कवितेच्या कवितेची लावणी....
रेशमाच्या रेषांनी, निळ्या निळ्या शाईनी,
टाकोटाक कशिदा मी काढीला,
नाक नका मुरडू माझ्या कवितेला..||
नवी कोरी कविता लाखमोलाची
भरली मी नक्षी यमका-वॄत्ताची,
गुंफीयले अलंकार ,अलंकार जोडीला..|| नाक नका मुरडू...
लिहीत होतो कागदावर मी जोषात असा जोषात..
अवचित आली माझ्या मनात की मनात..
कुणी म्हणे प्रतिभा , कुणी कवीकल्पना..|| नाक नका मुरडू...
भीड नाही ठेवली टीकाकारांची,
मुरवत ना राखली सोम्या-गोम्यांची,
कुणी माझ्या कवितेला छान का नं म्हणीना..|| नाक नका मुरडू...
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
