Skip to main content

संवाद-५ [ही मालिका नाही]

लेखक चाणक्य यांनी शुक्रवार, 27/02/2009 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, हि काही कथा नाही किंवा कुठल्या कथेचा भागही नाही.हा आहे संवाद... दोघांमधला...दोन मित्रांमधला, प्रियकर- प्रेयसी मधला... दोन माणसांमधला....! हे संवाद मी जसे सुचले तसे लिहिले आहेत. यातुन काही सांगायचे वगैरे नाही. त्या त्या क्षणी जे विचार मनात येतात ते कागदावर उतरवतो. ते बरोबर असतीलही किंवा नसतीलही. या संवादातल्या पात्रांना नाव नाहीत, किंबहुना त्याची गरज भासत नाही इतके लहान संवाद आहेत हे. हे संवाद कुठलीही पार्श्वभुमी न देता अचानक सुरु होतात. एखादं गाणं जसं अंतर्‍यापासुन सुरु व्हावं तसं.

अनुवाद हवा आहे....

लेखक शक्तिमान यांनी शुक्रवार, 27/02/2009 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
"प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, गोब्राह्मण प्रतिपालक, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज छ्त्रपति शिवाजी महाराज की जय!" याचा इंग्रजी अनुवाद काय होईल? मी थोडा प्रयत्न केला आहे.... "The bravest, the royal warrior by birth, the savior of the poor, the royal seat holder, the king of kings - Hail Chhatrapati Shivaji Maharaj!" कसा वाटतोय हा प्रयत्न.. आपणही हातभार लावावा!

'मिपाभूषण'

लेखक लक्ष्मणसुत यांनी शुक्रवार, 27/02/2009 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
येथे नित्य नविन ते लिहावे | 'विरंगुळीत' प्रत्येका करावे || काथ्या कुटावा वा घालावा वाद | पण रोजच टंकावे || त्यातून निवडावा (तात्यांनी) एक 'मिपाभूषण'| त्यासी देऊन पुरस्कार (शालजोडीतून) करावा सन्मान || विचार व्हावा म्हणे लक्ष्मणसुत | असे आमुचे विनम्र आवाहन ||
Taxonomy upgrade extras

मनाच्या कुपितले-आनंद

लेखक विनायक पाचलग यांनी शुक्रवार, 27/02/2009 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपीतले या सदरातला हा माझा नववा लेख स्पष्टीकरण-या सदरातला मुळ लेख कालच प्रसिद्ध झालेला होता ,मात्र आम्ही काही कारणामुळे हा लेख येथुन उडवत आहे. आपणास तो लेख वाचावयाचा असल्यास आपण तो इथे वाचु शकता. http://batmidar1.blogspot.com/2009/02/blog-post_25.html तर दोस्तानो हा माझा नवीन लेख. हा लेख लिहिण्यासाठी आम्ही जुना लेख उडवला अयचे कारण म्हणजे आम्ही स्वतवर घातलेले आठवड्याला एका लेखाचे बंधन बकी काहीही नाही. तर आवडले तर सांगा आणि नाही आवडले तर फाट्यावर मारण्यास विसरु नका

राज ठाकरे......

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी शुक्रवार, 27/02/2009 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
आताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संकेत स्थळाचे उद्घाटन झाले त्यात राज ठाकरे यांच्या विषयी राजू परुळेकर - राजकीय विश्लेषक व लेखक यानी लिहिलेला लेख वाचला त्याची लिन्क येथे देत आहे राज नावाचा मित्र (भाग १) राज नावाचा मित्र (भाग २) राज नावाचा मित्र (भाग 3)

सुक्या बोंबलाच्या चटणीचे सुके

लेखक जागु यांनी शुक्रवार, 27/02/2009 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : ५-६ सुके बोंबिल ४-५ सुक्या मिरच्या किंवा १ ते १/२ चमचा मिरची पावडर १ मोठा कांदा ५-६ लसुण पाकळ्या हिंग पाव चमचा हळद १/२ चमचा लिंबा एवढी चिंच कोथिंबिर चिरुन चवि पुरते मिठ २ चमचे तेल कृती : चटणी : पहिला सुक्या बोंबलाचे १/२ इंचाइतके तुकडे करुन ते तव्यावर भाजुन घ्यावेत. नंतर त्याच तव्यात सुक्या मिरच्या थोड्या गरम करुन घ्याव्यात. बोंबिल आणि मिरच्या थंड झाल्या की त्यात लसुण टाकुन ते एकत्र मिस्कर मध्ये जरा जाडसरच भरडावे. हीच जर चटणी खायची असेल तर ह्यात मिठ टाकावे. सुके : कढईत तेल टाकुन त्यावर कांदा परतवावा. कांदा शिजला की त्यात हिंग हळद घालुन त्यावर वरील बोंबलाची भरड घालायची.

