Skip to main content

गीता

लेखक विनायक पाचलग यांनी मंगळवार, 09/12/2008 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
युक्ताहारविहारस्य युक्तचेश्टस्य कर्मसु| युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दु:खहा|| तर मित्रानो, आज गीता जयंती , वरील श्लोकाप्रमाणे अनेक श्लोकातुन जीवन तत्वज्ञान सांगणारी भगवद्गीता. याच दिवशी(तिथीनुसार्)श्रीकृष्णाने गीता सांगीतली.किती वर्षापुर्वी त्यावर अनेक वादविवाद आजही चालु आहेत. आपण सर्वानी गीता वाचली असेल मनन केले असेल निदान ती चाळली असेल . गीतेचा कालावधी बराच जुना आहे.इतके वर्ष गीता जगाला मार्गदर्शन करत आहे हेच गीतेचे वैशिश्ट्य आहे. गीतेवर अनेक वादविवाद झाले.प्रथम ती वेदान्विरुद्ध आहे असे म्हटले गेले मात्र ती वेदविरोधी नाही.त्यात वेद(ज्यांचे स्थान कोणी कितिहि नाकारले तरी अढळ आहे)आणि ढासळणारी

सांगून जा ...

लेखक मनीषा यांनी मंगळवार, 09/12/2008 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
सखी सांगूनी जा काय तुझ्या मनी हसू लाजरे का फुले ओठांवरी | खळी नाजूक गं खुले गोर्‍या गाली बट लाडीक ही कशी रुळे भाळी | क्षणी तुज गाली उमटे का लाली तुझी पापणी का झुकली ही खाली | धरेवर नाही तुझी पाउले ही नजरेस नाही | विश्वाचे भान ही | अशी चालता तु वळूनी पाहसी उगा थांबूनी का पुढेच तु जासी | रती होउनी तु विहरसी वनी सखी सांगूनी जा काय तुझ्या मनी |

या दोंघीमध्ये जास्त सुंदर कोण???

लेखक उम्मि यांनी मंगळवार, 09/12/2008 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
पर्याय १: मधुबाला... पर्याय २: माधुरी दिक्षित... पर्याय ३: तुलना करणे शक्य नाही...... काय मंडळी, विचारात पडलात ना? याच विचारात पडलेला, उम्मि...

लष्कर-ए-तोयबा - कमांडर झकीउर रेहमान लखवी अटकेत.....

लेखक नाम्या झंगाट यांनी मंगळवार, 09/12/2008 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
मटा, द न्यूज डेली आणि इतर वृत्तपत्रांच्या संकेतस्थळावर लष्कर-ए-तोयबा - कमांडर झकीउर रेहमान लखवी याला अटक झाल्याची बातमी आहे. लष्कर-ए-तोयबा - (खालील लिंक वर टिचकी मारा.....) http://www.satp.org/satporgtp/countries/india/states/jandk/terrorist_ou… एकूणच हे सर्व बघता लष्कर-ए-तोयबा पाकिस्तान सरकार च्या छ्त्रछायेखाली च वाढते आहे याबद्द्ल शंका नाहि.

इरफान हुसैन

लेखक एकलव्य यांनी मंगळवार, 09/12/2008 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
अंग मोडेपर्यंत आणि डोक्याचा भुगा होईपर्यंत काम करून आता कोठे घरी आलो. लिहायचे खरे तर जीवावर आले आहे... पण हा लेख तुमच्यापर्यंत पोहचवाच असे वाटले म्हणून दोन चार ओळी टंकतो आहे. भारतातील आधुनिक दहशतवादाचे मूळ दुखणे तसे जुनेच आहे. पाकिस्तान हा दहशतवादाचा महाप्रचंड कारखाना आहे... पॉलिटिकली करेक्ट हवे असेल असेल तर पाकिस्तानचे सध्याचे स्वरूप घातक आहे असे म्हणा हवे तर. पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे अगदी जन्मापासून पाकिस्तान अगदी असेच गुण उधळणार याची आणि याचीच लक्षणे दिसत होती. इंग्रजांनी फाळणीला छुपे प्रोत्साहन दिले ते ही अशीच फळे यावीत याच हेतूने.

`मिपा'वर गोंधळ.. (शिर्षक संपादीत)

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 08/12/2008 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
`मिपा'चे वेगळेपण आणि वैशिष्ट्य पाहून मी या संकेतस्थळावर आलो. इथे प्रत्येकाला आपली मते, विचार मोकळेपणाने मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, असेही जाणवत होते. पण या स्वातंत्र्याचा काही जण दुरुपयोग करीत आहेत, असे दिसते. कुणा महाभागाने आजच ५ कविता आणि विषय वेगवेगळ्या शीर्षकाखाली दिले आहेत. मध्यंतरी मुंबई हल्ल्याच्या वेळी तर नवनवे विषय टाकण्याची अहमहमिकाच लागली होती. एका दिवशी शिवराज पाटलांच्या राजीनाम्याचे तीन-तीन विषय होते! एखाद्या विषयावर सांगोपांग चर्चा घडवण्यापेक्षा विषय टाकण्यात आघाडी घेण्याची स्पर्धाच त्यात दिसते. `मिपा'कारांनाही हे अपेक्षित नसावे, असे वाटते. हा विषय तात्यांशीही आधी बोललो आहे.

