Skip to main content

पनीर बटर मसाला

लेखक कोलबेर यांनी शनिवार, 03/01/2009 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
पनीर बटर मसाला माहितीचा स्त्रोत/ चीफ शेफ : सौ. कोलबेर साहित्य : पनीर ४०० ग्रॅम क्रिम (हाफ ऍंड हाफ) १ टेबल स्पुन लोणी काजु पेस्ट (१०-१५ काजुंची) जिरे १ टी स्पुन तमालपत्र १-२ चवी पुरते मीठ १ चमचा साखर कश्मिरी लाल तिखट पावडर २ मोठे चमचे हळद चिमुटभर १ चमचा गरम मसाला मसाल्यासाठी : दालचिनी १ काडी, मिरे ८-१०, लवंग ५-६ १ मोठ्या कांद्याची पेस्ट टोमेटो प्युरी (३ टोमेटोची) आलं + लसुण + हिरवी मिरची + कोथिंबीर पेस्ट कृती : एका भांड्यात तेल तापवावे.

मी आलो.

लेखक रेझर रेमॉन यांनी शुक्रवार, 02/01/2009 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी आलो आणि नवी पृथ्वी, माझ्या पायी पसरली. मी आलो आणि नवा स्वर्ग माझ्या शीरी उतरला मी या पृथ्वीवर आलो आणि हा माझ्यासाठी शांत निवारा ठरला हे ग्रह-तार्‍यांच्या देवतांनो.... हा राजा तुम्हाला नम्रपणे आपल्या हॄदयाचा नजराणा अर्पण करतोय.

!! केयर टेकर !!

लेखक अनिल हटेला यांनी शुक्रवार, 02/01/2009 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रींग ट्रींग !! सकाळची १०.०० ची वेळ ! इन्सपेक्टर प्रधानांची केबीन! हातातला चहाचा कप खाली ठेवत त्यानी फोन रीसीव्ह केला.. "नमस्कार!इन्सपेक्टर प्रधान बोलतोये" "नमस्कार साहेब ,मी कोमठेकर ! थोडं काम होत..४ दिवस झालेत आमचा केयर टेकर चंदु पवार गायब आहे..नाही मिसींगची कंप्लेंट केलीये .आणी सर्व नातेवाइक ,ओळखीचे ,मित्र-परीवार सर्वाना फोन झालेत.' "काळजी करु नका कोमठेकर ..मी बघतो..ठीकाये ...येतोये मी तासाभरात बंगल्यावर...धन्यवाद' कोमठेकर !! साधारन पन्नाशीचा ग्रुहस्थ ! तसा सिंगापूर लाच स्थायीक ..स्वतःचा बीजनेस...नवरा -बायको आणी एक कन्यारत्न..तेसुद्धा उच्चशिक्षणासाठी अमेरीकेत...

साजुक तुपाचा शिरा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 02/01/2009 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
सजुक तुपाचा शीरा साधारण ४ थीत असेल त्या वेळी शनिवार होता शाळा १/२ दिवस होति. घरी आलो दप्तर ठेवल. हात पाय धुतले.... "अरे आपल्याला पारखी काकु कडे जायचय, समाचाराला.. तु चल माझ्या बरोबर....सोबत" आईन हुकुम सोडला आम्हि दोघे निघलो पारखी काकुकडे, अरे तुला पारखी काका माहित आहेत ना ते गेलेत.. आई माझ्या फारस लक्षांत आल नाहि..

तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

लेखक दिपक यांनी शुक्रवार, 02/01/2009 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारे वर्ष सुखसमाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे व आरोग्याचे जावो हीच सदिच्छा. :)

मनाच्या कुपीतले-कोऽहमचा पुकारा

लेखक विनायक पाचलग यांनी गुरुवार, 01/01/2009 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो नववर्षाच्या शुभ प्रसंगी आपणा सर्वाना वास्तवदर्शी शुभेच्छा देणारा हा लेख . हे लिखाण थेट मनाच्या कुपीतुन उतरलेले.
कोऽहमचा पुकारा
3........ 2......... 1 .......... आणि 2008 साल संपले. वर्तमानातून इतिहासात गेलं. नव्या कॅलेंडरसोबत सर्वांनी नव्या आवेशाने, उमेदीने, जिद्दीने नवे आयुष्य जगायला सुरूवात केली आणि या सालाचा श्री गणेश करताना बहुतेक जण भूतकाळात डोकावले. भूतकाळातल्या घटना भविष्य घडवतात हे त्रिवार सत्य आहे. म्हणूनच वर्षाअखेरीला घेतल्या जाणाऱ्या या आढाव्याला महत्व आहे.

वन्स मोअर,

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 01/01/2009 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
वन्स मोअर, का पलिकडुन खुणावते आहे, मला कुणी का आठवुन देते,जे विसरले, मला कुणी चुंबनाचि गोडी, टाकली पुसुन, ओठावरुन मी का करुन देते आठवण,अधर चाळवुन ,मला कुणी फाडल्या, केल्या नष्ट ज्या प्रेम कविता मी का ऎकवते आहे ,ते प्रेमगीत, मला कुणी कधिराग,कधि अनुराग,कधि प्रेम,कधि आग, कधि हो, कधि नाहि,का गोंधळुन टाकतय, मला कुणी मुश्किलिन बुजत आहेत घाव, धरल्या खपल्या का उकलत आहे त्या,दंतव्रण दाखवुन, मला कुणी चुकलो,गमावल सारे, हरलो, ह्या खेळात मी का करतय उद्युक्त पुन्हा, डाव खेळण्या, मला कुणी पडला पडदा, संपली ,तिन अंकि शोकांतिका का सारखा वन्स मोअर, देत आहे, मला कुणी अविनाश. बेभान स्वछ्छंदि मुक्त जिवन
Taxonomy upgrade extras