कंदिल बनविणे: एक आनंददायी कला
दिवाळी हा सर्वार्थाने घरातल्या प्रत्येकाचा सण. दिवाळी आली की वेगवेगळ्या आघाड्यांवर सगळं घर तयारीला लागतं. एकीकडे घराची साफसफाई, रंगरंगोटी चालु असते. तर दुसरीकडे फराळाचे मस्त पदार्थ चालू असतात. लहानांना सुट्ट्या असतात. पुर्वी किल्लेही बनवले जात. एकत्र कुटंबांमधे तर आपेष्ट जमलेले असतात. मनसोक्त हास्य विनोदात आठवडा कसा जातो ते कळतही नाहि.
आज दिवाळीचा पहिला दिवस. वसुबारस!
आमच्या घरी आज दिव्यांची रोषणाई आणि कंदिल लागतो. त्यामुळे गेला विकांत कंदिल बनविण्यासाठी राखून ठेवला होता. अजूनहि मी कंदिल घरीच बनवतो. दर तीन वर्षांनी तर कंदिलाचा सांगाडाहि नवा बनतो.
मिसळपाव
हा प्रकार जरा वेगळाच दिसला. म्हटल पाहुणे आले आहेत तर त्यांची छबी टिपावी. लगबगीन कपाटातला कॅमेरा काढला, भिंगसंच बदलला.