Skip to main content

मिपाकरांसाठी काही उपयुक्त पुस्तकं

लेखक आम्हि यांनी गुरुवार, 19/02/2009 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यातील बरेच जण वेगवेगळी पुस्तके वाचत असाल. अनेक पुस्तंकं वाचली असता एखादे छान वाटते. आपल्या वाचनात आलेली आम्हा सर्व मीपाकरांना उपयुक्त अशी पुस्तके ह्या धाग्यात नमूद करावी व सर्वांना उत्तमोत्तम वाचनाचा आस्वाद द्यावा. खालील काही पुस्तकं सर्वांनी जरूर वाचावी. क्रुपया काहीतरी उपयुक्त संदेश देतील अशी पुस्तकेच लिहावीत ही नम्र विनंती. मी वाचलेली काही उत्तम व उपयुक्त पुस्तकं खालील प्रमाणे: १.

मी कुणाची तक्रार करू?

लेखक विकास यांनी बुधवार, 18/02/2009 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
"मराठी अमेरिकन्स" हा लेख/चर्चा वाचत असताना एक लिहायचा ठरवलेला पण बाकी व्यस्तपणामुळे लिहायचा राहीलेला चर्चा प्रस्ताव परत डोक्यात आला. दोन एक आठवड्यांपुर्वी मी ५-६ दिवसांसाठी भारतात गेलो होतो. या वेळेस काँटीनेंटल एअरलाईनचे नॉनस्टॉप न्यू अर्क (नेवार्क) न्यू जर्सी ते मुंबई असे विमान पकडायचे होते. बॉस्टन ते न्यू अर्क हे पण काँटीनेंटलने प्रवास केला त्यात काही विशेष आढळले नाही. म्हणजे "कस्टमर सर्व्हीस" वगैरे नेहमीप्रमाणे होती. वेगळे काहीच नव्हते.

आवरा रे ह्या नातेवाइकांना

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 18/02/2009 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
"आता जबाबदारी मी घेतली आहे , तुम्ही निवांत रहा. मी सगळे बघुन घेतो." काकुंना मी सांगितले. हॉस्पिटल ऍड्मिनिनस्ट्रेशन मधे असताना पेशंटचे नातेवाईक कसे पिडतात ह्याचा मला पुर्ण अनुभव होता. त्यातल्या त्यात एखादा मेडिकल रेप. निघाला तर मग काही विचारुच नका. असो. काकुंच्या यजमानांचे जबड्याचे ऑपरेशन होते. 'गुटका कींग' होते काका. त्यामुळे ताबडतोब सर्जरी अनिवार्य झाली होती. दोन्ही मुले व सुना अमेरिकेत. आय्.टी त असल्यामुळे लगेच रजा घेणे शक्य नव्हते. आणि घेण्याची हिंमत नव्हती. कायमची रजा मिळायची शक्यता नाकारता येत नव्हती. मुलाचा मला फोन आला.

पुडाच्या वड्या

लेखक मृण्मयी यांनी बुधवार, 18/02/2009 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
पुडाच्या वड्या: (साधारण ३ लोट होतील) सारण: ४ वाट्या धूऊन, कोरडी करून बारिक चिरलेली कोथिंबीर १ tbsp ( प्रत्येकी ) भाजून कुटलेली खसखस, खोबरं, तीळ आणि शेंगदाणे ( ऐच्छिक ) १ लिंबाचा रस, चवीनुसार मीठ १ लहान चमचा बारिक चिरलेल्या हिरव्या मिरच्या (आई ह्यात थोडंसं आल लसुण पेस्ट आणि लवंग दालचीनी पूड देखिल घालते). १ tsp तीखट पारी: दीड वाटी बेसन (डाळीचं पीठ) अर्धी वाटी कणिक किंवा मैदा १ tsp मीठ १ tsp तीखट चिमुटभर हळद चिंचेचा घट्ट कोळ त्यात जरासा गूळ आणि १ लहान चमचा तेल वेगळे ठेवा तळायला तेल.

मनाच्या कुपीतले -आयुष्यावर बोलु काही

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 18/02/2009 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपितले या सदरातला हा आठवा लेख
आयुष्यावर बोलु काही
लेख वाचण्यापुर्वी - हा लेख स्कॅन स्वरुपात आहे खरेतर हा लेख मी पुर्वीच लिहिलेला आहे तेव्हा तो परत टाइप करणे वेळेअभावी शक्य नव्हते म्हणून स्कॅन कॉपी देत आहे.

