खमंग,खुसखुशीत,खुमासदार थालिपीट...आणि पौष्टिकसुद्धा...
१.पावसाळ्याचे दिवस आहेत....आपण मुसळधार पावसातुन भिजत भिजत नुकतेच घरी आणि त्यातही माहेरी...पोचलो आहोत...आता २ दिवस माहेरी आराम म्हणून आपण जाम म्हणजे जाम खुष आहोत ...कॄपया लग्न झालेल्या पुरुषांनी दातओठ खाउ नयेत :-) बायकोला कधीकधी माहेरी जाउ द्यावे (ह.ध्या.)...आज शुक्रवार आहे ...म्हणजे आता २ दिवस मज्जा :-) ..आपण घरात येतो..मस्त फ्रेश होउन कपडे बदलतो....आणि आई भूक असं ओरडत स्वयंपाकघरात घुसतो....आणि गरम गरम...वाफाळत्या..खमंग थालिपीटाची डिश हातात येते :-)...
२.मस्त गुलाबी थंडीचे दिवस आहेत...आपण पहाटे पहाटे ( प्रत्येकाने स्वतःला झेपत असलेली वेळ वाचावी ..)मस्त फिरुन वगैरे आलेलो आहोत (कधी नव्हे ते .
मिसळपाव