Skip to main content

हा राग कोणता!

लेखक सालोमालो यांनी गुरुवार, 05/03/2009 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, http://www.youtube.com/watch?v=xvSpcMwQldc या लिंक वर टिचकी मारून कुंजबिहारी ही पं. जसराज यांची सर्वांगसुंदर रचना ऐका. मला हा राग भटियार वाटतोय. पण मधुनच थोडासा वेगळा जाणवतोय. थोडासा दुसरा राग मिक्स असल्यासारखा वाटतोय. तुम्हाला काय वाटतयं? जरूर सांगा. सालो

एक निवेदन..

लेखक आणिबाणीचा शासनकर्ता यांनी गुरुवार, 05/03/2009 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, अलिकडेच मिसळपाव डॉट कॉम (मिपा) च्या मालकांना, मिपाच्या संपादक मंडळाला जाब विचारणारे काही धागे पाहंण्यात आले. ते आम्ही अर्थातच रद्द केले आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही हे निवेदन पुन्हा एकवार देत आहोत. निवेदन - (कृपया सर्वांनी नोंद घ्यावी) १) मिपा या संकेतस्थळावर लिहिला जाणारा कुठलाही मजकूर अप्रकाशित करण्याचे/रद्द करण्याचे पूर्णाधिकार मिपाचे मालक, मिपाचे संपादक मंडळ यांचेकडे आहेत.

पानाआडच्या कळ्या - १: "सति"

लेखक वाचक यांनी गुरुवार, 05/03/2009 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
वास्तविक एखाद्या पुस्तकाने इतके झपाटून जाण्याचे वय (आणि मन) आता राहिलेले नाही. म्हणजे वय खूप झाले असे नव्हे तर आता नवथरपणा जाउन कशालाही पटकन दिलखुलास दाद देण्याची, शिफारस करण्याची खोड जाउन अंगी एक (उगिचच) शिष्टपणा आला आहे. पण ह्या पुस्तकाने मात्र झपाटून टाकले आहे. गेले कित्येक महिने, वाचल्यापासूनच, ह्यच्यावर कहीतरी लिहिले पाहीजे, दुसर्‍या कुणालातरी सांगितले पाहीजे असे तळापासून वाटत होते. एवढे काय आहे ह्या पुस्तकात ?

नम्रतेचा अमुल्य धडा.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 05/03/2009 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
"शहरात येऊन मध्यमवर्गीयात राहून त्यांच जीवनचर्य अंगिकारून राहिल्याने माझे पूर्वीचे खेड्यातले दिवस विसरणं,मी कोण आहे हे विसरणं,मी कुठे होतो,आणि पुढे मला कुठे जायचंय ह्याचा विचार विसरून जाणं हे सर्व सहज सोपं होतं." माझा मित्र मोहन मोकाशी खूप दिवसानी मला भेटला.जुन्या गप्पा मारण्यात मजा येत होती.तो त्याच्या आठवणी मला सांगू लागला.शहरातली रहाणी आणि लोकांची एकमेकाशी वागणूक या विषयावर चर्चा होत असताना,रोजच्या घाईगर्दीच्या जीवनात बारीक बारीक कारणावरून बाचाबाचीचेच प्रकार जास्त होत असतात.असा त्याचा बोलण्याचा सूर होता. शक्यतो नम्रतेने राहण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो असं म्हणाला.

शिवाजी महाराजांची "लुटी" मागची भुमिका.

लेखक सुभाष यांनी गुरुवार, 05/03/2009 03:10 या दिवशी प्रकाशित केले.
शिवाजी महाराजांची "लुटी" मागची भुमिका. शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संवर्धनासाठी,स्वराज्य बळकट बनविण्यासाठी बर्याच वेळा शत्रूच्या प्रदेशामध्ये लुटी केल्या.या लुटी त्यांच्या वैयक्तिक चैनीसाठी,विलासामध्ये जिवन घालविण्यासाठी नव्हत्या, त्या फक्त स्वराज्य बळकट करण्यासाठीच होत्या.या लूटीच्यावेळीहि कांही नियम,पथ्ये कटाक्षाने पाळली जात असत.कोणाच्याहि मनाला येईल,मर्जी होईल तशी लुट करण्याची कोणालाहि परवानगी नव्हती.याबाबतीत महाराज फार दक्ष असत.लूटींच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे नां याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे.या नियमांचे उल्लंघन करणार्याला ते कडक शिक्षा फर्मावित असत.ही सर्व लुट राज्याच्या

