Skip to main content

सारथी : मंदी ,माणूस आणि महाराज...

लेखक ओंकार देशमुख यांनी बुधवार, 14/01/2009 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
जगभर मंदीची लाट जोरदार वहात आहे.अजून वर्षभर तरी ती रहाणार असे आपले अर्थतज्ञ सांगत आहेत.सहाजीकच भारतालाही ती झळ पोचत आहेच.बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.व्यवसाय बंद पडत आहेत.महागाई वाढत आहे.अशा सर्व गोष्टींचा परीणाम शेवटी माणसाच्या मनावर होणारच.मग तो कुठेतरी आधार शोधू लागणार.दान धर्म ,बाबा,बूवा ,महाराज यांच्या कडे ओढला जाणार.तिथे गेल्यावर काळजीतून आपली मुक्तता होईल अशी त्याची भाबडी आशा असणार... हल्ली बाबा ,महाराज, प.पू.

सारथी

लेखक ओंकार देशमुख यांनी बुधवार, 14/01/2009 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मराठी ब्लोग वर मिसळपाव मधून बय्राच जणांच आगमन झालं आधिही मी इथे आलो होतो पण सदस्य झालो नव्हतो.असो आज झालो.माझ्या ब्लोग वरचे नवीन लेखन मी या कट्यावर नक्कीच सादर करीन... http://pune-marathi-blog.blogspot.com/

ज्योतिषावरील काही प्रश्न

लेखक रम्या यांनी बुधवार, 14/01/2009 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
घरी लग्नाची बोलणी सुरू झाली आणि पत्रिका, रास, नाडी, गुण वगैरे वगैरे गोष्टी एकापाठोपाठ एक कानावर येत गेल्या. आजूबाजूचे बरेच लोक रास, नाडी, गुण आणि इतर शब्द अगदी सहजपणे वापरतात पण रास म्हणजे काय? नाडी म्हणजे काय? असे मूलभूत प्रश्न विचारले तर मात्र समधानकारक उत्तरे मात्र कोणीही दिली नाहीत. मिपाच्या सदस्यांपैकी कोणाची मदत घेऊन प्रश्नांची उत्तरे मिळतात का हे पाहण्यासाठी हा लेखन प्रपंच. प्रश्न खालील प्रमाणे १. एखाद्याची रास म्हणजे नक्की काय? एखाद्याच्या जन्मवेळी चंद्र (कि सुर्य?) ज्या राशीत असतो ती त्या व्यक्तिची जन्मरास असं काहीसं ऐकलं आहे. पण नक्की माहीत नाही. २.

आता कुठ कुठ जायाच हनिमुनला

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 14/01/2009 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
हे प्रकटन फक्त 'कोरी पाटी' करिता आहे. मुंबई स्थित नव दांपत्यांकरिता आहे. मी हाताच्या फ्रॅक्चरने हनिमुनला जाउ शकलो नाही. ३ महिने घरीच होतो. नंतर का कुणास ठाउक नंतर जमलेच नाही. आता कुठ कुठ जायाच हनिमुनला लोणावळा, खंडाळा, कोल्हापुरचा पन्हाळा, बेंगलोर, गोवा नि काश्मिरला सदाबहार रेखावर चित्रित हे गाणे लागले की अगदी 'जांबुवंत' जमान्यात लग्न झालेल्या लोकांच्या चेहे-यावर सुद्धा स्मित उमटवते. उसासे येउ लागतात. लोणावळा, खंडाळा हरकत नाही.

जीभ घसरली......की सटकली....

लेखक सुहास. यांनी बुधवार, 14/01/2009 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा माझ्या तिर्थस्वरूपाच्या मुखातुन "सत॑रज्या अ॑थरा"च्या एवजी "अथर॑ज्या सथरा"असे शब्द भर लग्नात बाहेर पडले होते... आणी एक मित्र "चाळ्लेली वाळू"एवजी "वाळ्लेली चाळू" म्हटला होता... कोणाकडे असे मजेदार प्रस॑ग असल्यास सा॑गा... वेळ्खाउ(फालतू)

संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा...!

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी बुधवार, 14/01/2009 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
एक ढकल पत्रा द्वारे आलेलि कविता मजकूर काढून टाकला आहे, क्षमस्व! कृपया हे वाचावे व सहकार्य करावे अशी कळकळीची विनंती.. -- मुख्य प्रशासकीय अधिकारी, मिसळपाव डॉट कॉम.
Taxonomy upgrade extras

पं. उल्हास कशाळकर

लेखक मोहन यांनी बुधवार, 14/01/2009 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
पं. उल्हासजींना या वर्षीचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाल्याचे आजच्या नभोवाणी बातम्यांतून समजले. ग्वाल्हेर, आग्रा, व जयपूर गायकीचा नितांत सुंदर मिलाफ त्यांच्या गायकीत आहे. पं. राम मराठे, पं. गजाननबुवा जोशी, पं. राजाभाऊ कोगजे या गुरुंची परंपरा उल्हाजींनी समर्थपणे पेलली आहे. भारतीय अभिजात संगीताला लोकाभिमूख करण्यातले त्यांचे योगदान खुपच मोठे आहे. उल्हासजींच्या मैफिलींना असलेला युवा वर्गाचा प्रतीसाद पहाता त्यांचे अभिजात संगीतातले दिपस्थंभा सारखे स्थान लक्षात येते.

माहिती

लेखक प्राप्ती यांनी बुधवार, 14/01/2009 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
मला tomato सुप करण्याची पद्धत हवी आहे

माहेती

लेखक प्राप्ती यांनी बुधवार, 14/01/2009 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
मला महिला कोणता व्यवसाय करु शकतात वि़षयी माहेती हवी आहे