पं यशवंतबुवा महाले, एक आभाळाइतका मोठा माणूस!
"अरे तू येणार होतास ना? कधी येणार आहेस? अरे किती रे वाट पाहयची तुझी! एकदा घरी येऊन माझ्या तंबोर्यांच्या जवारीचं काम तेवढं कर की रे जरा!"
"हो महालेसाहेब. आता एकदा नक्की येतो, जमवतो!"
महालेसाहेबांच्यात आणि माझ्यात फोनवर असा संवाद अनेकदा झाला आहे. त्यांचा फोन आला की मलाच अपराधी वाटतं आणि कामांची सगळी गडबड बाजूला सारून महालेसाहेबांकडे आता अगदी नक्की जायचंच, असं मी ठरवतो!
पं यशवंतबुवा महाले. गाण्यातला एक मोठा माणूस! परंतु हे नांव अगदी सर्वांनाच माहिती नाही.
मिसळपाव
