लेखककोदरकरयांनी शनिवार, 01/11/2008 05:22 या दिवशी प्रकाशित केले.
हॅलोवीन च्या निमीत्ताने बरीच छोटी मंडळी माझ्याकडुन चॉकलेट घेवून गेली. विशेष म्हणजे बहुतांश भारतीय वंशाचे होते. सण भुतांचा असूनही...
आपल्या राज्यात छट पुजेच्या भोवती जमा झालेला धुराळा हे आपले दुर्देव नाही का?
लेखकमनीषायांनी शनिवार, 01/11/2008 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ : Esplanade - on the bay , Singapore
३० ऑक्टोबर २००८
Masters of Percussion
सभागृहात मिट्ट काळोख होता. टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता होती. सारंगीचे सूर सभागृहात पसरू लागले... एक प्रकाशझोत स्टेजवर दिसू लागला.. त्यात एक तरुण आपल्या सारंगीतून सूरांची उधळण करत होता. सर्वजण मंत्रमुग्ध होउन पाहत/ऐकत होते. थोडावेळ आलापी झाल्यावर शेजारील तबल्यातून एक ताकदवर, खणखणीत बोल उठला... प्रकाशझोत आता तबल्यावर आला होता.... तो तोच होता.
अनेक वर्ष त्याने रसिकांच्या र्हुदयावर अधिराज्य गाजवलेलं आहे... त्याला आज तालाच्या दुनीयेत कोणी प्रतिस्पर्धी नाहीत... तो च... उस्ताद झाकीर हुसेन.
लेखकश्रीकृष्ण सामंतयांनी शुक्रवार, 31/10/2008 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
फिरून आली मला स्मृति
निघून गेलेल्या त्या जमान्याची
त्या माझ्या बालपणाची
अरेरे,एकटेच सोडून जाणार्या
अन पुन्हा कधीच
न येणार्या त्या बालपणाची
ते लुटुपुटुचे खेळणे
ते लुटुपुटुचे संवगडी
ते धावत पळून जाणे
शीव मला असे ओरडणे
विसरपडेना अजुनही
त्या सुखदेयी स्वप्नाची
त्या आनंददायी बालपणाची
फिरून आली मला स्मृति
निघून गेलेल्या त्या जमान्याची
रडावे पुन्हा पुन्हा आठवून
ते गतदिवस बालपणाचे
स्मरावे पुन्हा पुन्हा आठवून
ते संवगडी बालपणाचे
फिरून आली मला स्मृति
निघून गेलेल्या त्या जमान्याची
अन पुन्हा कधीच
न येणार्या त्या बालपणाची
श्रीकृष्ण सामंत
लेखकदत्ता काळेयांनी शुक्रवार, 31/10/2008 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
हे जे काही मी रचलं आहे, ते नक्की कुठल्या काव्यप्रकारात बसेल हे माझ्या ल क्षात येत नाहीये.
पण जसं सुचलं, तसं लिहिलं. घ्या सांभाळून दादानु
गझलांची चळ्त रचतोच आहे
छापण्या पुढे व्हा, मी येतोच आहे
कुणी सांगण्या येई, गझल दे करुनी
मागण्याआधी मी देतोच आहे
लिहिण्यास पाने पड्ली, जराही कमी ती
मुलांच्या वह्या मी उसवतोच आहे
भिऊनी पळाले शब्द ओळीमधुनी
गचांडी धरुनी, त्यांना बसवतोच आहे
ओळ्खून गझलाकारास, प्रतिक्रिया जर दिली
'तिलाही' धुवाधार धुतोच आहे
लेखकचतुरंगयांनी शुक्रवार, 31/10/2008 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
२९ ऑक्टोबर २००८, जर्मनीमधल्या बॉन शहरातल्या 'आर्ट अँड एक्झिबिशन हॉल'ला जत्रेचं स्वरुप आलं होतं! सहाजिक आहे, दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धी मधे पट मांडून एकमेकांसमोर बसलेले होते. बुद्धीबळाच्या जगज्जेतेपदाचा सामना सुरु होता. १२ डावांच्या ह्या मालिकेत जो कोणी ६.५ गुण मिळवेल त्याच्या गळ्यात विजेतेपदाची माळ पडणार हे नक्की होतं.
आनंद विश्वनाथन (भारत) २००७ चा जगज्जेता वि. व्लादिमीर क्रामनिक (रशिया) २००८ सालासाठी त्याला आव्हान देणारा असा हा सामना होता. आनंद ६ गुणांसह आघाडीवर होता, त्याच्या आणि विजेतेपदाच्या मधे फक्त अर्ध्या गुणाचं अंतर होतं. उत्सुकता शिगेला पोचली होती.
