Skip to main content

भयकथा आणि वातावरण निर्मिती

लेखक व्यंकु यांनी बुधवार, 17/12/2008 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
आजतागायत आपण अनेक भूताखेतांच्या गोष्टी ऐकल्या त्यातील काही गोष्टी नंतर आठवल्या कि काहीवेळा हसुही पण अशा कथा ऐकण्यास अनुकूल वातावरण असेल तर मात्र अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही.

ब्लॉग

लेखक जयेश माधव यांनी बुधवार, 17/12/2008 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
मला blogspot.com वर माझा ब्लॉग बनवायचा आहे.कुणी मला मदत करेल काय?

(भासमान)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 17/12/2008 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
नेहेमी दिसणार्‍या अनेक अनोळखी पण आवडणार्‍या पोरी जेव्हा अचानक दिसायच्या बंद होतात तेव्हा त्यांची प्रकर्षाने आठवण येते आणि मग ज्या त्या मुलीत त्या मुलींचे भास होऊ लागतात.
Taxonomy upgrade extras

भासमान

लेखक पॅपिलॉन यांनी बुधवार, 17/12/2008 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
नेहेमी दिसणारी एखादी अनोळखी पण आवडणारी व्यक्ती जेव्हा अचानक दिसायची बंद होते तेव्हा तीची प्रकर्षाने आठवण येते आणि मग जळी-स्थळी त्या व्यक्तीचे भास होऊ लागतात. अवचित कोठे, कुण्या दिशेने भासमान तू होते हर्ष, खेद, हुरहुर, विशादीं मनास बूडवून जाते आकृती कुठे वा नाद कुठे, नुसत्याच कुठे वा बटा कुठे धुंद ती झाडे अथवा कुठे झिंगल्यां वाटा गर्द वादळी तीच हवा, त्या हलक्या वर्षाधारा रणरणत्या त्या उन्हातला वा ऊष्ण सुगंगित वारा हसले कोणी गोड तिथे वा अडखळी ती चाल नजर बावरी असे कुणाची, तेच शर्मिले गाल नसे जरी तू रूपांमध्यें या, अरूप तुझी ही मूर्ती असे चिरंतर हृदयामध्ये, दृष्यमान भोवती
Taxonomy upgrade extras

फर्जाना यादव ( लोकल गोष्टी-२)

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 17/12/2008 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
फर्जाना यादव =============================================== त्या दिवशी रोजच्या सारखीच मी ऑफिसला निघाले होते तसं फारसं काम नव्हत, शनिवार.. आणि सोनूच्या शाळेला दिवाळीची सुट्टी असल्याने घरीही सगळे जरा सैलावले होते.. त्यामुळे मलाही ऑफिसला जावेसे वाटत नव्हते.. ऑफिसला दांडी मारावी असा विचार सारखा सारखा मनात येत होता.. पण बहादूर (आमचा ड्रायव्हर) दारात येऊन उभा राहिला.. त्यामुळे मग मी ही आळम-टळम न करता गाडीत जाऊन बसले. रोज सोनू आणि मी आमच्या गाडीने त्याच्या शाळेला जातो..आणि मग तिथूनच मी ऑफिसला जाते. आता सोनूचा शाळेला सुट्टी असल्यामुळे बहादूर माझ्या दिमतीला आहे..

सहज भेट्ली----

लेखक पुष्कराज यांनी बुधवार, 17/12/2008 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
सहज भेट्ली वाटेवर ती बर्‍याच दिवसानंतर ओळ्ख पटुनी गाली बर्‍याच दिवसानंतर रंग रेशमी उधळून आले नभात दाटे लाली क्षीतिजावरचे मुग्ध चांदणे फुलुनी आले गाली आनंदघन संध्या झाली बर्‍याच दिवसानंतर सहज भेट्ली वाटेवर ती बर्‍याच दिवसानंतर उपचाराच्या मोडूनी सीमा हाती घेतला हात वळ्णावरती अवघड वेड्या सहज देशील साथ? गडबडली आणि लाजली मान घातली खाली त्या मौनाचा अर्थ सांगण्या कोकीळ धाउन आली आनंदाची उधळ्ण झाली बर्‍याच दिवसानंतर सहज भेट्ली वाटेवर ती बर्‍याच दिवसानंतर
Taxonomy upgrade extras

अवांतर प्रतिसादांवर उपाय -अपडेटेड

लेखक टारझन यांनी बुधवार, 17/12/2008 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सर्व संपादक मंडळ , तात्या आणि माण्यवरांची आधीच माफी मागत आहे, णमस्कार्स लोक्स, आज आम्ही फार चिंतीत आहोत, कितीही काहीही झालं तरी हल्ली मिपावर हे अवांतर प्रतिसादांचा लोंढा काही थांबतच नाहीये ... कोणी बोंबलाची प्रतिकृती मागतो ... त्यावर कोणी "कच्चे बोंबील" ही पाकृ देतो ( कोण चावट आहे रे तो ... म्हणजे दिसायला तर रिलेव्हंट .. पण मायंदळ अवांतर ) आणि कोणती तरी गैंग मधीच येउन " टोटल अवांतर " चा गेम सुरू करते .... अरेच्च्या .... मला काळजी वाटायला लागली ... म्हणून आम्ही हा धागा काढत आहोत ...

स्वतः स्वयंपाक करणार्‍या विद्यार्थ्यांची (खास करुन अमेरिकेत अपार्टमेंट शेअर करणार्‍या) खास पाककृती

लेखक खालिद यांनी बुधवार, 17/12/2008 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेत आलेले बहुतेक विद्यार्थी (९५%) हे अपार्टमेंट शेअर करुन राहतात. (काय करतात बिच्चारे; धीरुभाईंचा लाल अथवा तत्सम एखादाच असतो.) त्यामधे बर्‍याच गोष्टी या परस्पर सामंजस्याने कराव्या लागतात (उदा. बाथरूम वर राज्य करण्याच्या वेळा, एकमे़कांच्या झोपेच्या वेळा सांभाळणे वगैरे वगैरे). यामधे महत्वाची गोष्ट म्हणजे जेवण करण्याच्या वेळांची वाटणी. पण कितीही सोयीस्कर वेळांची वाटणी केली तरी काही जणांना नेमक्या वेळी काम निघते (बर्‍याच वेळी आळस येतो) तर काही बिचार्‍यांच्या हातात गुणच नसतो. अशा वेळी शंभरातील नव्याण्णव वेळा केली जाणारी ही पाककृती.

विश्वास नांगरे पाटिल - (आय.पी.एस.)

लेखक नाम्या झंगाट यांनी बुधवार, 17/12/2008 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
सनदी अधिकारी विश्वास नांगरे पाटिल पोलिस खात्यात काम करत असतात तसेच ग्रामीण भागातील विकासासाठी तेथिल युवकांचे संघटन, विदयार्थी मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या एका हायस्कूल मधील भाषणाचा दुवा येथे आहे. जरुर वेळ द्या....... CLICK HERE FOR VIDEO - http://video.google.com/videoplay?docid=6023553283275749875 त्यांचीच आवड्ती कविता - To dream ... the impossible dream ... To fight ... the unbeatable foe ... To bear ... with unbearable sorrow ... To run ...