Skip to main content

"न्यायदेवता नुसती आंधळीच नसते तर बहिरी आणि मुकी पण असते"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 11/03/2009 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसायानी मला त्यांच्या कॉलेजच्या प्रोफेसर असतानाच्या जीवनातली एक गंमतीदार पण हृदयस्पर्शी घटना सांगितली. प्रो.देसाई त्यावेळेला रुईया कॉलेजमधे नुकतेच ज्युनीअर लेक्चरर म्हणून कामाला लागले होते.ते मला म्हणाले, "न्यायदेवता नुसती आंधळीच नसते तर मुकी आणि बहिरीही असते.कसं ते ही माझी गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला कळेल. माझ्या फिझीकसच्या वर्गातली मुलं,मुली आणि मी गणपतीपुळ्याला सहलीसाठी गेलो होतो.गांवातल्या एका शाळेत आमचा मुक्काम होता.शाळांना त्यावेळी उन्हाळ्याची सुट्टी होती.गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा अप्रतिम दिसायचा.त्या दिवसात बर्‍याच लोकाना हा पिकनीक स्पॉट माहित नसल्याने परिसर फारच स्वच्छ होता.समुद

'ग्रॅन टोरिनो' - आ़जोबांची शिकवण!

लेखक मुशाफिर यांनी बुधवार, 11/03/2009 03:55 या दिवशी प्रकाशित केले.
क्लिंट ईस्टवूड हा माझ्या फार आवडत्या कलाकारांपैकी एक. खुप लहान असताना माझ्या मोठ्या मामेभावाने 'द गुड द बॅड ऍंड द अगली' हा त्याचा चित्रपट दाखवून ह्या कलाकाराशी माझी पहीली ओळख करून दिली होती. तेव्हापासून आजपर्यंत त्याच्याविषयीचा आदर वाढतच गेला आहे. त्याच्या सुरवातीच्या काळातील 'मारधाड' किंवा 'वेस्टर्न' चित्रपटातील त्याची असलेली प्रतिमा लक्षात घेता, त्याचे अलिकडील चित्रपट उदा. 'मिलियन डॉलर बेबी', 'चेंजलिंग', 'लेटर्स फ्रॉम इवो जिमा' इ. हे फारच वेगळे आहेत. एका संवेदनशील कलाकाराची ते साक्ष देतात (यातील काही चित्रपटात त्याने स्वतः काम केलेले नाही तर ते दिग्दर्शित केले आहेत/निर्मिले आहेत).

बंड

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 11/03/2009 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
तो कोणत्या पक्षाचा झेंडा आहे ...? कोणत्या दलाची झुंड आहे.. कि जुनाच क्रांतीकारकांचे,] ते मतीमंद बंड आहे...? सारे द्रुष्टीकोन त्यांचे.. मी फेकले, न जुमानले, माझ्या अशा क्रुतीने.. ते हतबुद्ध क्रुद्ध झाले..! त्या जुन्या माणसांनी ठरविले आता मरायचे.. जगलीच नाही कधी ती.. त्यांनी काय मरायचे...? मी चंद्र , सुर्य, तारे.. डोळे भरून पाहिले. सारे सुगंध स्रुष्टीचे.. श्वासात भरून घेतले...!!
Taxonomy upgrade extras

होळीच्या शुभेच्छा! :)

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 11/03/2009 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकरांना होळी-रंगपंचमीच्या अनेकानेक शुभेच्छा! :) आपले, अनुष्का शेट्टी, तात्या शेट्टी! :)

जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा

लेखक देशपांडे१ यांनी मंगळवार, 10/03/2009 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
काही वेळेस समिक्षकांच्या लेखणीतून काय अर्थ निघेल याची खात्री ब्रम्हदेवालाही लागत नसावी. एव्हडेच काय स्वता: समिक्षकांना सुद्धा त्यांच्या समिक्षेबद्दल सांगता येणार नाही की, हेच काय ते व्यक्त कराचे होते का ?. केंव्हाही समिक्षकाच्या भुमिकेत शिरून हवी तेव्हडी ओढाताण करून तर्क वितर्क माडणारे बरेच असुशकतील पण विषयाच्या केंद्रबिंदू पासून क्षितीजापर्यंत परीघ ओढ्ण्याची प्रतिभा फार थोड्या जाणकारांना लाभली आहे. असे जाणकार समिक्षक कधिही 'समिक्षकाच्या' क्रुत्रीम व रुक्ष मुखवट्याआड लपत नाही म्हणूनच त्यांना एखाद्या ललित,काव्य,लेखनाचा वा कलाक्रुतीचा निख्खळ आनंद घेता योतो व व्यक्त करता येतो.

