Skip to main content

बुद्धकथा आणि एक प्रयोग.

लेखक कलंत्री यांनी सोमवार, 16/02/2009 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी अणि माझ्या एका मित्राचे २/३ दिवस कोठेतरी दुर जावे आणि मनोसोक्त आपल्या आवडत्या विषयावर गप्पा माराव्या असे ठरले होते. त्या बेतास अनुसरुन आम्ही नागपुरला आमच्या दुसर्‍या एका मित्राकडे जाण्याचा विचार निश्चित केला. माझ्या मित्राबद्दल सांगणे राहिलेच, माझ्या या मित्राचा भारतातील अथवा जगातील सर्वच प्रख्यात अशा धर्माचा गाढा अभ्यास आहे.

पुस्तक पाहीजे

लेखक chipatakhdumdum यांनी सोमवार, 16/02/2009 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
मला ' प्राचीन पुरूषोत्तम ' हे पुस्तक त्याच्या सर्व भागासहीत कुठे मिळेल. मी सुमारे ४० वर्षापूर्वी ते सर्व भाग वाचले होते.

एक संवाद !

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 16/02/2009 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
सर, नमस्कार ! ओळखलं का ? असे म्हटल्याबरोबर..मनातल्या मनात कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण झाली. पण याचे कपडे काही कर्दमलेले वगैरे नव्हते. अगदी टापटीप होता.त्यामुळे मी जरा स्वत:शीच ओशाळलो. आम्ही नेहमीप्रमाणे एसटी स्टँडवर एस्टीची वाट पाहात होतो. गजबजलेल्या स्टँडवर लोकांची ये-जा चाललेली होती. आणि माझ्या समोर एक तरुण त्याच्या पत्नी सोबत उभा होता. मी त्याच्या चेह-याकडे पाहिले, ओळखीचे कोणतेच चिन्ह त्याच्यात दिसत नव्हते. पण नेहमीचे गुळगुळीत वाक्य फेकुन दिले. पूर्वी भेट झाल्यासारखी वाटते ! पण नेमके सांगता येईना आपण कुठे भेटलो ते! सर, तुमच्या लक्षात कसे राहील?

तिची रुणूझुणू चाल---

लेखक पुष्कराज यांनी सोमवार, 16/02/2009 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
तिचा मोकळा वावर तिचा मोकळा वावर माझ्या अवती भवती माझ्या रोमरोमातून तिचे रोज येणे जाणे माझ्या ह्रद्यी रहाणे कशी जाइल ती दूर तिचा मोकळा वावर तिची रुणूझुणू चाल पायी कळ्या होती फुलं गंध फुलत्या फुलांचा दाटे तिच्या सभोवार तिचा मोकळा वावर तिच्या जीवघेण्या अदा सारे जग होइ फीदा परि माझीच ती सदा माझ्या डोळ्याची झालर तिचा मोकळा वावर तिचे बोलणारे डोळे जणू चांदणे कोवळे त्या डोळ्यांमध्ये खेळे माझ्या प्रेमाची पाखंर तिचा मोकळा वावर तिचे माझे एक होणे नभ धरती मिळणे माझ्या मनातिल गाणे येइ तिच्या ओठावर तिचा मोकळा वावर अशी तीची माझी साथ किती युगांच हे नात माझे ह्रद्य छेडते तिच्या ह्रद्यी सतार तिचा मोकळा वाव
Taxonomy upgrade extras

ही कविता हवी आहे. मिळेल का?

लेखक सालोमालो यांनी सोमवार, 16/02/2009 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मला ह्या चार ओळी मिळाल्या आहेत. पूर्ण कविता कोणाकडे आहे का? कवितेच्या ठेवणीवरून 'ग्रेस' यांची असावी असं वाटतयं. जरा दूर जाती चरायास गाई, पुढे रान नाही हवे तेवढे तुझ्या स्वप्नबांधावरी सांग आई, कुणी फोडले जोगिणींचे चुडे? सालो

गुडिशेव

लेखक मि माझी यांनी सोमवार, 16/02/2009 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , कोणि मला सांगु शकेल का कि 'गुडिशेव ' कशापासुन बनवतात? साखर कि गुळ??

कोलंबीचे हुमण

लेखक प्रभाकर पेठकर यांनी सोमवार, 16/02/2009 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः सोललेली कोलंबी : १ वाटी खवलेला नारळ : १ वाटी काश्मीरी मिरच्या : १०-१२ नग हळद : १/२ चमचा चिंच : लिंबाएवढी तिरफळं :१०-१२ मीठ : चवीनुसार खोबरेल तेल : ३ टेबलस्पून कृती: कोलंबीला हळद आणि मीठ लावून ठेवावे. काश्मीरी मिरच्या मिक्सर मधून फिरवून एकदम वस्त्रगाळ करून घ्याव्यात. खवलेला नारळ, काश्मीरी तिखट, आणि चिंच गंधासारखे मुलायम वाटून घ्यावे. शेवटी तिरफळे घालून मिक्सर १-२ वेळा फिरवावा. पातेल्यात नारळ, तिखट आणि चिंचेचे वाटण घालून गरजेनुसार पाणी घालावे.

सावर ग स्वतःला .....

लेखक मितालि यांनी सोमवार, 16/02/2009 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
सावर ग स्वतःला आवर तुझ्या मनाला... निघून गेलेले क्षण मुठीतील वाळू दोन्ही सारखेच घट्ट पकडशिल तितके वाहून जाती आठवाणीचे झुले मन झुलवता झुलवता सरतील सांज वाति निरव शांततेची उरेल रात एकटीच भवती गेले वाहून घर लाटे सवे तरी पुन्हा नवे बांधत होतो बालपणीची जिद्द सखे वापर या घडीला सावर ग स्वतः ला आवर तुझ्या मनाला...

माझे आवडते प्रेरणावाक्य

लेखक त्रास यांनी सोमवार, 16/02/2009 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
“You see things and you say, ‘Why?’ But I dream things that never were and say, ‘Why not?’” – George Bernard Shaw तुमचे कोणते आहे आवडते प्रेरणावाक्य?

आवशीचा घो ह्या बजटच्या ;)

लेखक दशानन यांनी सोमवार, 16/02/2009 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
अरे कोणी बजेट व्यवस्थीत बघीतले आहे काय ??? नाय पहील्या पंधरा मिनिटातच मला चक्कर आली व मार्केटचा हार्ट फेल !
  • शेतकऱ्यांना सात टक्के व्याजदराने तीन लाखांपर्यॅंतचे कर्ज मिळणार
  • मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये मध्ये दोन आयआयटी स्थापन करणार
  • शैक्षणिक कर्ज योजनेचे पुनर्विलोकन
  • सन २०१० पर्यंत सहा नव्या आयआयएम सुरु करणार
  • दोन नवीन पेन्शन योजनांची घोषणा
  • कृषी क्षेत्रासाठी २५ राज्यांसाठी १३,५०० कोटी रुपयांचे पॅकेज
  • सर्व शिक्षा अभियानासाठी १३, १०० कोटी रुपये