Skip to main content

कालिंगण घालन भीजील तांदला पोळे( कलिंगड घालुन भिजवलेल्या तांदळाची घावने)

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 24/02/2009 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या घरातले मागच्या जन्मी मी फार मोठे पुण्य केल्याचा निर्वाळा देतात. " नशिबवान आहेस हो, एवढी सुगरण बायको मिळाली " वगैरे वगैरे. तुम्ही किती वाजता जाणार आहात हॉस्पिटल मधे. कलिंगड घालुन भिजवलेल्या तांदळाची घावने केली आहेत. लगेच पोचवा काकुना. गरम गरम खातील -बायको. देवा शपथ सांगतो मला जेंव्हा जेंव्हा बायकोशी भांडावेसे वाटते तेंव्हा ह्या पाकृ ची आठवण काढतो. सगळे भांडण पोटातच विरते. आणि ही घावने खाताना नेहेमीची चटणी सोडून 'चिकन' 'सुंगटे' किंवा 'पापलेट चे कालवण मिळाले तर मग काय बोलुच नका.

स्लमडॉग मिलिनेअर आणी युपीए

लेखक प्रशांतकवळे यांनी मंगळवार, 24/02/2009 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच ईकॉनॉमिक टाईम्सवर एक बातमी वाचली http://economictimes.indiatimes.com/Features/India-at-the-Oscars/8-Osca… ह्या बातमीप्रमाणे स्लमडॉग मिलिनेअरला जी ऑस्कर मिळाली ते युपीए सरकारचे "यश" आहे.. माझ्या मते युपीए सरकारचे अभिनंदन करायला हवे, कारण त्यांनी प्रामाणिकपणे कबुल केले की भारतातल्या ह्या परिस्थितीला तेच जबाबदार आहेत. --प्रशांत

मराठी गाण्यांच्या एम पी ३ हव्या आहेत....

लेखक सागर यांनी मंगळवार, 24/02/2009 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज मायाजालावर मराठी मधील अनेक गाणी एम पी थ्री या फॉर्मॅट मधे उपलब्ध आहेत... तरी सगळी गाणी आहेतच असे नाही... मला खालील गाणी हवी आहेत. मी ती गूगल, ई-स्निप्स, व तत्सम संकेतस्थळांवर शोधली पण नाही मिळालीत... कोणाकडे असतील तर कृपया लिंक्स द्याव्यात... मी ती गाणी उतरवून घेईन... टीपः मला मूळ गाणी हवी आहेत... नव्याने गायलेली नकोत... १. परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का? (मिळाले :) ... धन्यवाद दिपक ) २. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला. (आशाताई) (मिळाले :) ...

मामाजी

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 24/02/2009 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
खालील प्रकटन संपुर्ण काल्पनिक आहे असे समजावे. मामाजी: अरे कोण आहे रे तिकडे. जरा त्या ऑस्कर कमीटीच्या अध्य्क्षाना जरा फोन लाव. असिस्टंटः का हो सर? मामाजी: तुला रे कशाला चौकशा. धु म्हटले का धुवायचे. आणि मी कितीही गुप्त ठेवले तरी ते तुला कळणारच आहे. असिस्टंटः (हसत) करतो सर. असिस्टंट फोन लावतो. मामा़जी: मी मामाजी बोलतोय. काय पोझिशन आहे ऑस्कर ची. त्या डॉग ला काही मिळणार आहे की नाही. अध्यक्षः दोन मिळायची चान्सेस आहेत. मामाजी: दोन ने काय होते आहे. चांगली आठ मिळायला हवी. 'बापाची' आज्ञा आहे. त्यात दोन तरी भारतीय असायला हवेत. अध्यक्षः आता ते माझ्या हातात नाही. मामाजी: मला शहाणपणा शिकवु नका.

आमच्या गावच्या संमेलनाच घोड प्रशांत महासागरात न्हायल एकदाच

लेखक मुक्ता यांनी मंगळवार, 24/02/2009 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर हो रामराम, तुम्हाला आवतनं होत पण आला नाहीत न..म्हणुन मग हा प्रपंच .. http://beta.esakal.com/2009/02/23162543/vishwa-sahity-sammelan.html ../मुक्ता

नवीन पाककृती: वायफळ शब्दांचे लोणचे!!

