Skip to main content

अजय-अतुलचे अफलातून संगीत

लेखक त्रास यांनी रविवार, 01/02/2009 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
अजय-अतुलने एकापेक्षा एक अशी सरस गाणी देउन मराठी चित्रपट संगीतात एक नवे युगच निर्माण केले आहे. ह्या द्वयीचे सगळ्यात जास्त कौतुक ह्याचे वाटते की, त्यांनीच म्हंटल्याप्रमाणे त्यांनी संगीत शिक्षण घेतलेलेच नाही. तरी सुद्धा त्यांचा संगीत अविष्कार इतका तालबद्ध असतो की, त्यांची कीर्ति आंध्रातही पोहोचली व त्यांनी एका तेलगू चित्रपटालाही संगीत दिले. त्यांची गीते ऐकतांना मला रेहमानच्या "थिरुडा-थिरुडा" ह्या तामीळ गाण्यांचे संगीत आठवते. रेहमानच्या सुरुवातीच्या काळातील हा एक संगीतातील अप्रतिम नमुना होता. राजगुरुनगर सारख्या छोट्याश्या गावातील ही जोडी असेच मनपसंत संगीत निर्माण करत राहो.

शिंडीबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! ईथे द्या

लेखक शंकरराव यांनी रविवार, 01/02/2009 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
शिंडीबाई क्रॉफर्ड २० फेबूरवारी २००९ ला ४३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे मान्यवर मिपकरां तर्फे शिंडीबाईंना शुभेच्छा, भावना, कविता, लेख ह्या धाग्यामर्फत पोहोचाव्या ह्या हेतूने हा खटाटोप... शिंडीबाईंना तात्याने निमंत्रण धाड्ले आहे. त्यांचा नजीकच्या काळात मुंबई दौरा होण्याची शक्यता आहे... (सदर कर्यक्रर्माचे आमंत्रण तात्या लवकरच सर्वांनां ?? देईल ) ... ह्या धाग्यावरील शुभेच्छांचे सूंदर पुस्तक, एक नउवारी व कुंकवाचा करंडा शिंडीबाईंना भेट म्हणून दिला जाईल ;-) (अधिक भेटवस्तू सुचवाव्या) शिंडीबाई कोण ? ?

तुम्हाला लिहिता येते ?

लेखक रेझर रेमॉन यांनी रविवार, 01/02/2009 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
भरतकुमार राऊत (राज्यसभेवर जाण्या आधी) यशवंतच्या व्ही.आय.पी. मध्ये भेटले. निमित्त "इको फोक्स" ची स्पर्धा. विषय पर्यावरण... बोलताना विषय आधुनिक मराठी वर आला... मुलांना मराठी नीट बोलता-लिहिता येत नाही असा सूर होता. राऊतांचा विरोध... मुलं मराठीच आहेत आणि ती बोलतात ती भाषा ही मराठीच आहे... लिहितात तो प्रकार मराठीत प्रचलित झाला नसेल तर होईल. आणि नाहीच होऊ शकला तर तिसरा नवा प्रकार येईल. भाषाशुद्धी ही समकालिन संकल्पना आहे आणि तिच्यावर प्रतिगामी विचारांची बळजबरी, संस्कृति या अवजड शब्दा मागून उतरवलेली आहे. मुळात भाषाशुद्धी नावाचा प्रकारच "माझी बोली" या अहं शी निगडित आहे.

तुला पिताना पाहिलं की.......

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 31/01/2009 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा प्रेरणास्त्रोत अनंतसागर ह्यांची तुला हसताना पाहिलं की....... तुला पिताना पाहिलं की कोरड्या ग्लासाला पालवी फुटते आणि दिवसभर कोरडी असणारी सुरई दुथडी भरुन वाहू लागते तुला पिताना पाहिलं की भरलेल्या ग्लासात वसंत अवतरतो चखण्याची चाहूल लागण्या आधीच चमचा काटा फुलवून नाचतो तुला पिताना पाहिलं की त्या बर्फालाही पाझर फुटतो सोडा तर चोहिकडे सप्तरंग उधळीत फिरतो तुला पिताना पाहिलं की टेबल हसू लागतात सर्व खुर्च्या जणू तुझ्यासाठीच गाणे गातात तुला पिताना पाहिलं की तो शेजारचा टेबलवाला तुझ्या पिण्यावर जळू लागतो आणि तु मात्र मदिरेच्या प्रेमात चिंब होऊन भिजू
Taxonomy upgrade extras

तू

लेखक प्रेरणा यांनी शनिवार, 31/01/2009 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
कळलेच नाही मन गेले हळूच गुंतुन साध्यासुध्या डोळ्यांनीही नेले कधी भुलावून तुझ्या श्यामल रंगाचे झाले डोळ्यात आभाळ आणि तुझ्या नावानेच ओठ विलगे सकाळ तुझ्या पाहण्याने फ़ुले येती अंगांगी फ़ुलुन तुझ्यासाठी नजरेत मीही बहर तोलून असे मोकळे हसुन जाशी सहज निघोन ईथे काळ्जाच्या माझ्या ठोका जातो ना चुकून ३१.०१.०९

तुला हसताना पाहिलं की.......

