Skip to main content

आय.सी.यू.---एक अनुभव,एक चिंतन!

लेखक वैशाली हसमनीस यांनी रविवार, 29/03/2009 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
इंटेंसिव्ह केअर युनिट हे शब्दच फार अवघड आणि बोजड वाटतात नाही ? हे शब्द नुसते उच्चारले तरी सामान्य माणसाची छाती धडधडते,श्वास कोंडल्यासारखा वाटतो,उर धपापतो आणि उदगार निघतात,'अरे,बापरे,सिरियस कां ?'तर अश्या ह्या आय.सी.यू.मध्ये मी तीनवेळा जाऊन १०-१५ दिवस माझ्या धडधड्त्या हर्‍दयासहीत घालविले आहेत आणि तरीही त्यावर कांही लिहीण्याइतपत मी आज बरी आहे.

गुलाम!

लेखक उमेश कोठीकर यांनी रविवार, 29/03/2009 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा जन्म दु:ख माझे अष्ट्पुत्रा! शाप माझे! माझा कळप पुरुषी येथे स्थान काय तुझे? तुझे अर्थार्जन माझे तुझे प्रजनन माझे श्वास घे तू जगण्यापुरते मात्र नियंत्रण माझे! संतती! पौरूष माझे कन्यादान पुण्य माझे! घरा येता अवकळा मग पांढरे पाय तुझे! असो पोकळ पौरूष कर पूजन तू माझे तुझ्या अस्तित्वी पहारा तुझ्या मागे नाव माझे! तुझे तनमन माझे! तुझे प्राण आत्मा माझे आला जरी कधी यम आण परत प्राण माझे! मंगळसूत्र! चिन्ह माझे! बाळग जाणिवेचे ओझे! ताट वाढ आधी मला जे उरेल ते तुझे! तू लक्ष्मी? धन माझे जे जे तुझे ते ते माझे चल!
Taxonomy upgrade extras

मिपाचे सिद्धटवाळ लेखक्/लेखिका !!

लेखक टारझन यांनी रविवार, 29/03/2009 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , वाद टाळण्यासाठीच काही खुलासे : १) स्वरबासकर काकांची माफी मागत आहे ! २) देव काकांचा आदर आहेत , पण त्यांनी लिहीलेल्या लेखमालेची खिल्ली उडवणे हा हेतू नाही . ३) सर्वांनीच हलके घ्यायचे आहे बरं .. अन्यथा मी काही करू शकत नाही ४) ह्यात फक्त टवाळखोरांचाच समावेश करण्यात आला आहे ,उरलेले सगळे सिद्धहस्त लेखक लेखिका आहेत. ५) काही सिद्धहस्त लेखक आमच्या दृष्टीने टवाळकी विभागात मोडतात ते त्यांना ही समाविष्ट करण्यात आले आहे .. ६) प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार लेखकांचे लेख शोधावेत ..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

लेखक विनायक पाचलग यांनी रविवार, 29/03/2009 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याची फार पुर्वीपासुन इच्छा आहे तसा तो पुर्वीदेखील साधायचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी माझे स्वतःचेच मत तयार नव्हते,त्यामुळे तो धागा मी उडवला होता त्याबद्दल आपण बोलुच, पण आज खुप दिवसानी मटात एक उत्तम लेख वाचायला मिळाला तो ही संघपरिवारावर! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4328492.cms तो जरुर वाचा आता माझ्या मुद्द्याविषयी मध्ये जेव्हा मी याच विषयावरचा चर्चा प्रस्ताव येथुन उडवला त्यानंतर या विषयावर खुप विचार केला,काही मते तयार

