुंग्या वरी-सावरुनी जणू रंगवीती सडका रसाने कळकून गेली दशा फत्तराची वहाती पुटे सोबतीला रसीली दिशा कोंदल्या, सूचना फाटलेल्या आणि एक गोळी जिभेखालि गेली मुखी राहतो ओरडा फक्त आता, कधी हासती हे मलाही नव्याने तरी शोधतो, मोजतो मी तरीही - पुरावे किती ठेवले कोडग्याने चतुरंग
Taxonomy upgrade extras

पोरखेळ !

लेखक संदीप चित्रे यांनी शुक्रवार, 23/05/2008 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
"Child's Play Is Serious Business" ह्या उक्तीवर आधारित… Anita Wadley ह्यांच्या "Just Playing" कवितेवरून स्वैर अनुवादित… ----------------------------------------------------------------- रचत असेन कधी, ठोकळे एकमेकांवर वाटत असेल अगदी, पोरखेळ हा तर ! शिकतो आहे मी, 'भार' आणि 'तोल' असेनही उद्या मी, 'आर्किटेक्ट' अनमोल.... १ हाती माझ्या बाहुली, भातुकलीचा खेळ नजर म्हणे तुमची, "आवरायला वेळ" ! 'जपणं' नि 'सांभाळणं' शिकवतो खेळ बनू उद्या 'आई'/'बाप' आम्ही एखादवेळ....
Taxonomy upgrade extras