Skip to main content

रामूची आग अन्. आपली होरपळ!

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 29/08/2008 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.daijiworld.com/images1/glad_082508_phoonk2.jpg चि त्रपटगृहात जाऊन "फूंक' एकट्यानं बघणाऱ्यासाठी पाच लाख रुपयांचं बक्षीस रामगोपाल वर्मानं ठेवलं होतं. कुणी हे आव्हान यशस्वीरीत्या पेलल्याचा दावा केला, तर कुणी अर्ध्यावरच मैदान सोडून पळून गेलं म्हणे. "फूंक'च्या जाहिरातीसाठीचा हा स्टंट होता, अशीही चर्चा झाली. रामू हा तसा डोकेबाज आणि ताकदीचा दिग्दर्शक. तसाच तऱ्हेवाईकही. त्याच्या चित्रपटातली पात्रं विक्षिप्त वागतात (आठवा ः "रंगीला' सोडून कुठल्याही चित्रपटातली ऊर्मिला मातोंडकर किंवा अंतरा माळी!

माहिती हवी आहे - महिला रोजगार

लेखक भास्कर केन्डे यांनी शुक्रवार, 29/08/2008 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याकडे कला पदवीधरांचे पीक बेसुमार आहे. हा एक असा मोठा गट आहे जो सध्याच्या प्रगतीच्या वार्‍यापासून कोसो दूर रहिला आहे. शेती परवडत नाही, व्यवसायासाठी भांडवल/मार्गदर्शन नाही, इंग्रजी येत नसल्याने कॉल सेंटर सारख्या नोकर्‍या मिळत नाहीत, कॉमर्स शिकल्याले नसल्याने बँकांच्या/वित्तीय संस्थांच्या नोकर्‍या मिळत नाहीत, विज्ञान/तंत्रशिक्षण झालेले नसल्याने कारखान्यांमध्ये नोकर्‍या मिळत नाहीत... अशी या पदवीधरांची शोकांतिका आहे. हा तरुण वर्ग मग कारखाण्यांमध्ये कामगार बनतो वा कारकून/चपराशी/हवालदार अशा नोकर्‍या मिळवण्यासाठी लाखोंची गर्दी करतो (उदा.

भास

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी शुक्रवार, 29/08/2008 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
होऊन कान्हा येईन पुन्हा करण्यास गुन्हा का बोल तुझे स्मरतात मला तोडून बंध होऊन धुंद आवेग अंध का ओठ तुझे डसतात मला तू दूर तिथे हे सूर इथे आकाश रिते का श्वास तुझे कळतात मला विरहात असे जळणार कसे ही रात्र हसे का भास तुझे छळतात मला अनिरुद्ध अभ्यंकर

हलीम

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 29/08/2008 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण संपत येतोय. पुढील आठवड्यात गणरायांचे आगमन. तेव्हा येत्या वीकांताचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी ही एक पाककृती.... साहित्य मटण : अर्धा किलो शक्यतो बोकडाचे.

पापड पराठा

लेखक तनू यांनी शुक्रवार, 29/08/2008 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
:) प्रथम उडदाचे पापड भाजुन घ्यावे, त्याचा बारीक चुरा कारावा, त्यात तीखट, मीठ चवीप्रमाने घालावे.थोडेसे तेल घालावे, एकत्र मीसळावे.रोजच्या चपातीचे कणीक मळावे.छोटी चपाती लटावी, त्याच्या मधे तयार केलेले सारण भरावे व चपाती सारखे लाटावे.भाजताना आवडीप्रामने तेल/ तुप लावुन भाजावी.पापड पराठा तयार........

मातृदिनाच्या निमित्ताने

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शुक्रवार, 29/08/2008 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या मातृदिन. प्रत्येक आई आपल्या मुलांच्या उदंड आयुष्यासाठी, सुखासाठी पिठोरी ची पूजा करेल.. इथे अनेक जण आहेत , जे कामानिमित्त, शिक्षणानिमित्त घरापासून लांब रहातात.
Taxonomy upgrade extras

(लावू कशी पाटी मी दुकानला हो )

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 29/08/2008 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
(लावू कशी पाटी मी दुकानला हो ) मुंबई व उर्वरीत महाराष्ट्रातील फलक मराठीतुन करण्याची महापालिकेने ( मनसेने ) दिलेली मुदत काल संपली.
Taxonomy upgrade extras

चांगल्या बातम्याही वाईट बातम्या सारख्या प्रसारित होऊ शकतात.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 29/08/2008 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी एकदा मी कंपनीच्या कामाकरिता राजकोट मधे गेलो होतो.कामाच्या जरूरीमुळे मला काही दिवस तिकडे मुक्काम करायची जरूरी भासली होती.संध्याकाळी काम आटोपून झाल्यावर बाहेर कुठल्यातरी चांगल्या रेस्टॉरंट मधे जेवायला जाताना चालत जायला मी जास्त पसंत करायचो.आणि रस्त्यावर एव्हडा ट्रॅफिक असायचा की छोटे छोटे मॉपेड चालवणारे नेहमी एकमेकाला आपटायचे,घासायचे,पडायचे.म्हणजे अगदी छोटासा अपघात व्हायचा.पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की कुणाचीही बाचाबाची होत नसे.एक्मेकाला सॉरी म्हणून निघून जायचे.कधी कधी सॉरी हा शब्द मोठ्याने ऐकायला यायचा तर कधी कधी ओठांच्या हालचाली वरून सॉरी म्हटल्याचं भासायचं.हे त्यांच फ्रेंडली वागण

जेष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन.

लेखक रत्नागिरीकर यांनी शुक्रवार, 29/08/2008 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
जेष्ठ अभिनेत्री श्री.जयश्री गडकर यांचे आज पहाटे निधन झाले. या चतुरस्त्र अभिनेत्रीला माझी आदरांजली. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3420004.cms रत्नागिरीकर