मराठी अमेरिकन्स ..

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 18/02/2009 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल भारताबाहेर राहुन , इतर देशाचे नागरिकत्व घेउन त्यांची भाट गिरी करित आणि भारतात रहाणाऱ्या लोकांना तसेच, इथल्या सिस्टिम ला नांवे ठेवणे हे एक फॅशन स्टेटमेंट झाले आहे. त्यातल्या त्यात, अमेरिकेची सिटीझनशिप मिळाली की मग तर आभाळालाच हात पोहोचले , आणि मग तर त्या लोकांना सगळ्या भारतियांना ज्ञान शिकवण्याचा परवाना मिळाला आहे असे वाटते. ह्या भारतिय नागरिक नसलेल्या , पण मराठी बोलणाऱ्या अमेरिकन्स च्या ’अक्कल शिकवण्याच्या वागणुकीची भारताला गरज आहे कां? इथल्या ज्या राजनैतिक नेत्यांची जे खिल्ली उडवतात, त्याच नेत्यांना हार्वर्ड ला लेक्चर द्यायला बोलवतात.

उर्जेचा वापर...

लेखक बाप्पा यांनी बुधवार, 18/02/2009 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
उर्जेचा वापर... सकाळी उदर भर न्याहारी केली, कार्यालयासाठी निघायला दुचाकीवर तंगडं झटकलं आणी प्रस्थान केले. वाटेत बचकभर वाहतुकदिवे आहेत तेथे थांबत थांबत एकदाचा कसाबसा कार्यालयाच्या इमारतीत पोहोचलो. कार्यालयाच्या वाहनतळामध्ये कसे बसे आमचे वाहन उभे केले आणि कामाच्या ठिकाणि जाण्याकरीता कुच केले. तेवढ्यात आमच्या इमारती मधील त्या भागातील उदवाहन (म्हणजे लिफ्ट हो!!) काम करीत नसल्याचे आमच्या लक्षात आले. कंपनीच्या प्रशासनाला शिव्या घालत आम्ही जिन्याने जाणेच योग्य समजले. धापा टाकत जागेवर बसलो तेव्हा आमचा संगणक चालुच होता. तेव्हा मनात विचार आला कि हा संगणक काल पासुन विनाकारण चालु आहे.

माहिती

लेखक PRAPTI P यांनी बुधवार, 18/02/2009 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
मला चिकन सेजवान राईस, चिकन मंच्याव सुप, फ्राईड राईस, लॉलीपॉप या सर्वांची रेसिपी पाहिजे आहे. प्राप्ति

खान्देशी शेंगदाणे चटणी.. (ओली)

लेखक बाप्पा यांनी बुधवार, 18/02/2009 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
साहीत्यः १ वाटि शेंगदाणे ३-४ हिरव्या मिरच्या ३-४ पाकळ्या लसुण कोथिंबीर मीठ क्रुती: शेंगदाणे खरपुस भाजुन घ्यावेत (जाळु नये) त्यानंतर त्यांची साले हाताने चोळुन कढुन पाखडुन घ्या. त्यानंतर हिरव्या मिरच्या भाजुन त्यात भाजलेले शेंगदाणे ३-४ पाकळ्या लसुण थोडी कोथिंबीर, मीठ आणि थोडे पाणी घालुन मिक्सर मधुन फिरवुन घ्या. पाट्यावर वाटल्यास अति उत्तम. चटणी तयार हि चटणी खान्देशात उडीद आणी ज्वारी च्या भाकरी सोबत खातात.

तालिबानीस्तान !

लेखक भोचक यांनी बुधवार, 18/02/2009 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
भारताची राजधानी दिल्लापासून दीडशे किलोमीटर पलीकडच्या प्रांतात भारतीय कायदे चालू शकणार नाहीत, असे सरकारनेच जाहीर केले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? चकीत होऊन पहायची गरज नाही. भारतात असे कधी होणार नाही. पण भारताचे कधी भले न पाहिलेल्या पाकिस्तानमध्ये मात्र असे होतेय. राजधानी इस्लामाबादपासून दीडशे किलोमीटरवर असलेल्या 'स्वात' प्रांतात आता पाकिस्तानी कायदे चालणार नाहीत. पाकिस्तानी सरकार आणि या भागात वर्चस्व असलेल्या तालिबान्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता या भागात न्यायदानाच्या प्रक्रियेसाठी 'शरीया' कायदे लागू होतील.