Skip to main content

निसर्गाचे संकेत

लेखक क्लिंटन यांनी शनिवार, 21/03/2009 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, कधीकधी आपल्याला भविष्यात काय घडणार याची कल्पना निसर्ग स्वप्ने, भास किंवा जाणीवेच्या पातळीवरील अनुभवांमधून देतो. कधी त्याक्षणी निसर्गाच्या संकेतांचा अर्थ कळतो तर कधी कळत नाही. अनेकदा अशा एखाद्या अनुभवाचा किंवा स्वप्नाचा संबंध काय आणि तो अनुभव/स्वप्न का पडले हे आपल्याला कळत नाही आणि आपण त्याविषयी फारसा विचार करत नाही. पण निसर्ग आपल्याला ज्या घटनेविषयी सुचित करायचा प्रयत्न करत आहे ती घटना घडून गेल्यानंतर मात्र आपल्याला अशा घटनांचा उलगडा होतो. मला नक्की काय म्हणायचे आहे हे मला स्वत:ला आलेल्या तीन अनुभवांमधून स्पष्ट होईल. १) दिनांक २९ मे १९९७.

माझी ओडिया

लेखक आळश्यांचा राजा यांनी शनिवार, 21/03/2009 05:48 या दिवशी प्रकाशित केले.
भाषावार प्रांतरचनेमुळे मला वाटत होते की ओडिया ही बऱ्यापैकी एकसंध भाषा असून संपूर्ण ओरिसा राज्यात थोड्याफार फरकाने एक प्रमाण भाषा म्हणून प्रचलीत असेल. पण हे तितकेसे खरे नाही. अर्थात विविधता ही सर्वच भाषांमध्ये असते. माझा एक मित्र यवतमाळहून पुण्याला शिकायला आला होता तेंव्हा त्याचे मित्र त्याला म्हणाले होते, सांभाळ बे, तिकडचे लोक छापल्यासारखे बोलतात! भाषा दहा कोसांवर बदलते म्हणतात. पण ओडियामध्ये असे बदल लक्षणीय आहेत. संबलपूर भागातील ओडिया ही कटक – पुरी भागातील ओडियापेक्षा इतकी निराळी आहे की आपल्याला आपल्या कोंकणी, अहिराणीची आठवण व्हावी.

कानडि हुळि

लेखक जोशी पुण्यात दन्गा यांनी शनिवार, 21/03/2009 03:20 या दिवशी प्रकाशित केले.
हुळि : हि एक प्रकारची आमटी आहे. कानडी पद्ध्तीची. कोणाला पाककृती माहीती असल्यास कळवावी. {हुश्श!! मराठी लिहि्ण्याचा १ ला च प्रयत्न !! चूकभूल द्यावी घ्यावी !!}

दिलीप प्रभावळकरांनी साकारलेल्या माझ्या आवडत्या भूमिका... भाग एक

लेखक भडकमकर मास्तर यांनी शनिवार, 21/03/2009 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
दिलीप प्रभावळकर म्हणजे एकदम भन्नाट चतुरस्त्र अभिनेता.रंगमंच, टीव्ही, सिनेमा सर्व माध्यमांमध्ये ते लीलया वावरले आणि प्रेक्षकांची मने जिंकली. dilipprabhawalkar.com या त्यांच्या संस्थळावरती त्यांच्या सर्व भूमिकांचा तपशील उपलब्ध आहे. त्यातली बरीचशी नाटके पाहिली आहेत... प्रत्यक्ष आणि व्हिडिओवरती. त्यांनी लिहिलेले ’एका खेळियाने’ हे त्यांच्या भूमिकांबद्दलचे आत्मकथनपर पुस्तक नुकतेच वाचले... परत परत वाचले.आधी त्या पुस्तकाची ओळख करून देणारा लेख लिहिणार होतो. ( हे पुस्तक म्हणजे अभिनय प्रवासाची कथा आहे.

किशोर कुमारचे दुर्मिळ गाणे

लेखक देवदत्त यांनी शनिवार, 21/03/2009 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
दोन आठवड्यांपूर्वी रेडियो मिर्ची वर किशोर कुमारचे 'पडोसन' चित्रपटातील 'मेरे सामने वाली..' हे गाणे ऐकले. पण खास गोष्ट म्हणजे ते गाणे दुख:द छटेचे आहे. सिनेमात किंवा कॅसेटमध्येही ते गाणे कधी पहायला/ऐकायला मिळाले नाही. आंतरजालावर मिळालेल्या माहितीनुसार ते गाणे प्रदर्शित झाले नव्हते. पण ते गाणे ऐकण्यास जरूर मिळाले.

