Skip to main content

(मूल)

लेखक लिखाळ यांनी मंगळवार, 03/03/2009 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
नदीवरल्या पुलाखालचे 'मुके' उसासे अन यौवनाच्या पखाली वाहणारे मुक्त कण्हसूर उह आह गजबजलेल्या दवाखान्यातली बेभान लगबग अन फत्तरासारख्या काळजातले गोठलेले काहूर होणार मूल होणार मूल असतोच दडलेला काहिंच्या मनात बाजेवर उफाळणारा गुलाबी प्रणयपूर भरपूर भरपूर --लिखाळ. (प्रेरणा-शरदिनी यांची कविता पूल )
Taxonomy upgrade extras

<पब>

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 03/03/2009 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभूमी: तीन महिन्यातच इंग्लंडमधल्या एका निर्जन खेड्यात राहून आमच्या सगळ्यांच्या डोक्यावर अंंमळ जास्तच परिणाम झाला. घरसुद्धा एवढं एकाकी की सगळ्यात जवळचा पबसुद्धा ४० मिनीटं चालत गेल्यावर लागायचा. प्रेरणा हलत्या रस्त्यावरची शांत ट्रेन आणि रात्रीच्या अंधारात काळोख्या रस्त्यांवर मित्रांचं ओरडणं क्वॉक क्वॉक हाडं गोठवणारी थंडी पण ती न टोचणं सकाळी सहा वाजता घरामागे होणारा त्रास देणारा बदकांचा आवाज क्वॉक क्वॉक क्वॉक दुपारच्या वेळेत तारेतच उठणं अन अन भुकेल्या पोटी अजय-अतुलचं गाणं ऐकणं क्वॉक क्वॉक क्वॉक क्वॉक
Taxonomy upgrade extras

चौदशपुत्रा ...? ...? ...?...?

लेखक आनंद घारे यांनी मंगळवार, 03/03/2009 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
चौदा मुलांची आई कुमारिका तर खचित नसेल, पण आजकाल कांही सांगता येत नाही. अमेरिकेत अशी एक आई आहे, पण ती स्त्री सौभाग्यवती आहे, की अविवाहिता, की विधवा , की घटस्फोटिता याबद्दल गूढ आहे. पण तो मुद्दा या लेखाचा विषय नाही. एका विलक्षण घटनेबद्दल ज्या क्रमाने जशा प्रकारच्या बातम्या येत गेल्या त्या खूपच रोचक होत्या. त्याबद्दल या ठिकाणी मी लिहिणार आहे. "अष्टपुत्रा सौभाग्यवती भव।" असा आशीर्वाद आपल्याकडे पूर्वीच्या काळी सगळ्या मुलींना देत असत. आजकालचे 'कुटुंबनियोजन' किंवा त्यापूर्वी होत असलेले 'संततीनियमन' सुरू होण्यापूर्वीच्या काळात एकदा घरातला पाळणा हलायला लागला की तो सारखा हलतच रहायचा.

घर घर घर घर

लेखक झेल्या यांनी मंगळवार, 03/03/2009 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
या घडीला पुण्यात घर घेणे कितपत उचित आहे, गुंतवणूक म्हणून आणि गरज म्हणून? गेल्या ३-४ महिन्यांमध्ये सदनिकांचे भाव काही प्रमाणात कमी झाले आहेत. अजून कमी होण्याची शक्यता आहे का? अंडर कंस्ट्रक्शन (ताबा: ६महिने ते-१ वर्ष) घर घेणे योग्य की रेडी पझेशन? मी पिंपळे सौदागर, कात्रज्-आंबेगाव, बाणेर, पाषाण, बावधन इ ठिकाणी अनेक प्रोजेक्ट्स ना भेटी दिल्या आहेत, देत आहे. चांगल्या (निदान तसे वाटणार्‍या) प्रोजेक्ट्सचे भाव २५०० प्रति स्क्वे. फूट च्या वरच आहेत. याखाली कीमती कमी करण्यास बिल्डर लोक तयार दिसत नाहीत.

निवडणूका आणि जाहिराती...