<<खवव्यनी>>

लेखक देशपांडे१ यांनी मंगळवार, 10/03/2009 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा प्रतिक्रीयांच्या नकाशांवरून निरीक्षतांना कंपूच्या ख्.व. म्हणाल्या, "काथ्याकूट वरच्या सदरात (..) लिखान, वाचलेस का ? तिरके प्रतिसाद आले का पहायचे आहे." आपल्या संकेतस्थळावर कंपूच्या प्रतिसादांची वाट पहातांना चिंटूने न राहून एक कौल पाडला. "लेख न वाचता +१ ..+२.. सहमत, हि कंपूबाजीच ना ?" त्यात केवढं मोठं सामान्यज्ञान होतं. धाग्यावरचे स्कॅनकेलेले लेख वाचतांना वचकातला एक त्रस्त विचारतो, "जरा हे समजून सांगता का?" आणि त्याने धाग्यावर स्कॅनलेल्या लेखाचा आढावा घेतला. हलके घ्या ;-) सन्मय देशपांडे
Taxonomy upgrade extras

तो आणी ती

लेखक मराठमोळा यांनी मंगळवार, 10/03/2009 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा माझ्या एका जवळच्या मित्राची..आणी त्याच्या प्रेयसीची. कथेत "तो" आणी "ती" लहानपणापासूनच तो एकदम चंचल वृत्तीचा. नविन गोष्टी करुन पाहण्यात त्याला फार मजा वाटायची. अभ्यासातही फार हुशार आणी चाणाक्ष. सर्वांचा लाडका. एकदा त्याने तिला कुठेतरी पाहिली आणी तिच्याबद्दल कुतुहल निर्माण झाले आणी तिला भेटायची ओढ लागली. आता तिला भेट्णार कसे आणी भेट घलुन कोण देणार हा विचार त्याच्या मनात घोळु लागला. हळुहळु दिवस सरत होते आणी तिला भेटायची ईच्छा सुद्धा तीव्र होत होती. एक दिवस त्याच्या एका मित्राच्या वाढदिवस पार्टीमधे ती त्याला दिसली आणी त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.

आय डोन्ट सी यू!

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 10/03/2009 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
(सदर लेख राजकारणाचे विडंबन असून, राजकारणाचा, विडंबनाचा, (तथाकथित) उपरोधिक लिखाणाचा तिटकारा असलेल्यांनी त्याच्या वाटेला जाऊ नये. गेल्यास होणाऱ्या त्रासास लेखक जबाबदार राहणार नाहीत.) प्रकृतिअस्वास्थ्यामुळे "आयसीयू'त असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आजारपणाच्या आधीपासूनच बऱ्याच जणांना राजकीय धक्के देऊन त्यांची राजकीय प्रकृती बिघडवून टाकली होती. रुग्णालयात असतानाही ते असे काही करतील, याची भल्याभल्यांनाही कल्पना नव्हती. अडवानींनी ठाकरेंची भेट मागितली आणि ती नाकारल्याची चर्चा भाजप-शिवसेनेपेक्षाही प्रसारमाध्यमे आणि कॉंग्रेस-"राष्ट्रवादी'तच जास्त रंगली.

हिंदी चिनी भाई भाई

लेखक अडाणि यांनी मंगळवार, 10/03/2009 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचं काय ये, पिडांकाकांचा ड्रिंक्सवरचा काथ्याकूट वाचत होतो अवेळी (म्हणजे संध्या़काळी...) आणि पुर्वीचे दुवेही पाहीले .... त्यामुळे एकंदर माहोल असा झाला की आम्ही ग्लेनफिडीच बाइंना घरी आणायचे ठरवले... साधारणपणे सव्वा आठ ला जावून बघतोय तर काय आमच्या गावतील मधुशाळा बंद !!! (मी बे एरीयात राहतो, एस एफ ओ पासून वरती [पुण्यातलं वरती नाही] तासभर अंतरावर...) - त्यामुळे लक्षात आले की हे फक्त पुण्यातच होत नाही बाकी ठिकाणीही होवू शकते.... पण हिंमत न हारता आम्ही लांबवरच्या दुसर्‍या किराण्याच्या दुकानात ही बया शोधुन काढलीच... मग मस्त घरी चकना घेवून मिपा उघढून बसलो... सोबत ग्लेनफिडिच...