Skip to main content

मुड

लेखक शितल यांनी सोमवार, 05/01/2009 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मुडी मिपाकर, मस्त पैकी मुड मध्ये येऊन, मी "मुड" बद्दल लिहित आहे. :) तर मुडी मिपाकरहो, या "मुड"चा महिमा अघाध आहे. जेव्हा पासुन आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणिव यायला लागते तेव्हा पासुन हा "मुड" आपल्या मध्ये शिरतो, तो आपला इहलोकी प्रवास संपल्यावरच तो जातो. :) लहान बाळ कधी खुप छान हसुन बोलक्या डोळ्यांतुन आपल्याशी हु, हु करत असते. काही तरी बोलत असते, स्वत:च्या विश्वात हरवुन स्वारी खेळत असते. तर कधी आपण त्याच्या ओळखीचे असलो तरी आपल्याकडे काही न बोलता गप पहात बसते. आपल्या कडे फारसे लक्ष न देता स्वत:च्या विचारात गढुन गेल्या सारखा चेहरा करून बसते.

हरीश्चंद्र्गड [१२-१४ डिसेंबर]

लेखक संताजी धनाजी यांनी सोमवार, 05/01/2009 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मी नुकताच हरीश्चंद्र्गडावर जाऊन आलो. हा गड माळशेज घाटाजवळ आहे. खरेतर ह्या गडावर मी तिसर्र्‍यांदा जात आहे. परंतु ह्या वेळी तीन दिवसांचा ट्रेक केल्यामुळे गड नीट पाहता आला. खुप मजा आली :) ब्लॉगस्पॉट्वर ब्लॉगही लिहीला आहे. तो इथे वाचा. फक्त छायाचित्रे जूलै मध्ये रतनगडावर जाऊन आलो होतो. रतनगड भंडारदर्‍याजवळ आहे.

"मम मरण पाहिले मी, म्यां डोळा"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 05/01/2009 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्यकांत सुखटणकर माझा शाळकरी दोस्त.मी त्याला सूर्याच म्हणायचो.तो शेवटी वकील झाला आणि मी इंजिनीयर.एरव्ही आमची दोस्ती कायम राहिली नसती पण आम्हा दोघानाही पहिल्यापासून मराठी नाटकं बघण्याचा नाद असल्याने कुठे ना कुठे नाटकाच्या थिएटरमधे आमची भेट व्हायचीच. सूर्याची वकीली नीट नाही चायलायची.बिचारा दिवसभर कोर्टात राबून दिवसाची जेमतेम कमाई करायचा.मला वाटतं,एका एका व्ययसायाला ज्याचा त्याचा स्वभाव-धर्मगूण हा ही काही प्रमाणात मदत करीत असतो.तसं पाहिलं तर सूर्या अगदी साध्या स्वभावाचा. छ्क्के-पंजे त्याला माहित नव्हते.ते ह्या वकीली व्यवसायाला प्रकर्षाने जरूरीचे असतात.खोट्याचं खरं आणि खर्‍याचं खोटं करायला चलाखी

भारत खरचं.....

लेखक ए. प्रशांत यांनी सोमवार, 05/01/2009 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
धर्मनिरपेक्षवादाची देशाची व्याख्या : जिथे कुठल्याही धर्माला राजमान्यता नसते. परंतू तेथिल जनतेस ते मानत असलेल्या धर्मास, ईश्वरास व त्यांच्या समाजातील चालीरिती व्ययक्तिकरीत्या मानण्याची मुभा असते. तो देश म्हणजे धर्मनिरपेक्ष देश. स्वयंघोषीत धर्मनिरपेक्षवादी राजकीय पक्षाच्यानुसार धर्मनिरपेक्षवादाची व्याख्या : ह्या देशातील मुळ व बहूसंख्य हिंदू धर्मीयांचा द्वेष करणे त्यांना जाती-जातीत विभागुन ठेवणे.

शिक्षणाचे ओझे जड झाले आहे का?

लेखक रेझर रेमॉन यांनी सोमवार, 05/01/2009 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षणाचे ओझे झाले आहे का? मित्रवर्य 'एक तू ही निरंकार' यांना फोन केला. बोलणे संपताना सहज म्हणून परीवाराची चवकशी... मुलगी इयत्ता चॉथी.. अभ्यासच करत नाही. येतं सगळं, पण करायलाच मागत नाही. मी - ही - आणि आई, प्रयत्न करून थकलो. काही रीस्पॉन्सच नाही. तिला समजावून, धमकावून, चढवून, पाहिलं... नाहीच. शेवटी पूर्ण तिच्यावर सोडलं तर भलतंच... आता नव्वदच्या खाली आलीय... वार्षिक पर्यंत वर आली नाही तर तिची तुकडी बदलेल. मग 'ढ' मुलां सोबत बसायला लागेल.. सगळं फ्युचर अपसेट होईल. काय करू आम्हाला कळेनासं झालंय. मित्र अतिशय हुशार, स्वतः यशस्वी इंजिनिअर, त्यात यशस्वी शिक्षक. मुलगी किंगजॉर्जला.. गोड, लाघवी..

स्ट्रॉबेरीच्या मळ्यात

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 04/01/2009 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईकराला स्ट्रॉबेरी दिसते ती आकर्षक खोक्यात. आणि विकत घेतल्यावर समजते की स्ट्रॉबेर्‍या फक्त पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाईतक्याच आहेत, बाकी खोक्याचा खालचा भाग भरलाय कागदी कपट्यांनी. पाचगणीच्या मॅप्रो उद्यानातुन पाचगणी गावाकडे येताना एका झाडाखाली एक स्ट्रॉबेरीचा ठेला दिसला. गाडी थांबवली. ठेलेवाल्या मामांनी प्रेमानी सार्‍यांना स्ट्रॉबेर्‍या हातावर दिल्या. रसाळ होत्या खर्‍या. मामा हुशार. पोराटोरांना पाहताच म्हणाले, भाव कशाला करता घ्या आपल्या हातान खुडुन, भरा टोपली मग भावाच बघु! मामा जवळच्याच भोसे गावातले. स्वतःचा छोटा मळा होता, सध्या चार महिने स्ट्रॉबेरीचा हंगाम आहे म्हणाले.