(उगिच भेटली घाटावर ती)

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 05/03/2009 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
उगिच भेटली घाटावर ती बर्‍याच दिवसांनंतर ओळख सारी धुवून गेली बर्‍याच दिवसांनंतर फेस धवल तोंडाला आला धुके दाटले डोळीं लालकेशरी चार शलाका फुलून आल्या गाली चपलेचाही प्रसाद आला शिवीआरतीनंतर उगिच भेटली घाटावर ती बर्‍याच दिवसांनंतर पेकाटाची मोडुन हाडे हाती घेतला हात (वळ्णावरती अवघड इतक्या सहज घातली लाथ) धडपडलो अन् धूम ठोकली मान घातली खाली त्या मौनाचा अर्थ सांगण्या मागे धाउन आली बुक्क्यांची मग उधळ्ण झाली कुठेकुठे ति भयंकर उगिच भेटली घाटावर ती बर्‍याच दिवसांनंतर प्रेरणा: पुष्कराज यांना सहज वाटेवर भेटलेली कविता

बेगम बर्वे - एक डोक्यावरून गेलेले नाटक

लेखक मनिष यांनी बुधवार, 04/03/2009 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच (१ मार्च) सतिश आळेकरांचे प्रचंड गाजलेले 'बेगम बर्वे' नाटक मूळ संचात (स्वतः आळेकर, चंद्रकांत काळे, मोहन आगाशे वगैरे) पहायचा योग आला. नाटकाची खूप किर्ती ऐकली होती, त्यामुळे अगदी उत्सुकतेने ते नाटक पाहिले, पण फारसे झेपले नाही! :( खूप प्रश्न पडलेत -- इथे मिपावर जाणकार माहिती देतील अशी आशा आहे. हे नाटक प्रामु़ख्याने स्त्री भुमिका करणार्‍या, बालगंधर्वांना आदर्श मानणार्‍या पुरुष कलावंताची शोकांतिका आहे. पण मग काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीच. नलावडे बाई म्हणजेच बर्वे - हे कसे काय? पुढे तिचे/त्याचे लग्न, एकत्र राहणे ह्या सगळ्या गोष्टी कल्पनेत आहे का? शिवाय ते दिवस राहणे??

लोकसभा निवडणुक २००९: दक्षिण भारतातील परिस्थितीविषयी माझा अंदाज

लेखक क्लिंटन यांनी बुधवार, 04/03/2009 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसभा निवडणुक-२००९ च्या माझ्या अंदाजात आता वळू या दक्षिण भारताकडे. दक्षिण भारतात कर्नाटक (२८ जागा), लक्षद्विप(१ जागा), केरळ (२० जागा), तामिळनाडू (३९ जागा), पाँडेचेरी (१ जागा) आणि आंध्र प्रदेश (४२ जागा) अशा १३१ जागा आहेत.

मनाच्या कुपितले-मुलाखत

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 04/03/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपीतले या सदरातला हा दहावा लेख
मुलाखत - केदार कुलकर्णी
तर दोस्तानो, तुम्हाला माहित आहेच की कोल्हापूरला केदार कुलकर्णी याने नुकत्याच झालेल्या 'झी गौरव' समारंभात 'गंध' या चित्रपटासाठी उत्कृष्ट कलादिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. सांगायची गोष्ट अशी की केदारदादा हा देवल क्लबचा कलाकार, आणि मी देखील क्लबचाच. त्यामुळे, माझ्या या दोस्ताला सन्मान मिळाल्याचा मला विशेष आनंद. तसे आम्ही गेल्या 1 महिन्यात भेटलेलो नव्हतोच. त्यामुळे, काल त्याला भेटल्यावर त्याची एक अनौपचारीक मुलाखत घेतली.