पुन्हा पहिल्या सारखं

लेखक rahulkransubhe यांनी सोमवार, 08/12/2008 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
आता तू पहिले सारखं माझ्याशी बोलत नाहीस तुझा थोडा वेळ सुध्दा माझ्या समवेत घालत नाहीस माझ्यावर तुझा राग आहे मी मान्य करतो त्यसाठी मी तुला पुन्हा एकदा सॉरी म्हणतो मला माफ करुन तू पुन्हा माझ्याशी बोलत रहा पुन्हा एकदा नव्याने माझ्याशी मैत्री करुन पहा तू बोलली नाहीस की, दिवस माझा कटतं नाही मित्रांसोबत, घरच्यांसोबत कोणाशीही माझं पटत नाही तुझी मात्रीच फक्त आता या जीवाला हवी आहे छोट्या चुकीची फार मोठी सजा तू मला देत आहे सजा तुझी मागे घे अशी फर्याद मी करतो वाचलस तर या चुकीचा जुर्माना सुध्दा मी भरतो जुर्माना काय आहे हे तू मला सांगुन पहा पण माझ्याशी तू पहिले सारखं बोलत रहा तुझ ते दोन वाजे पर्यंत थ
Taxonomy upgrade extras

आई कसे म्हणु मी...

लेखक rahulkransubhe यांनी सोमवार, 08/12/2008 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
आई कसे म्हणु मी Mummy येई मुखी English याच्या जगात मराठी मन माञ दु:खी बाबांचे झाले Daddy ताईची झाली Sister English च्या जगात नवरे झालेत Mister जग झाले सारे Fast-food जे चांगले ते झाले Good मिञ सर्व झालेत Friend शनिवार झाला Weekend राञ झाली आता Night मारामारी म्हणजे Fight जे बरोबर असेल ते Right आज पैशाचे झाले दोन प्रकार एक Black तर दुसरा White English च्या या जगाचे काहीच खरे नाही कालपर्यंत होते जे उद्या काहीच दिसणार नाही जुन्या सर्व गोष्टींचा नव्यापीढीसाठी झाला इतिहास इंग्रजी शिकावी प्रत्येकानं हाच आधुनिकीकरणाच्या ध्यास
-राहुल अरुणकिशन रणसुभे शास्त्रीनग
Taxonomy upgrade extras

आसाराम बापु

लेखक rahulkransubhe यांनी सोमवार, 08/12/2008 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
बापुच्या प्रवचनाला गर्दी झाली फार ट्रक, बस, सुमो तर कोणी आणली कार मोकळ्या जागेत जणू वसलं होत गाव प्रत्येक वस्तूला तेथील आला होता भाव छोट्-छोट्या वस्तूंची अनेक मांडली दुकानं ग्राहक होते भरपुर खरेदी करत होते आवडीनं दोन-तीन लाख लोकांचा समुद्र तीथे लोटला बापुच्या भक्तीचा महिमा आज मलाही पटला माणसाच्या श्रध्देचं हे नविन रूप मी पाहीलं होतं बापुच्या नावाने आज हजारोंच पोट भरत होतं
-राहुल अरुणकिशन रणसुभे शास्त्रीनगर, सिडको औरंगाबाद.
Taxonomy upgrade extras

कुत्र आणि कानमंत्र

लेखक rahulkransubhe यांनी सोमवार, 08/12/2008 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
मला लहानपणा पासुनच कुत्र्यांची भीती वाटायची. ज्या रस्त्यावर कुत्रे आहेत त्या रस्त्यावरून मी जातच नसे. कुत्र्यांच भूंकण, त्यांचे विषारी दात, कुत्रं चावल्यामुळे होणारा रोग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुत्रा चावल्यानंतर पोटात घ्यावे लागणारे इंजेक्शन या सर्व गोष्टींची आठवण काढली की अंगाला काटा येतो. या सर्व गोष्टींमुळे मला कुत्र्यांची फार भीती वाटायची. मी कुत्र्याला घाबरतो म्हणून माझे सर्व मित्र मला हसायचे. ते मला नेहमी सांगायचे की, "कुत्र कधी अंगावर आलं किंवा पाठीमागे लागलं तर पळायच नाही, तर आपण तीथेच उभं रहायचं किंवा जागेवर बसुन जायचं म्हणजे कुत्रा आपल्याला काहीच करत नाही.