शिक्षणाचे ओझे झाले आहे का?
मित्रवर्य 'एक तू ही निरंकार' यांना फोन केला.
बोलणे संपताना सहज म्हणून परीवाराची चवकशी...
मुलगी इयत्ता चॉथी.. अभ्यासच करत नाही.
येतं सगळं, पण करायलाच मागत नाही.
मी - ही - आणि आई, प्रयत्न करून थकलो. काही रीस्पॉन्सच नाही.
तिला समजावून, धमकावून, चढवून, पाहिलं... नाहीच. शेवटी पूर्ण तिच्यावर सोडलं तर भलतंच...
आता नव्वदच्या खाली आलीय... वार्षिक पर्यंत वर आली नाही तर तिची तुकडी बदलेल. मग 'ढ' मुलां सोबत बसायला लागेल.. सगळं फ्युचर अपसेट होईल. काय करू आम्हाला कळेनासं झालंय.
मित्र अतिशय हुशार, स्वतः यशस्वी इंजिनिअर, त्यात यशस्वी शिक्षक. मुलगी किंगजॉर्जला.. गोड, लाघवी.. चॉथी पर्यंत उत्तम प्रगति....
काय झाले असेल?
त्याला डॉ. मनोज भाटवडेकरांचे, "आपण आणि आपली मुले" वाचायचा सल्ला...
मित्र चुकतोय की मुलगी.. मग घरोघर हीच तक्रार ऍकू का येते.
अति अपेक्षा धरणारे पालक. आपलं मुल आपल्या सारखंच झालं पाहिजे हा हट्ट ... की मुलांकडे त्यांच्या सर्वांगीण प्रगतिकडे दुर्लक्ष करणारे शिक्षक? की आजची शि़क्षण पद्धति, की जीवघेणी अर्थार्जन स्पर्धा?... यात घुसमट कुणाची होतेय? मित्र चुकतोय का? पुस्तक वाचून तो आचरेल का? दीज आर ऑल फंडामेण्टल क्वेश्चन्स चिको! शाळेत गति नसलेल्यांना आपण मंदबुद्धी का समजतो? शिकल्या - सवरल्या मंदांचं काय? हू इज किडिंग मी... चिको ?
वाचने
2535
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
शक्तिमान
शक्तिमान
In reply to शक्तिमान by लिखाळ
मास्तर, कुठे आहात?
संपर्क
संपर्क.
In reply to संपर्क by विनायक प्रभू
उत्तर
In reply to संपर्क. by रेझर रेमॉन
शाळेतली प्रगती ..
असं बघा मॅडम..
In reply to शाळेतली प्रगती .. by मनीषा