Skip to main content

गांधी.

लेखक कलंत्री यांनी रविवार, 14/12/2008 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
वाघ म्हटला तरी खातो वाघाबो म्ह्टला तरी खातो तर वाघ्याच का न म्हणावं? एक वाक्प्रचार. सध्या बंगालच्या वाघीणी या लेखाद्वारे आम्हाला गांधीवर इतरत्र चर्चा करा असे सांगितल्यामुळे हा वेगळा पंक्तिप्रपंच. आता मुळ विषयाकडे. गांधीबद्दल सरळसरळ चर्चा करण्यासाठी हा लेख सुरु करत आहे. काही मुद्दे मांडत आहे.

काही अपेक्षा.... मिपाकरांकडून

लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 14/12/2008 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
खुलासा- हे विचार आम्ही धोंडोपंत आपटे या एका मिपाकराच्या भूमिकेतून मांडत आहोत. आमच्या मिसळपाव डॉट कॉमच्या मॉडरेटर पदाचा या विचारांशी काहीही संबंध नाही. मिपाच्या संपादक मंडळाला हे विचार पटतील किंवा पटणारही नाहीत. सध्या मिपाच्या संपादक मंडळाची एसटी इतकी खचाखच भरलेली आहे की, काहींना त्यात बसायला देखील जागा नाही. असो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट संपादक मंडळातील काहींना पटणे आणि काहींना न पटणे हे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांच्या पटण्या किंवा न पटण्याकडे फारसे लक्ष देण्याचे कारण नाही. बरं होतं असं की , विदेशी प्रवासी आले की त्यांना जागा खाली करून द्यावी लागते.

उद्धव

लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 14/12/2008 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, छंदशास्त्राच्या सदरात आज नवीन वृत्त घेऊन येत आहोत. ते म्हणजे उद्धव. हे मात्रा वृत्त आहे. मात्रावृत्ताला जाती असेही म्हणतात. आजपर्यंत जे छंद पाहिले त्यात अक्षरांची संख्या पाहिली. अक्षर लघु आहे की गुरू याला छंदात महत्व नाही. मात्रावृत्तांमध्ये अक्षरसंख्या कमी जास्त असली तरी चालते पण मात्रा मात्र नेमक्या व्हायला हव्यात. लघु अक्षराची एक मात्रा आणि गुरू अक्षराच्या दोन मात्रा. हा नियम सर्वत्र लागू. जेव्हा एखाद्या अक्षराच्या आघात हा त्याच्या आधीच्या अक्षरावर येतो तेव्हा ते लघु असले तरी गुरू धरले जाते हे लक्षात ठेवायचे. उच्चारणानुसार मात्रा मोजल्या जातात.

ठाणे ' मिपा ' कट्टा

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी रविवार, 14/12/2008 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, ठाण्याला एखादा ' मिपा कट्टा ' आयोजित करावा असे फार दिवसांपासून मनात आहे. सर्वांची अनुमती असेल तर दि. २८ / १२ / २००८ रोजी सायंकाळी चालेल का ? स्थळ : 'लक्ष्मी केशव कार्यालय' खोपट ठाणे (प.) बाकी इतर प्रोग्राम नंतर ठरवता येतील .

कस्ट्म ड्युटीबाबत माहिती हवी आहे

लेखक गणा मास्तर यांनी रविवार, 14/12/2008 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, मी सुट्टीसाठी घरी भारतात जात आहे. मल कस्ट्मच्या नियमांबाबत थोडी माहिती हवी होती. माझ्या मनात काही शंका आणि प्रश्न आहेत. १) छोट्या छोट्या भेटवस्तु जसे की फ्रेम, किचेन, या गोष्टी पण कस्टम ड्युटीमध्ये मोडतात का? २) वैयक्तिक वापरातील लॅपटॉप, कॅमेरा, आय पॉड जे इथे जपानमध्ये खरेदी केले आहे त्यावर कस्टम ड्युटी भरावी लागेल का? ३) एकुण किती रकमेपर्यंत कस्टम ड्युटी भरावी लागत नाही? ४) जर कस्टम ड्युटी भरावी लागली तर ती किती असते आणि कोण्त्या चलनात भरता येते ? धन्यवाद, आपला गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक) अवांतर : खरेतर काही लोकांना पत्र टाकुन ही माहिते विचारली होती.

दोन मराठी नाटक बद्दल....

लेखक शिशिर यांनी रविवार, 14/12/2008 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
मला खालील दोन मराठी नाटकांच्या C.D./Video Cassates कुठे मिळू शकतील. मि. पा च्या सदस्यांना माहिती असल्यास कृपया कळवावे. (१) शू कुठे बोलायचे नाही.---प्रशांत दामले, वंदना गुप्ते, कविता लाड आणि अरुण नलावडे. (२) मी तर बुवा अरधाच शहाणा.--- कलावंतांची नावे आठवत नाही... दोन्ही नाट़क सुरेख आहेत.

एक रुबाई किंवा चारोळी

लेखक दत्ता काळे यांनी रविवार, 14/12/2008 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
मी रचलेल्या ह्या चार ओळी चारोळीमध्ये मोडतील कि रुबाईमध्ये ते माझ्या लक्षात येत नाही. पापणी लवली तरीही कळते डोळ्यामधली भाषा कळते मज ते रुप गोजिरे पदर असो वा गोषा

हे भारतीयांनो

लेखक तिमा यांनी रविवार, 14/12/2008 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
हे भारतीयांनो, मुंबईच्या दहशतवादी हल्यानंतर तुम्ही जो आक्रोश, आदळआपट आणि तमाशा चालवला आहे तो बघून तुम्हाला जग हसत आहे. मेणबत्त्या लावणे, मानवी साखळी तयार करणे, नेत्यांवर आगपाखड करणे, रोज पाकिस्तान सरकार तुमच्यासाठी काय करते यावर डोळे लावून बसणे, रोज त्या 'कसाब' बाळाचा फोटो पेपरांत जागोजागी छापणे असे करुन काहीच साध्य होणार नाहीये. तुम्ही रोज किती जबाबदारीने वागता त्याचा प्रामाणिक आढावा घ्या. एवढे सगळे झाले तरी, रहदारीचे नियम तोडणे, कायदा फक्त इतरांसाठी आहे असे समजणे, लांच देणे व घेणे, चकाट्या पिटणे हे सर्व आहे तसेच चालू आहे.

कपॅसिटर आणि इन्व्हर्टर

लेखक आनंद घारे यांनी रविवार, 14/12/2008 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
या महत्वाच्या विषयावर झालेली चर्चा वाचून चाळीस वर्षांपूर्वी शिकलेल्या विजेसंबंधीच्या ज्ञानावरला गंज थोडा झटकला गेला. त्यातल्या क्लिष्ट गणिताचा संदर्भ टाळून या विषयीची माहिती सोप्या शब्दात देण्याचा हा एक अल्प प्रयत्न आहे. ते करतांना तपशीलात कांही तांत्रिक त्रुटी आल्या असल्या तरी या विषयाचा मुख्य गाभा शक्य तो शाबूत ठेवण्याचा प्रयत्न मी या लेखात केला आहे. आपल्या घरी जो वीजपुरवठा असतो तो एसी (आल्टर्नेटिंग करंट) या प्रकारचा म्हणजे आलटून पालटून दोन्ही दिशांना वाहणारा असतो.