Skip to main content

बाप्पाला स्वेटर

लेखक दिपक यांनी बुधवार, 07/01/2009 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात लाडक्या बाप्पाला स्वेटर घालण्यात आले. कालच ही बातमी टीव्हीवर पाहिली होती. स्वेटर आणि कानटोपी घातलेला गंपती बाप्पा फारच क्युट दिसतोय. :)

कंडोम

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 07/01/2009 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
कंडोम भांडवल शाही ख~या अर्थाने रुजवलीत तुम्हि, मालक आता या देशावर तुमचेच राज्य चालु झाले आहे, मालक भाकरीसाठी लढायचा अधिकार काढुन घेतलात मालक नोटा चारुन संप फोडण्यात तरबेज झालात, तुम्ही मालक मजुराचे रक्त खुप स्वस्त दरात मिळते या देशात, मालक ५-५०रु थोबाडावर फेकुन ८तास शॊषायला चटावलात, तुम्हि मालक देशातल्या राज्यकर्त्यांचे खरे रंग उमगलेत आम्हा मालक निळे, तिरंगी, भगवे, सा~यांचा एकच रंग उमगले, आम्हा मालक भांडवल शाहित जाति व्यवस्था चांगलिच राबवलित मालक कंत्राटि कामगार नांवाची नविन जात निर्माण केलित मालक कंत्राटि कामगार, पण कच्चि बच्चि आहेत आम्हाला मालक वापरा,काम झाले फेकुन द्या"अस करायल

फर्निचर

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 07/01/2009 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
तुमचे कधी फर्निचर होते का? परवा घाजीनी बघितला. क्निव्नियंट अम्नेशिया बद्दल मला संपुर्ण माहिती आहे. रोज बघतो. टेंपररी अम्नेशिया सुद्धा माहित असावा. त्याची गरज पण होती. एकुलती एक प्रेमळ बायको तीची आई आली रे आली की फितुर का होते हह्याचे उत्तर गेल्या २३ वर्षात मिळालेले नाही. आणि ते आता मिळेल असे वाटत नाही. तसे सासु आल्यावर जेवणाची अंमळ चंगळ असते. पण तेवढेच. कायम केंद्रबींदु रहाण्याची सवय तशी वाईटच. सासरची माणसे घरी आल्यावर मी एकदम नॉर्मल रहातो. पण ते'जावई' 'भावोजी' 'मान' वगैरे बगैरे ची सवय त्यांना मोडवत नाही. मी कितीही सांगितले तरी. त्यामुळे घरात घुसल्यावार अगदी खडे तालीम असते.

"आई"

लेखक sanjubaba यांनी बुधवार, 07/01/2009 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
कसा आणू शब्दामध्ये सुगंधी दर्वळ..... "आई " म्हणजे वात्सल्याची श्रावणी हिर्वळ..... "आई" तुझ्या आठवणी चांदण्यातले कोवळे ऊन..... तुझ्या मायेचा स्पर्श माझ्या पाठीवर अजुन... "आई" तुझे स्वरुप कसे शब्दरंगात चिता रु..... तू वात्सल्याचे आकाश माझे शब्द इवले पाखरू... "आई" संस्काराची शिदोरी "आई" त्यागाचे प्रमाण..... "आई" प्रेमाची मूर्ती "आई" त्या ईश्वरा समान.... "आई" तुझ्या आठवणीने आज मन हेलावते.... पण तूच दिलेल्या मायेने दु:ख माझे सावरते.... हीच प्रार्थना माझी त्या दयाळु ईश्वराला..... तुझ्याकडे
Taxonomy upgrade extras

प॑चमदा॑ना सलाम

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी बुधवार, 07/01/2009 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रदीपशेटचा घर आजा' वरचा लेख मी जरा उशीराच वाचला. परवाच म्हणजे चार जानेवारीला प॑चम तथा राहुलदेव बर्मन या॑ची प॑धरावी पुण्यतिथी होती. त्या निमित्ताने ह्या छोट्या लेखा द्वारे मी प॑चमदा॑ना आदरा॑जली वाहात आहे. प्रदिपशेटने म्हटल्याप्रमाणे 'प॑चम' हा एव्हढा प्रच॑ड विषय आहे की त्यावर एक महाकाव्य लिहिता येईल! वोह मेरे बस कि बात नहि॑. म्हणून त्या॑च्या पहिल्या चित्रपटातल्या एका गाण्यावर मी लिहायचा मी थोडा प्रयत्न करतो आहे. छोटे नवाबची गाणी प॑चमदा॑चा तसे पहिला प्रयत्न नव्हता. दादा॑बरोबर आराधनातली बरीचशी गाणी प॑चमदा॑नीच केली होती (कोरा कागज था, मेरे सपनो॑ कि).

