Skip to main content

दमलो बुवा! :)

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 27/03/2009 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
जरा कुठे पाच सहा-तास ऑफलाईन असावं आणि येऊन पाहावं तर किमान ५/६ तरी नवे लेख, कविता आणि त्याला प्रत्येकी किमान ३०-३५ प्रतिसाद आलेले पाहायला मिळातात! अरे यार पब्लिकला एवढं लिहायला आणि ते वाचकांना ते वाचून प्रतिसाद लिवायला टाईम तरी केव्हा भेटतो तेच समजत नाय! :) आम्ही हे सगळं केव्हा वाचणार, केव्हा प्रतिसाद देणार, ते काय समजत नाय बा! छ्या, हल्ली मिपाचं हे चित्र पाहूनच 'दमलो बुवा!' असं म्हणायची वेळ येते! :) असो.. आपला, (दिवसेंदिवस कामधंद्यात पार गुरफटत चाललेला!) तात्या.

पसारा

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 27/03/2009 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा पुलस्ती यांची सुंदर रचना शहारा किती पाळणे हलून गेले अता थांबबा... थकून गेले रंगामध्ये आले मी अन- कुठे अचानक उठून गेले? घरात डोकावले; दचकले कुणी कडे मी चुकून गेले! अजून खाटेवरी पसारा कुणी इथे बागडून गेले जमेलसे वाटलेच नव्हते हळूहळू मग जमून गेले... काल मला ती काय म्हणाली? "काम तुझ्यावीन घडून गेले" सदर्‍याला का गंध निराळा कोण पाखरू बसून गेले? पती जरासा सुंभ निघाला लग्ना दिवशी पळून गेले! श्वासांची येरझार "केश्या"- खरे काय ते कळून गेले?

तुझं घर

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 26/03/2009 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या शब्दांची पाखरं उडतील वार्‍यावर दाही दिशांत फिरून शोधतील तुझं घर तुझ्या अंगणी विसावा घेतील ती क्षणभर माझ्यासाठी आणतील तुझ्या गाण्यातले सूर माझ्या आशेचा पाऊस बरसेल झरझर ओल्या मातीच्या गंधाने धुंदावेल तुझं घर मोती थेंबांचे सांडेल तुझ्यासाठी फुलांवर माझ्यासाठी आणील तो तुझा प्राजक्तबहर माझ्या स्वप्नांचे काजवे जागतील रात्रभर उजळेल तुझं घर, तुला दिसेल समोर उभा अंगणी मोहक चांदण्यांचा गुल्मोहर माझ्यासाठी झळाळेल तुझ्या हास्याचे झुंबर माझ्या कल्पनेचा वारा माझा धरून पदर मला संगती नेईल दाखवाया तुझं घर मंद शीळ घालून तो उघडील तुझं दार माझ्यासाठी आणील तो ............तुलाच माझ्यासमोर!
Taxonomy upgrade extras

नववर्षाच्या शुभेच्छा आणि एका नविन उपक्रमाची सुरुवात.

लेखक रामदास यांनी गुरुवार, 26/03/2009 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या एका नविन वर्षाची सुरुवात होते आहे. शुभेच्छा.मिपावर गेल्या वर्षभरात बरेच नविन प्रयोग वाचायला -बघायला मिळाले.एक कमतरता कायम वाटत होती ती म्हणजे व्यंगचित्रांची.चित्रकार छायाचित्रकार आहेत पण व्यंगचित्रकार नाहीत असे वाटत होते.आजचा प्रयोग आहे तो ही पोकळी भरून काढण्यासाठी.मला आवडलेली बरीचशी व्यंगचित्रे मी संग्रहात ठेवली आहेत. यापैकी काही व्यंगचित्रे आपल्यापुढे ठेवतो आहे.या कलाकृती माझ्या नाहीत.बर्‍याचशा इंग्रजी मासीकातून घेतलेल्या आहेत.मला अपेक्षीत आहे तो प्रयोग असा. जुने व्यंगचित्र नविन चित्रकारानी परत तयार करावे.जुने गाणे नविन आवाजात रेकॉर्ड करतात तसेच.

अशक्य केवळ -२

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 26/03/2009 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा :- जयश्री अंबासकर यांची कविता अशक्य केवळ तुला मोजणे मणात केवळ किलोत आता अशक्य केवळ तुझी पाहता फुगीर गात्रे तुला तुमानी अशक्य केवळ नको तंग ही उगाच वसने बसता होइल दुभंग केवळ पुन्हा कसे मी बारिक होऊ रोज पळावे जिमेत केवळ करा "केशवा" पुन्हा तयारी लक्ष असु दे हे शेप केवळ केशवसुमार

निरोप

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 26/03/2009 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
कसा आज मोगरीने डाव साधला सुन्न ओझे आठवांचे घाव घातला.. सुटे भान दिशाहिन आज जाहलो सापडेना मार्ग माझा चांद मातला.. हरवले माझे पण तुला पाहता आसवांनी दोर माझा आज कापला.. संपले ते स्वप्न सारे सत्य जाणता भुतकाळ रम्य सारा आज बाटला.. हंसलीस खिन्न सखे ओठ दाबुनी आसवांना लपविता भाव दाटला.. एकवार हास पुन्हा ओठ दुमडूनी अजुनही त्यात माझा श्वास गुंतला..! विशाल