प्रयोजनाविण दिवा एकटा . .......... मरण न येण्याची स्थिती
प्रयोजनाविण दिवा एकटा, उगाच जळतो आहे
सरत्या वातीसरसे जळते, भोग जाळतो आहे
काजळ काळ्या काचेमधुनी, हवा मागतो आहे
जळत्या तेलासरसे उरले, थेम्ब मोजतो आहे
किती उजळल्या खोल्या आणिक, किती जाळल्या वाती
भिंती पडल्या वासे तुटले, तुटली उरली नाती
आता जगणे असेच जगणे, उरे न काही हाती
जगता जगता जळता जळता, संपून जाती वाती
-- सागरलहरी (उर्फ लहरी सागर)
माझे हे मि पा वरचे पहिलेच लि़खाण आहे. मला छंद वगैरे कळत नाही. सूचना व अभिप्रायांची प्रतीक्षा.
पार्श्वभूमी - माहीतीतील एक गृहस्थ पक्षाघाताने आजारी होते.
वृद्ध .. विधुर.. आयुष्य .. सुखे दु:खे सारे पाहून सोसून झालेले ..
मिसळपाव