एक निवांत, मोकळा वीकांत
एक मोकळा, निवांत पसरलेला वीकांत निवडावा. भरपूर आराम करावा. आराम करायचा कंटाळा आला, की एक फर्मास चहा घ्यावा. चहामुळे पुन्हा आराम करण्याइतपत तरतरी आली, की पुन्हा आराम करावा! एखाद्या जुन्या चित्रपटाची सीडी पहावी.
बाजारात जावे. छानपैकी मुडदुशे आणि कोलंबी आणावी. दोन्ही व्यवस्थित साफ करून घ्यावी. कोलंबीचा काळा धागा काढण्यास विसरू नये.
आलं, लसूण आणि लाल मिरचीचे वाटण करून घ्यावे.
मिसळपाव