लेखकविकासयांनी शुक्रवार, 31/10/2008 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
आज (३१ ऑक्टोबर) महाराष्ट्र टाईम्स आणि सामना मधे वाचलेल्या बातम्यांप्रमाणे बाळासाहेब ठाकर्यांनी माहीती असलेली बातमी, "उद्धवच्या हाती शिवसेनेची सूत्रे दिली असताना मला भेटायला येण्याचे काय प्रयोजन ? " असे म्हणत काही प्रमाणात अधिकृत केली.
जो पर्यंत शिवसेना हा किमान महाराष्ट्रासाठी प्रबळ पक्ष आहे, तो पर्यंत त्यांच्यातील अंतर्गत घडामोडींचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रावर सहज पडू शकतो. त्यामुळेच या घटनेचे महत्व.
लेखकमूखदूर्बळयांनी शुक्रवार, 31/10/2008 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाच्या आयुष्यात 'आवाजाच' अगदी म्हणजे अगदी महत्वाच स्थान आहे. माणूस जन्माला आल्यापासून जो ' आवाज' करायला सुरुवात करतो, तो जन्मभर आवाज करत किंवा ऐकत मार्गक्रमण करत असतो. अगदी आयुष्याच्या 'अथ' पासून 'इती' कान कसले कसले कष्ट सहन करत असतात बिचारे.
आता नेहेमीचच उदाहरण घ्या. तूम्ही कधी कधी (कधी कधी नव्हे नेहेमीच) लोकल गाडीची वाट बघत उभी असता. लोकांचा कलकलाट सूरु असतो. मध्येच ध्वनीक्षेपकावर कसली तरी 'खूडबूड' ऐकायला येते. " एक विशेष सूचना". तूम्ही पंचप्राण एकत्र करून 'ती' ऐकण्याचा प्रयत्न करता. " खर्र... खर्र... खूर्र... खूर्र... खड.. खड.. खडाक खूडूक गाडी खट खट उशीराने ...........
लेखकदत्ता काळेयांनी शुक्रवार, 31/10/2008 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मधुकर
जरी पिऊनी आता
झालास तू बेहोष..
शोषून फुलांचे सारे
जरी मधुकोष ..
हा व्यर्थ तुझा आवेश,
तुझा हा अंध..
पाकळया फुलांच्या
तुजसाठी झाल्या बंद
रुसलेले गीत
रुसले गीत
शब्दात अडखळे शब्द
ओठावर ये ऊन
झाले ते नि:शब्द
येऊन तळमळे
अधरावरती गाणे
नशिबात कळीच्या
निर्माल्याचे जिणे
लेखकमराठी माणूसयांनी शुक्रवार, 31/10/2008 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
शोभा डे यांची करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखतची ट्रान्स्क्रिप्ट इथे देत आहे. मूळ मुलाखत इंग्लीशमधून असल्याने इंग्लिशमध्येच ठेवत आहे. जर मिसळपावच्या कोणी सदस्याने ही भाषांतरीत केली तर बरे होईल. मी स्वतःच करायचा प्रयत्न करत आहे पण त्याला थोडा वेळ लागेल म्हणून आत्ता आहे अशी...
Devil's Advocate: Shobhaa De on Mumbai vs Bombay
Karan Thapar / CNN-IBN
Published on Mon, Oct 27, 2008
What’s wrong with Mumbai? A city known for its cosmopolitan culture has become a victim of parochial, divisive identity politics.
लेखकआपला अभिजितयांनी शुक्रवार, 31/10/2008 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
-----------
भडक लाल रंगाचे कपडे घालून एकता कपूर तिच्या गिरणीत नेहमीप्रमाणे कामात दंग होती. मधली एक गिरणी फारच अवाढव्य होती. एखाद्या ऑटोमोबाईल कारखान्यात शोभावी, अशी. या गिरणीवर एकता कपूर स्वतः काम करत होती. वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांची वेगवेगळी पिंपं शेजारी मांडली होती. मनास वाटेल त्या पिंपात माप घालून त्यातून धान्य काढून ती गिरणीच्या तोंडात ओतत होती. काही मिनिटांत त्यातून सकस, रसरशीत पीठ खालच्या पिंपांत पडत होतं.
या भल्यामोठ्या आवारात शेजारीच रांगेत, ठराविक अंतरावर पंधरा-वीस गिरण्या मांडल्या होत्या. त्यांच्यावरही एकतासारख्याच दिसणाऱ्या काही बाया कार्यरत होत्या. या एकताच्या "डमी'.