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 03/03/2009 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
हम्म... एकदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. आता दररोज च्या दैनिकात विमानतळ कोनशीलेच्या, शेतकरी योजनेच्या व ईतर सरकारी जाहीराती पानपान भर येणार नाहीत. म्हणजे बातम्या वाचता येतील. शनीवारच्या सकाळ मध्ये तर एकूण ८ (अंकी: आठ) जाहीराती होत्या.

पूल

लेखक शरदिनी यांनी मंगळवार, 03/03/2009 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
झुलत्या पुलावरचे नि:शब्द उसासे अन यौवनाच्या पखाली वाहणारे गद्य कणसूर डुर्र डुर्र निबिड अरण्यातली बेभान लगबग अन फत्तराच्या पाझरातले निर्जीव काहूर डुर्र डुर्र डुर्र असतोच दडलेला काहींच्या मनात चिखलात लोळणारा काळाकभिन्न कापूर डुर्र डुर्र डुर्र डुर्र

माझा विज्ञानदिन

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 03/03/2009 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस हापिसात 'विज्ञान दिना'ची तयारी केली पाहिजे असं वाक्य अनेकविध भाषा आणि हेलांमधून कानांवर येत होतं. पण इमेल किंवा नोटीस न आल्यामुळे डोळ्यात येत नव्हतं. अनेक वांझोट्या चर्चा सुरू असतात, त्यातली ही पण एक असा विचार केला आणि मी पण काही फार मनावर घेतलं नाही. आणि एक दिवस मी प्रपोजलच्या कामात पूर्ण बुडालेले असताना बॉस नं.

सुखाचिये शोधी | भ्रमसी रे वाया |

लेखक सागरलहरी यांनी मंगळवार, 03/03/2009 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाचिये शोधी | भ्रमसी रे वाया | अंतरीचा ठेवा | पाहसी ना || जगी या मांडल्या | सुखाचिया पेठा | सुख घेता ओठा | नष्ट शून्य || दया करोनिया | संते दिले गुज | रामनाम बीज | उच्चारी तू || नामे उद्धरिल्या | पापियांच्या व्यथा | तुझी काय कथा | सांगसी तू || सागर लहरी | अनंत उठती | शमवुनी चित्ती| शांत व्हावे || - सागरलहरी
Taxonomy upgrade extras

पनीर टिक्का

लेखक मिंटी यांनी मंगळवार, 03/03/2009 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
पनीर टिक्का माझ्या आवडती एक डिश.... तशी किचकट पण चविला एकदम मस्त अशी पाककृती. पनीर टिक्का एकदा घरी करुन बघावा या हेतुनी सगळं साहित्य जमवलं आणि प्रयोग सुरु झाला. साहित्य : १. पनीर - ५०० ग्रॅम २. २-३ मोठे कांदे ३. २-३ सिमला मिरच्या ४. दही ( पाणी काढलेलं ) - ५०० ग्रॅम ५.२-३ मोठे चमचे लाल मिरचीची पेस्ट ६.२-३ मोठे चमचे आलं-लसुण पेस्ट ७. १ १/२ चमचा गरम मसाला पावडर ८.१/२ चमचा कसुरी मेथी ९. २ चमचे लिंबाचा रस १०.१/२ चमचा मिरी पावडर ११. २-३ चमचे तेल १२. मिठ चवीनुसार कृती : पनीरचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करुन घ्या.

''ती''

लेखक JayGanesh यांनी मंगळवार, 03/03/2009 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
टन टन टन टन टन टन टन टन टन टन ....... झाली एकदाची मधली सुट्टी. आमच्या शाळेची मधली सुट्टी १.३० ला होते, वडापाव खावुन झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही सगळेजण म्हणजे मी, बाबासाहेब, संदीप, नाग्या, प्रशांत, धोंडे (ज्यांची नावे व्यवस्थीत लिहली आहेत ते सगळेजण वर्गात रोज गणीताच्या आणी इग्रंजीच्या तासाला मजबुत मार खातात) आणी इतर ९ वी तली मुले (जी आमच्या ग्रुप मधे येण्यास तयार , पण आम्ही न समावीष्ट केलेली.) असा सगळा ताफा आमचा शाळेच्या मैदानातील झेंड्या खाली गप्पा मारत उभे होतो.