मुड
नमस्कार,
मुडी मिपाकर,
मस्त पैकी मुड मध्ये येऊन, मी "मुड" बद्दल लिहित आहे. :)
तर मुडी मिपाकरहो, या "मुड"चा महिमा अघाध आहे. जेव्हा पासुन आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणिव यायला लागते तेव्हा पासुन हा "मुड" आपल्या मध्ये शिरतो, तो आपला इहलोकी प्रवास संपल्यावरच तो जातो. :)
लहान बाळ कधी खुप छान हसुन बोलक्या डोळ्यांतुन आपल्याशी हु, हु करत असते. काही तरी बोलत असते, स्वत:च्या विश्वात हरवुन स्वारी खेळत असते. तर कधी आपण त्याच्या ओळखीचे असलो तरी आपल्याकडे काही न बोलता गप पहात बसते. आपल्या कडे फारसे लक्ष न देता स्वत:च्या विचारात गढुन गेल्या सारखा चेहरा करून बसते.
मिसळपाव