लेखक अनंतसागर यांनी शनिवार, 31/01/2009 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
तुला हसताना पाहिलं की वठलेल्या झाडाला पालवई फुटते आणि वर्षभर कोरडी असणारी नदी दुथडी भरुन वाहू लागते तुला हसताना पाहिलं की भर ग्रिष्मात वसंत अवतरतो पावसाची चाहूल लागण्या आधीच मोर पिसारा फुलवून नाचतो तुला हसताना पाहिलं की त्या मेघालाही पाझर फुटतो इंद्रधनू तर चोहिकडे सप्तरंग उधळीत फिरतो तुला हसताना पाहिलं की फुलं हसू लागतात सर्व पक्षी जणू तुझ्यासाठीच गाणे गातात तुला हसताना पाहिलं की तो चंद्र तुझ्या रुपावर जळू लागतो आणि मी मात्र तुझ्या प्रेमात चिंब होऊन भिजून जातो.
Taxonomy upgrade extras

आमच बी क्वाश्चुम डिजाइन

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 31/01/2009 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
आमच बी क्वास्चुम डिझाईन
तर काय सांगत व्हतो मी. हां आमी कापड घाल्तो ती सोताच उन थंडी वारा पाउस या पासुन सौरक्षन व ल्वॊकांच लज्जा रक्षन याच्यासाटी. आता कापडाच्या आत समदीच मान्स भोंगळी असत्यात म्हनून काय भोंगळ फिरायच? आता यकदा आमची प्यांट लाग्ली गळायला. पट्टा घालायला लागला. लै़च वैताग यायला लागला. मंग आमी ती प्यांट घालन सोडुन दिल. दुसरी प्यांट घालायला लाग्लो. तसे आमी कंच्या बी प्यांटवर कंचा बी शर्ट घालतोय. कापडं घालतोय ह्य काय थोडयं का? काही दिवसांनी ही प्यांट टाईट व्हायला लाग्ली.

शेयर मार्केट - एक अंदाज

लेखक दशानन यांनी शनिवार, 31/01/2009 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
एक ईनो'द -: ह्म्म्म्म ! पडलं पडलं ! मार्केट पडलं ! हे गाणे... आम्ही मागच्या सहा महिन्यात हजारदा गायले...

मोगरा

लेखक जागु यांनी शनिवार, 31/01/2009 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
काल सवडीने रमत गमत बाजारात फिरत होते. फिरता फिरता फुल मंडई लागली आणि त्या मोगर्‍याच्या सुगंधाने मला ओळख दिली. लहान पणा पासुन आवडीचे फुल म्हणजे मोगरा. त्याला मिळालेल सुगंधाच वरदान हे त्याच्या आवडीचे गुपित. लहानपणी ह्या मोगर्‍याची आणि माझी खुप घनिष्ठ मैत्री होती. मोगर्‍याचा वेल माझ्या दारातच होता. एप्रिल मे आणि जुलै ह्या महिन्यांमधे आमचा हा मोगर्‍याचा वेल बहरुन येत असे. मग रोज संध्याकाळ झाली की कळ्या काढायच्या आणि देवाला थोडी फुल बाजुला ठेउन गजरे करायचे. हा नित्यक्रम असायचा. त्या अर्धवट फुललेल्या फुलांसोबत संध्याकाळ अगदी शांत, प्रसन्न वाटत असे.

चीझ लाडू

लेखक समिधा यांनी शनिवार, 31/01/2009 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
CheeseLAdoo साहित्य : लोणी (बटर) : १०० ग्रॅम रिकोटा चीझ : ४२५ ग्रॅम (Ricotta cheese) मिल्क पावडर : ४२५ ग्रॅम साखर :३०० ग्रॅम कृती : प्रथम एका भांड्यात( नॉनसस्टिक्) लोणी गरम करावे. लोणी वितळल्यावर त्यात रिकोटा चीझ घालावे. तेही छान वितळल्यावर त्यात मिल्क पावडर घालुन एकजिव करुन घ्यावे. मग त्यात साखर घालावी. मिश्रण सतत हलवत रहावे. ते भांड्यापासुन सुटु लागले की ताटलीत काढावे. (त्याचा घट्ट गोळा होत नाही.