लेखक पिवळा डांबिस यांनी मंगळवार, 24/02/2009 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
बंधु-भगिनींन्नो, आज किनई, मी तुम्हाला एक नवीनच पाककृती सांगणार आहे. माझ्या आंतरजालावरच्या मराठी संकेतस्थळांवरच्या आजवरच्या अनुभवातून हा पदार्थ जन्माला आला आहे. मात्र करायला अगदीच सोप्प्पा आहे हं! अगदी सगळ्या स्त्रियांनासुद्धा जमेल...... सर्वप्रथम एक पसाभर मराठी शब्द विकत घ्यावेत.

बुंदी रायते

लेखक जागु यांनी मंगळवार, 24/02/2009 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १ वाटि दहि १ वाटि खारि बुंदि १ छोटा कांदा चिरुन २ चमचे चिरलेली कोथिंबिर १ चमचा चिरलेले आले २ चमचे साखर पाव चमचा काळे मिठ चवि नुसार साधे मिठ पाव चमचा लाल तिखट कृती : प्रथम दह्यात थोडे पाणि टाकुन जरा घट्ट्च घुसळुन घ्यावे. मग त्यात काळे मिठ, साधे मिठ, साखर, लाल तिखट टाकुन हलवावे. नंतर राहिलेले सर्व जिन्नस टाकावे. जर बुंदि कडक आवडत असेल तर ति आयत्या वेळेवर टाकायचि. खुपच छान लागते. सजावटी साठी वरुन थोडी चिरलेली कोथिंबीर पेरावी.

माझी पाखरे माझे पक्षी दूर उडून गेले

लेखक पुष्कराज यांनी मंगळवार, 24/02/2009 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
गडबड वेड्या वस्तीमध्ये शाळा पाखरांची पोपट मैना आणि कबुतर लगबग चिमण्यांची डेरदार त्या वृक्षावरती घर आणिक शाळा सकाळ सायंकाळी भरतो प्क्ष्यांचा मेळा कावळा मास्तर शाळेमध्ये पोर चिमणा-चिमणी कावळा शिकवी धडे-कविता मुले गाती गाणी किलबिल किलबिल किती तयांची आसमंत दाट्तो मैना गाइ सुरेल गाणे पोपट तो नाचतो अवतीभवती मनुष्यप्राणी लोभी हलकट मारामारी आणि भांडणे नुसता हवरट स्वार्थापायी या अधमाने कुर्हाड हो आणलि घर आणिक शाळा त्यांची झरझर हो तोडली घिरट्या घालीत होते पक्षी घर हरवले कोठे आर्त स्वराने त्या पक्ष्यांच्या आसमंत दाटे किलबिल किलबिल हरवून गेली सुने सुने झाले माझी पाखरे माझे पक्षी दूर उडून गेले
Taxonomy upgrade extras

सुपंथ - दुरितांचे तिमीर जावो. एक अनोखा मदतगट

लेखक केदार यांनी मंगळवार, 24/02/2009 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
'भारतात हे नेहमी असेच असते'! 'भ्रष्टाचार खूपच झालाय!' 'काहीनाही रे, ह्यांना पैसे हवे वर प्रसिध्दीही!'. 'राजकारणी काSSSही करत नाहीत, ही सिस्टीमच बदलायला पाहीजे!' 'गोळ्या घाला साल्यांना!' 'शिका, शिका म्हणावं काही तरी प्रगत देशांकडून ...'अशी वाक्य आपण अनेक ठिकाणी ऐकली आहेत. बरेचदा ते बोलणारेही आपणच असतो, जोशात चार वाक्य फेकली की किती बरं वाटतं. भारत बदललेला सर्वांनाच हवाय, पण कृती करायची म्हटली की होतेच असे नाही. 'करणारे करोत रे, समाजात चार पाच अभय बंग, अवचट,पोद्दार, आमटे, सकपाळ निर्माण होतील आणि जातील आपल्याला काय त्याचे?', अशी आपल्या समाजाची मनोभूमिका झालेय.