Skip to main content

तुझे चालणे दरवळून जाते.......

लेखक किरण कुमार यांनी रविवार, 28/02/2021 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाला कसा थांगपत्ता नाही कसे झाकले नभाला धुक्याने इथे अतृप्त सुर्य व्यक्त होतो जराशा कवडश्यातूनी मुक्याने ............ प्रवासा पुन्हा हाक अस्तित्व देते गंधीत मृदाचे तृणांचे शहारे इथे स्पर्श ओला निळ्या सागराचा गगनातूनी जणू थव्यांचे पहारे ............. इथे धुंद असते अशी शर्वरी की कुठे चांदणे विरघळून जाते किती बोलणे ते चमकत्या विजेचे तुझे चालणे मात्र दरवळून जाते .............. - किरण कुमार

रोनाल्ड रॉस, मलेरिया आणि भारत

लेखक मनस्विता यांनी रविवार, 28/02/2021 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळा सुरु झाला की मलेरियाची (हिवताप) साथ हमखास असते. एके ठिकाणी वाचलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये दरवर्षी मलेरियामुळे १००० मृत्यू नोंदवले जातात. असा हा मलेरिया हजारो वर्षे जुना आजार मानला जातो. पूर्वी युरोप आणि अमेरिकेमध्येदेखील मलेरियाचा धुमाकूळ होता. असं म्हणतात की रोमन साम्राज्याचा पाडाव होण्यात काही अंशी मलेरिया हा आजार कारणीभूत होता.  पूर्वी असे मानले जायचे की मलेरियाची लागण पाणथळ किंवा दलदलीच्या ठिकाणाहून येणाऱ्या दूषित हवेमुळे होते. त्यामुळे त्याचे नाव mal (दूषित) aria (हवा) ह्या इटालियन शब्दावरून पडले.

शेवटचा अश्रू

लेखक अनुस्वार यांनी शनिवार, 27/02/2021 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा जन्म झाला की आत्म्याच्या तोडीची म्हणता येईल अशी साथ आपल्याला देणारे अश्रूंशिवाय दुसरे काय असते. माध्यमं आणि भाषा यांनी कितीही उंची गाठली तरी व्यक्त होण्यातली अश्रूंची हुकुमत त्यांना कधीच साधता येणार नाही. अश्रू हा नात्यांचा पहिला पाया असतो. ज्या नात्यांनी डोळे कधीच पाणावले नाहीत ती सारी नाती खोटी!औचित्यभंग नको म्हणून मनुष्याला एकवेळ हसणं आवरता येईल, पण मनाचा वज्रबांध जमीनदोस्त करत गालावर ओघळणारा अश्रू भावनांचं गाठोड जपून ठेवण्याच्या भानगडीत पडत नाही. विद्युल्लते सोबत तेज चमकावे तसे भावनां सोबत अश्रू वाहतात. स्वतःला चाणाक्ष आणि व्यवहारी म्हणवणारे आपण जगाची किंमत पैशांत करतो.

शिक्षणाचे मानसशास्त्र: गोष्ट सांगत गणित शिकवा ... २

लेखक राजा वळसंगकर यांनी शनिवार, 27/02/2021 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री कुणालाच नीट झोप लागली नाही. सायलीला नक्की काय करावे समजत नव्हतं. आई बाबांना सांगावे का? **************************************************************************** गोष्टीची सुरवात ... मागची पोस्टसाठी इथे टिचकी मारा. **************************************************************************** पण न विचारता दुसऱ्यांच्या घरात गेलीस कशाला म्हणून रागावले तर? आई बाबांचे रागवलेला चेहेरे स्वप्नात पाहुन सायली दचकून जागी होत होती.

मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 27/02/2021 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! लॅटीन लिपीतून मराठी मजकूर लिहिणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! माझ्या फोनमधे मराठी/देवनागरी किबोर्ड इन्स्टॉल होत नाही, फोनमधे देवनागरीत कसं लिहायचं ते मला माहित नाही अशा थापा मारणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! फोनमधे देवनागरीत लिहायला फार वेळ लागतो म्हणणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! मित्र, छत्रपती हे शब्द 'मिञ', 'छञपती' असे टंकणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! 'हिंदी' शब्द मराठीत घुसवणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! आताच्या 'घडीची' सर्वात मोठी 'बातमी देणार्‍यांना' मराठी दिनाच्या शुभेच्छा! मराठीची लक्तरं करणार्‍या जाहिर

प्रवास (भाग 9) (खरा शेवट....)

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 27/02/2021 02:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास भाग 9 (खरा शेवट) पवारने भिकुला गाडीत बसवलं आणि गाडी वाड्याकडे वळवली. भिकू गाडीतून उतरत असताना पवार म्हणाला;"बाकी सगळे सुटणार भिकू.... तुझं तू बघ. कारण जोपर्यंत तू अडकला आहेस; तोपर्यंत ते चौघे सेफ आहेत." पवारने गाडी वळवली आणि निघून गेला. वाड्याच्या दिशेने पाऊल उचलत भिकू म्हणाला;"धाकटे मालक.... तुम्ही आणि मी!!!!! आलो मी......" जाता जाता पवारने भिकू जे बोलला ते ऐकलं होतं. 'येड लागलं बहुतेक या राक्षसाला....' पवारच्या मनात आलं. *** भिकू शांतपणे चालत होता वाड्याच्या दिशेने. पण त्याचे कान दूर जाणाऱ्या गाडीचा मागोवा घेत होते. गाडी नक्की निघून गेली याची भिकुला खात्री झाली.

अध्याय ३ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे सादरीकरण

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 27/02/2021 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
३ ३ या अध्यायातील विषयवस्तू प्रबंधात सविस्तर लिहिली आहे म्हणून इथे संक्षिप्त रूपात सादर केली आहे.

एका तळ्यात होती...

लेखक शब्दसखी यांनी शुक्रवार, 26/02/2021 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
खूप लहान असल्यापासून एका तळ्यात होती बदके पिले सुरेख हे गाणं सतत कानावर पडत आलंय. हळूहळू त्याचा अर्थसुद्धा समजायला लागला. बदकाच्या पिल्लांपेक्षा वेगळ्या किंवा कुरूप दिसणाऱ्या राजहंसाच्या पिल्लाला एकटेपणाचा आणि अवहेलनेचा सामना करत अखेर स्वतःच्या राजहंस असण्याची आणि पर्यायाने त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असण्याची जाणीव होण्याचा हा प्रवास. त्यावेळी हे गाणं संपताना त्या राजहंसासाठी छान तर वाटायचंच पण बदकांची बरी जिरली असं पण वाटायचं. आता मात्र प्रश्न पडतो की त्या राजहंसाचं पुढे काय? म्हणजे तो इतरांपेक्षा जास्त सुंदर, डौलदार आहे म्हणून आता त्याला रुपावरुन कोणी हिणवणार नाही हे ठीक.

लाइक द फ्लोइंग रिव्हर (ऐसी अक्षरे....मेळवीन १)

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 26/02/2021 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
लाइक द फ्लोइंग रिव्हर (ऐसी अक्षरे....मेळवीन) लेखक –पाउलो कोएलो अनुवाद –चंद्रकांत सहस्रबुद्धे अल्केमिस्ट वाचल्यानंतर पाउलो यांच दुसरेच पुस्तक हाती पडले.वाचायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आले पाउलो यांची ही २०१०-२०१२ या कालखंडात लिहिलेली दायारीच आहे.नुकतेच त्यांनी लिखाणासाठी संगणक वापरायला सुरुवात केली आहे,अमेरिकेतील ट्रेड सेंटरच अपघात वगैरे समकालीन घटना यात लिहिल्या आहेत.थोड वाचून झाल्यावर स्वत:ला प्रश्न विचारला ..खरच हे बौद्धिक,वैचारिक वाचायची आता गरज आहे का?पण थोडे अजून वाचुया हे ठरवलं. आणि खरोखरच प्रेम,मन:शांती,युद्ध विशेष म्हणजे मृत्यु याबद्दल एव्हढ सुंदर सोप्या भाषेत पा