Skip to main content

शुभेच्छा!!

लेखक जयेश माधव यांनी बुधवार, 31/12/2008 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
:H सरत्या वर्षाला बाय बाय करुन नविन वर्षाचे स्वागत करुया!! :SS :-C मिसळपाव वरील सर्वा॑ना नविन वर्षाच्या मनापासुन हार्दिक शुभेच्छा!!! :-C जयेश माधव

पायनॅपल-वॅनिला केक!

लेखक रेवती यांनी बुधवार, 31/12/2008 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- मैदा १.५ कप, साधी साखर (पिठीसाखर नको) १ कप, बेकिंग पावडर २ टी स्पून, मीठ २/३ टी स्पून, लोणी ७ टेबल स्पून, दूध २/३ कप, व्हॅनिला इसेन्स १ टी स्पून, अंडी २. बेकिंग पॅन, हँड मिक्सर. कृती : - एका भांड्यात मापाचे कक्ष तापमानाचे (रुम टेंपरेचर) लोणी व साखर चमच्याने एकजीव करुन घ्यावे. दुसर्‍या भांड्यात अंडी फोडून चमच्याने फेसून घ्यावीत. पहिल्या भांड्यातील लोणी साखरेचे मिश्रण फेसलेल्या अंड्यात मिसळावे. चमच्याने हलवून घ्यावे. आता मापाचा मैदा घेऊन त्यावर मीठ व बेकिंग पावडर घालावी. हळूहळू मैदा भांड्यातल्या मिश्रणात टाकावा आणि चमच्याने हलवून सारखे करावे.

गझनी/गजनी आणि करमणुक

लेखक कोलबेर यांनी बुधवार, 31/12/2008 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
१५ मिनिट टीकणारी स्मृती घेउन प्रेक्षक चित्रपट बघायला येतात ह्या समजातुन आमिर खानचा नविन गझनी हा चित्रपट बनवला आहे. समोरच्या प्रसंगात काय चालले आहे ह्याची १५ मिनिटापुर्वीच्या चित्रपटाशी सांगड घालायचा प्रयत्न केलात तर तुम्ही फसलात. कशाचा कशालाही आगापीछा नाही.

कॉम्पीटीशन

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 31/12/2008 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो, हे पत्र जरा देउन याल का"? मला रस्त्यात मिळाले आहे. घरात शिरताना पहिले वाक्य. मी पत्ता बघितला. नीटसा कळला नाही. माझा गोंधळ बघुन लगेच कुटूंब उद्गारले., "गेट्मधुन बाहेर पडल्यावर उजव्या हाताला दुस-या गल्लीत चवथी बिल्डींग, १७ माळ्याचा टॉवर आहे.". बहुतेक प्रिमियम ची नोटीस होती. "जाताच आहात तर इंटीरियर पण बघुन या". कीचन जरा नीट बघा. आता पोस्ट्मनला किचन दाखवायची नविन सिस्टीम सुरु झाल्याची मला कल्पना नव्हती. उच्च्च मध्यमवर्गियांचा टॉवर होता तो. दरवाजा उघडला. समोर मालकिण बाई उभ्या. मी पत्र हातात दिले. पुढे काय बोलणार इतक्यात त्याच म्हणाल्या.

स्लमडॉग मिलिनेअर

लेखक अनामिक यांनी बुधवार, 31/12/2008 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
स्पॉइलर अलर्ट : चित्रपटातील कथानक ज्यांना माहीत करून घ्यायचे नाही त्यांनी लेख वाचण्याची तसदी घेउ नये. झोपडपट्टीत राहणाऱ्या कोण्या एका चहावाल्या मुलाने 'कौन बनेगा करोडपती' मध्ये एक करोड रुपये जिंकलेत तर तुमचा विश्वास बसेल? नाही बसणार ना? वाटलंच! कारण काहीही असो, सामान्य माणसाच असामान्य कृत्य पाहून आपल्या मनात कौतुक नंतर, संशय पहिले येतो. कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय असं वाटतं. आणि असंच होतं स्लमडॉग मिलिनेअर या चित्रपटात. (या वीकएंड ला पाहिला आणि खरंच खूप आवडला!!) चित्रपटातला नायक जमाल मलिक कॉल सेंटरमध्ये चहावाल्याचं काम करत असतो.

गझनी (घजिनी)बद्दल काय मत आपले.

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी मंगळवार, 30/12/2008 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
आताच आलेला अमिरखानचा 'गझिनि' (किंवा घजिनी) हा चित्रपट पाहण्यात आला. या चित्रपटाने येण्यापूर्वी फार हवा केली होती. त्यासाठी आमिरने कमावलेली देहयष्टी आणि या चित्रपटाचे प्रोमोज् लक्षवेधी ठरले. मूळ संकल्पना 'मोमेंटो' या इंग्रजी चित्रपटावर बेतलेली आहे. परंतु खरे सांगायचे तर या हिंदी मोमेंटो ने मूळात मनावर पकडच घेतली नाही. बर्‍याच न पटणार्‍या घटना यात दाखवल्या आहेत. कदाचित आमिरच्या आधीच्या चित्रपटांमुळे अपेक्षा वाढल्या होत्या आणि त्यामुळे गझिनी नाही आवडला असेही झाले असेल.

मिपा कट्टा ठाणे ; संपन्न झाला

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी मंगळवार, 30/12/2008 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, दि.२८:१२:२००८ रोजी पहिला ठाणे " मिपा कट्टा " झक्कासपणे संपन्न झाला. श्रीयुत संतोष जोशी ; तात्या अभ्यंकर ; संकेतजी कळके ; श्री विनायक प्रभू ; श्री रामदास ; मदनबाण ; देवदत्त (सपत्नीक) ; वाहिदा ; प्रगती ; सुनील ; श्री हेमंत बर्वे ; श्री चंद्रशेखर गोखले ; मंदार धारप ; अतुल परांजपे . हे सर्व मिपाकर उपस्थित होते. बरोबर ४.३० वाजल्यापसून मंडळी जमावयास सुरूवात झाली. प्रथम चहा नंतर मिक्स भजी ( कांदा,बटाटा,मूग्,सिमलामिरची) अशी चविष्ठ सुरूवात झाली. प्रथमच भेट होत असली तरी अनौपचारिकपणाचा बुरखा गळून पडायला जराही वेळ लागला नाही. हळू हळू गप्पा रंगायला लागल्या. आणि सरांकडून अतुलला फर्माईश