Skip to main content

गलिच्छ राजकारणी आणि केले गेलेले सन्मान

लेखक तात्यालबाड यांनी शनिवार, 28/02/2009 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज दैनिक सकाळमध्ये छायाचित्रासहित एक बातमी वाचली, की एका अतिरेकी कारवाईत शहिद झालेल्या सैनिकाच्या पत्नीने; पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांच्या हस्ते स्वीकारला एलपीजी आणि सीएनजी गॅस केंद्र चालवण्याचा परवाना.

'विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा' !!!

लेखक लक्ष्मणसुत यांनी शनिवार, 28/02/2009 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
लक्ष्मणसुत उवाच् विज्ञानाची कास धरू | अंधश्रद्धा दूर सारू || 'विज्ञाना'मुळेच आपण झालो 'मिपाकर' | अन् 'सरपंच' झाले 'तात्या अभ्यंकर' || विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
Taxonomy upgrade extras

परिकथेतील राजकुमारा...

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 28/02/2009 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
"आई आई ए आई अग बाहेर येना पटकन.. " दादा ओरडतच घरात शिरला. मी नेहमीसारखीच हॉलमध्ये बसले होते. "अरे काय झाले असे ओरडायला एकदम?" आई विचारतच बाहेर आली. "आई हा माझा मित्र .. अरे आत ये ना बाहेर का उभा आहेस असा?" दादा बाहेर डोकावत म्हणाला, दादाच्याच वयाचा एक देखणा रुबाबदार तरुण थोडासा लाजतच घरात शिरला. "आई हा अभिमन्यु, माझ्याच कॉलेज मध्ये शिकतो, आज सकाळी फिरुन येताना माझी आणी एका रिक्षावाल्याची टक्कर झाली जोरात, ती लोक दादागीरी करायला लागले, पण तेव्हड्यात हा अभी आला म्हणुन सुटलो बघ मी." "छोर ना यार" अभिमन्यु म्हणाला. बाप रे हा कोणी दुसर्‍या जातीतला आहे का काय ?

भटकंती तिसरा स्टॉप - दिल्ली -११०००६

लेखक दशानन यांनी शनिवार, 28/02/2009 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्ली पीनकोड ६ भाग असेलही असा, पण बाकी दिल्लीत तो असा बेटासारखा राहू शकेल का? - मनिष ह्यांचा एक प्रतिसाद. हे वाचल्यावर मनात आलं की चला जरा मिपा करांना दिल्ली-६ ची सफर घडवू या.

माउंट रेनियर . .

लेखक सुक्या यांनी शनिवार, 28/02/2009 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
माउंट रेनियर : भौगोलिक स्थान: वाशिंग्टन राज्य, उत्तर अमेरिका. अधिक माहीतीसाठी इथे टिचकी मारा. मागे बर्‍याच दिवसापुर्वी माझ्या घरापासुन जवळच असलेल्या या निद्रीस्त ज्वालामुखी ला भेट द्यायचा योग आला. वर्षाचा बहुतेक काळ हा ढगांच्या चादरीखाली झाकलेला असतो.

स्थलांतरे - घाऊक आणि किरकोळ

लेखक सुनील यांनी शनिवार, 28/02/2009 05:29 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणची गोष्ट आहे. कुठल्याशा सुटीत एका कौटुंबिक सहलीसाठी लोणावळ्याला जाणे झाले होते. विविध स्थलदर्शनांच्या यादीत "कार्ले" येथिल लेण्यांचा समावेश होताच. तेथिल एकविरा देवीच्या मंदिरात गेल्यावर माहिती कळली की, ही कोळी समाजातील लोकांची देवता. मला कुतुहल वाटले. कोळी समाज हा समुद्रकिनार्‍यावरील. मग त्यांची देवता अशी समुद्रकिनार्‍यापासून इतकी दूर, अगदी घाटापलिकडे देशावर कशी? वडिलधार्‍यांना विचारले पण कोणाकडेच समाधानकारक उत्तर नव्हते. आजही नाही. अनेक अनुत्तरीत प्रश्नांच्या ढिगार्‍याखाली ते कुतुहल आजदेखिल पडून आहे! मिपावर मराठीच्या अनेक बोलींतील लेखन वाचायला मिळते. त्यात एक आहे आगरी बोली.

सन्मान! एका रानातल्या कवीचा..!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 28/02/2009 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
एक अतिशय आनंदाची बातमी..! शेतकरी कवी, रानकवी, ना धो महानोर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे दिला जाणारा जनस्थान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे असे समजते.. महानोरांसारख्या अस्सल मराठी मातीतल्या एका कवीचा साक्षात कुसुमाग्रजांनीच केलेला हा गौरव आहे असेच म्हणावेसे वाटते..! कवीवर्य ना धो महानोरांचे मिसळपाव परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन..! -- तात्या अभ्यंकर.

निर्बलता

लेखक शिवापा यांनी शुक्रवार, 27/02/2009 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी स्पष्ट आठवते. टेकडीचा रस्ता. उतरलेली उन्हे. तुझा हात, विस्कटलेले केस ओलेते डोळे अणि तापलेले श्वास. काही क्षणांचा प्रवास. दरम्यानचे वाढलेले अंतर मनाच्या इच्छा, मिठीच्या अपेक्षा. पण आपण ठरलो नदीचे दोन किनारे. आज इतक्या दिवसानंतर डोळे न्याहाळाताहेत खिडकीच्या झरोक्यातून आत येऊ पहाणार्या आंब्याच्या डहाळीला. हि फांदी मी कितीतरी वेळा तोडली असेल. पण काहि दिवसांनतर ती पुन्हा हिरवी होते. परत एकदा घरात डोकावन्याकरीता आतुर. मग विशाद वाटतो. किती निरंतरता आहे तिच्या प्रयासात आणि किती निर्बलता होति माझ्या प्रयासात.

जाहल्या काही चुका - नुकतेच बघितलेले टुकार चित्रपट!!!

लेखक मनिष यांनी शुक्रवार, 27/02/2009 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस आहे! शेवटी चुका करणारच...पण कधीकधी काही चुकांनंतर स्वतःवरच फार चिडचिड होते. हा धागा अशाच चुकून बघितलेल्या चित्रपटांविषयी.... अशा वेळेस खर तर फक्त त्या चित्रपटाची चिरफाड समीक्षा लिहावी इतका उत्साह नसतो किंवा तितकी त्या चित्रपटाची लायकीही नसते, पण तरीही 'भडास' कुठेतरी काढावशी वातते, हा धागा खास त्याच्यासाठी!! तर सुरुवात माझ्यापासून - मी Delhi-6 पाहिला (सांगितल ना, चुकलं माझं!), लागला त्याच्या दुसर्‍याच दिवशी. तेव्हा परीक्षण वगैरे काही वाचले नव्हते, पण प्रमोज ठीक वाटले, आणि राकेश ओमप्रकाश मेहरा (पुढच्या वेळेस रा. ओ. मे. हं!) म्हनजे अक्स, रंग दे बसंती वाला.