चादर ट्रेक - २
चादर ट्रेक १
चादर ट्रेक - २
दिवस पहिला लेह
विमानतळावरून आम्ही गाडीने आमच्या हॉटेलवर पोहचलो. लेह येथे हिवाळ्यात जनजीवन तसे अत्यंत शांत असते. फार कुठे हालचाल दिसत नाही. त्याच शांततेचा अनुभव आम्ही आमच्या राहत्या हॉटेलात घेत होतो. दूरवर डोंगररांगा आणि पोह्यावर शेव पसरावी तसा पसरलेला बर्फ. बूट आणि मौजे काढून बर्फात अनवाणी चालायचा अनुभव घेतला. आतापर्यंत फ्रिजमधला बर्फ हातात घेतला होता पण या बर्फाचा स्पर्श वेगळाच.
मिसळपाव