नॉस्टेल्जीया

लेखक विनायक पाचलग यांनी शुक्रवार, 20/03/2009 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
चायला आजचा दिवस काही वेगळाच गेला आज सकाळी रेग्युलर कॉलेज वगैरे करुन आलो आणि अभ्यासाला बसलो तेवढ्यात लक्षात आले की आमचा नजीकचा भुत़काळ व नजीकचा भविष्यकाळ(दहावी आणि बारावी) यांची परिक्षा संपत असल्याचे लक्षात आले .वेळ बघतो तर दुपारचे एक वाजलेले ,बर विषय आला तो आला तो काही डोक्यातुन जाइचना. सारखे माझे गेल्या वर्षीचे दिवस आठवु लागले .दहावीची परीक्षा झाल्यावर आम्ही केलेली मजा ,जवळजवळ वीस जणानी एकत्र जावुन पाहीलेला वन टु थ्री हा बोगस चित्रपट .लेट खेळलेली रंगपंचमी वगैरे वगैरे . अचानक जणु काही २८ मार्च २००८ हा दिवस डोळ्यासमोर उभा राहिला.

मधुराभक्ती

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 20/03/2009 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
मज ध्यास दर्शनाचा रे, ना कसलीही आसक्ती अंतरात माझ्या वसते, मीरेची मधुराभक्ती मी गीत तुझे गुणगुणते चैतन्य जणू रुणझुणते गीतातून माझ्या करते तव प्रीतीची अभिव्यक्ती तन राही जरी संसारी मन घेते गगनभरारी एकाच ठायी अनुभवते आसक्ती आणि विरक्ती काळोख मनाला ग्रासे हा जन्मही शापच भासे तुजवाचून जगण्याचीही उरली ना इच्छाशक्ती सर्वस्व तुला अर्पावे आयुष्य इथे संपावे तुजसाठी पुन्हा उमलाया, या जन्मि मिळावी मुक्ती
Taxonomy upgrade extras

मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 20/03/2009 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आशा भोसलेंच्या हस्ते झाले आहे. वादात अडकलेल्या साहित्य संमेलनाला त्या उपस्थित राहिल्या हेच खूप. त्यांनी भाषणही बरं केलं. त्यात साहित्यापेक्षा त्यांनी गायलेल्या गाण्यांशी संबंधित काव्याचा जास्त उल्लेख होता. मानापमानाचे नाट्यप्रयोग इथेही रंगले. माजी संमेलनाध्यक्ष म. द. हातकणंगलेकर तर अपमान झाल्याने निघूनच गेले. रामदास फुटाणे आणि अशोक नायगावकरांनी आनंद यादवांचे भाषण वाचून दाखवावे असा आग्रह धरला होता म्हणे. मुख्य कार्यक्रमात तर फुटाणेंनी कौतिकरावांचे भाषण थांबवून त्यांना यादवांच्या भाषणांच्या प्रती वाटायचे आश्वासन घेतले.

तू..... !

लेखक चंद्रशेखर महामुनी यांनी शुक्रवार, 20/03/2009 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
तू...... तू इथेच कुठेतरी आहेस.... की हा तुझा भास आहे ?... वार्‍याची झुळुक होउन येणारा... तुझा स्पर्श आहे कि रातराणीचा सुवास आहे?...... भोवती फ़ेर धरुन ,आजकाल तु नुसती नाचत असतेस..... गिरक्या घेत..वाकुल्या दाखवत..माझी होणारी धांदल बघत असतेस.. पुस्तक उघडल्यावर,आताशा,तुझा चेहेराच दिसायला लागतो..... हार्मोनियम उघडुन मग मी.. तुझी फ़र्माइशी गाणीच गायला लागतो.... रस्त्यावरुन जाताना..वळ्णा-वळ्णाला.. आठवणी दिसायला लागतात... सिग्नल संपुनही रस्त्यात तसेच थांबल्याने... मग मागच्या लोकांच्या शिव्या खायला लागतात.......... निळ्याशार आकाशात... चंद्राकडे पाहाताना..