न्यू इअर रेझोल्यूशन (अर्थात तेरड्याचा रंग तीन दिवस)!

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 07/01/2009 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
४ जानेवारीला ऑफिसबरोबरच व्यायामाचीही सुट्टी संपली आणि काल संध्याकाळी ५ तारखेला नेहेमीप्रमाणेच व्यायामशाळेत (जिममधे) गेलो. माझ्या स्पिनिंग क्लासमधे वेळेआधी पाच मिनिटे प्रवेश केला. बघतो तर ही गर्दी झालेली. बरेच अनोळखी चेहरे उत्साहात सायकल हापसत होते! २२ सायकलींपैकी २१ भरलेल्या, एकच रिकामी म्हणून स्वतःला लक्की समजत उत्साहाने गेलो तर ती मोडली होती. स्वतःशीच चडफडत एखाद मिनिट उभा होतो. जेफ, आमचा इन्स्ट्रक्टर, त्याची बाईक सोडून आला, मोडकी बाईक तपासून म्हणाला "कॅन्ट फिक्स इट नाऊ, लॉट ऑफ वर्क.

चटपटीत तवा फ्राईड कोळंबी

लेखक कोलबेर यांनी बुधवार, 07/01/2009 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
माहितीचा स्त्रोत/ चीफ शेफ : सौ. कोलबेर साहित्य : कोळंबी (श्रिंप/प्रॉन्स) अर्धा किलो चवी पुरते मीठ लाल तिखट १ चमचा हळद चिमुटभर आलं + लसुण + हिरवी मिरची + कोथिंबीर पेस्ट अर्धी वाटी रवा १ लिंबु अर्धी वाटी तेल / तेलाचा (पॅम) स्प्रे कृती : प्रथम कोळंबी व्यवस्थीत साफ करुन त्यावर लिंबु पिळावे. कोळंबी साफ केल्यावर त्यातील पाणी निघाले आहे ना ह्याची खात्री करावी. त्यानंतर त्यात मीठ हळद तिखट हिरवी पेस्ट लावुन कमीतकमी १ तास मुरू द्यावे.

रस्त्यावरून चालताना लहान मुलाला रस्त्याच्या बाजूने का ठेवतात?

लेखक देवदत्त यांनी मंगळवार, 06/01/2009 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज संध्याकाळी स्कूटरवरून घरी येत होतो. समोर एक बाई लहान मुलाला हात धरून घेऊन चालली होती. लहानसा रस्ता असल्याने आधीच रहदारीत एकदम हळू जावे लागते. त्यात लहान मुलगा समोर असल्याने नेहमीच्या सवयीप्रमाणे गाडी हळू नेत होतो. नेमका माझ्या स्कूटरच्या डाव्या बाजूला आल्यानंतर त्याने अशी हालचाल केली की मला त्या कमी वेगातही कचकन ब्रेक दाबावा लागला. अर्थात दोघांनीही एकमेकांना काही न बोलता आमची वाटचाल सुरू झाली. पण कित्येक दिवस मनात असलेला प्रश्न पुन्हा उफाळून आला.

महिला CRICKET खेळाडू

लेखक ज्ञानदा कुलकर्णी यांनी मंगळवार, 06/01/2009 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशामध्ये CRICKET ह्या खेळास खूप GLAMOUR लाभले आहे. आज प्रत्येक खेळाडूला फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते आहे. परंतु हे सारे फक्त पुरुष खेळाडूनाच लाभते. महिला खेळाडू मात्र ह्या सर्वापासून वंचित राहतात. ह्या मागे काय कारण असेल असे तुम्हाला वाटते?