गध्धे पंचविशी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 27/02/2009 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
ते दिवसहि कसे मंतरलेले होते ति वेळ हि तशी वेडीच होति तु विशीतली कोवळी कळी होति. माझीहि गध्धे पंचविशी चालु होति तुझ्या घराच्या वा~या नित्य कर्मकांड असे दर्शनासाठि तुझ्या नेत्र आसुसलेले असे. तुझ्या प्रेम कटाक्षाने दिवस कारणी लागत असे जळि स्थळि सखे तुझिच मुर्त मज दिसे तुझ्या सहवासाचि साजणे ओढ असायची हातात हात घालुन मीरवण्याचि हौस असायची दिवस होता कि रात्र याचि फिकिर नसायचि रखरखित दुपार हि कोजागिरीचि रात्र वाटायचि तु देखणी अन माझ्यात तारुण्याचा जोश होता दोघांच्याहि मनात नेमका तोच विचार होता मन संस्कारित, म्हणुन संयमाचा बांध होता तरी पहिल्या चुंबनाचा नशा काहि और होता होंडा बाईक,अन तु माझी दिलोज

ग्वाल्हेरी मराठीचा लहेजा

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 27/02/2009 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याच कार्यालयात काम करणार्‍या ग्वाल्हेरच्या अरूंधती आमडेकर या मराठी मुलीने लिहिलेला हा लेख. दिल्लीला जवळजवळ खेटलेल्या ग्वाल्हेरमध्ये मराठी कोणत्या रूपात नांदतेय ते आपल्याला कळेल. भाषाचा संपूर्ण लहेजा तिथलाच आहे. फक्त वाक्यरचना वाचण्यास सोपी जावी म्हणून तेवढी संपादीत केलीय. बाकी शब्द वगैरे तेच ठेवलेत. 'अरे, यार दादा तूने आज फि‍र मेरा पेन ले लि‍या. आई देख ना इसको. बाबा आपके लि‍ए चाय बनाऊ? माझं एवढं बोलण झालं की बाबांचा चेहरा बघायसारखा असतो. "हुम्म, हे काय चालू ए अरुंधती‍ तुझं. कि‍ती वेळा सांगायचं की‍ घरात तरी मराठीत बोलत जा. आता कॉलेज झालं ना तुझं.

आफलातुन म्हणीं

लेखक JayGanesh यांनी शुक्रवार, 27/02/2009 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
काही नव्या, आफलातुन म्हणींवर आज शुक्रवार दि. २७.०२.०९ केलेला प्रयास्....तुम्ही सुध्दा सुरु ठेवावा. ही. न. वी. ''नाव प्रकाश,हाती विझलेला दिवा''

अमराठी भाषिकांनाहि प्रेरणा देणारे शिवराय !!! 1

लेखक सुभाष यांनी शुक्रवार, 27/02/2009 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
अमराठी भाषिकांनाहि प्रेरणा देणारे शिवराय !!! छत्रपति शिवाजी महाराजांचे कार्य,शौर्य,राजनिती,मुत्सद्दीपणा हे सर्व केवळ महाराष्ट्राच्या चौकटीमध्ये बंदिस्त रहाणे शक्यच नाही.महाराजांचे स्वराज्याचे उद्दीष्ट,त्यामागची भुमिका,येथे एतद्देशियांचे समतेचे ,ममतेचे, सुखाचे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे ही तो प्रभुचीच इच्छा हे महाराजांचे मनोगत महाराष्ट्राबाहेरचे विचारवंतानाहि उमगले होते,आहे.शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नेते नव्हते तर ते सर्व भारताचे आदर्श राष्ट्रपुरुष होते अशी भावना भारतीय विचारवंत अन प्रतिभावंत यांच्या मनात शिवकालात अन नंतरहि निर्माण झाली होती अन आजही ती कायम आहे.म्हणुनच मराठी बरोब