ह्या पेक्षा बेहत्तर परंपरा हवीच कशाला?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 29/03/2009 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
अलका आमोणकरला मी एक सुसंस्कृत शिक्षीका म्हणून मानतो.कोकणातल्या एका खेड्यात ती तन्मयतेने एका शाळेत शिक्षीका म्हणून काम करायची.आणि अजूनही करते.ती एकदा आमच्या घरी आली होती.मी तिला सहजच म्हणालो, "काय गं अलका,तू इतकी वर्षं शाळेत शिकवतेस, खेड्यातल्या शाळेतल्या मुलांच्या आणि शहरी वातावरणातल्या मुलांच्या ज्ञान संपादनाच्या दृष्टीने काय अपेक्षां असतात?" अलकाला नाहितरी शाळेबद्दलचे विषय घेऊन चर्चा करायला खूपच दिलचस्पी आहे हे मला माहित होतं. लागलीच ती मला म्हणाली, मी जरी माझ्या कामावर प्रेम करीत असले तरी तसं करणं एकदम सोपं नाही.मी आठवीच्या इयत्तेतल्या मुलांना शिकवते.त्या मुलांची शिकायची हौस खूपच आहे.एखाद्

महाजालावर कोल्हापुर

लेखक विनायक पाचलग यांनी शनिवार, 28/03/2009 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या माझे मित्र राजे हे आमच्या गावाबद्दल अर्थात कोल्हापुरबद्दल खुप लिहित आहेत त्यामुळे अनेकाना कोल्हापुरबद्दल उत्सुकता असेल ती उत्सुकता ऑनलाइन भागवण्यासाठी हा लेख सध्याचे युग हे संगणक युग आहे यापुढे सर्व व्यवहार संगणकावर होणार आहेत त्यामुळे सध्या महाजालावर कोल्हापुरची स्थिती काय आहे याचा यानिमित्याने आढावा घेणे आगत्याचे ठरते आणि म्हणुनच एक नेटीझन म्हणुन घेतलेला हा आढावा तर प्रथम आपण गुगल कडे वळु गुगलवर एखाद्या गावाला योग्य स्थान असणे म्हणजे त्याबद्दलची योग्य माहिती उपलब्द्ध असणे महत्त्वाचे आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे कोल्हापुरची दखल गुगल कडे आहे गुगल मॅप द्वारे(

... कवितेचा आजार हवा

लेखक अजय जोशी यांनी शनिवार, 28/03/2009 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
सांगितले मी कुणातरी की शब्दाला आकार हवा कुण्या कवीने म्हटले मजला, 'कुणाकुणाला मार हवा?' 'मीही आहे तयार' म्हटले, 'पण थोडेसे थांबा ना...' विष काढण्याआधी जरासा नागाचा फुत्कार हवा तिने पहावे, तिने म्हणावे - किती काम सांगशी तिला ! तीच अता कंटाळुन म्हणते, 'बसण्यासाठी पार हवा..' रस्त्यावर टाळत असते अन घरी कधी भेटत नाही स्वप्नी येउन हळूच म्हणते - तुजसारखा यार हवा.. चोरुन घेती शब्द कुणाचे अन खाऊनी जाती भाव सलाम यांना करण्यासाठी निश्चित वेडा ठार हवा औषध पिऊन तेच तेच कंटाळुन गेले कितीतरी मदिरा नसते उपाय यावर - तुजला बाराक्षार हवा दुर्मुखला चेहरा घेऊनि प्रेमाचे गुणगान क
Taxonomy upgrade extras

(खरच आता नको )

लेखक मराठमोळा यांनी शनिवार, 28/03/2009 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा विशाल कुलकर्णी साहेब. कृपया ह. घ्या. काव्यांचे पसारे खुप झाले कवितांचा खच आता नको ... ! विडंबनाचे रेचक थोडे घेऊया गंभीर कवीतांचे अजीर्ण आता नको ... ! तेच तेच शब्द काव्यांमधे शब्दांची घुसमट आता नको ... ! चला विडंबनकारांनो एक खेळ खेळु गंभीर कवींचा धाक आता नको ... ! हरवले सारे कवीपण माझे ईच्छा कविता लिहिण्याची आता नको ... ! जिथे तिथे सगळीकडे .., ते काव्य हृदयाला छळणारे आता नको ... ! चल दुसर्‍या विभागात जावू मोह काव्य विभागाचा आता नको ... !
Taxonomy upgrade extras

(देवाने मुलींना अस का बनवलं?)

लेखक अनामिक यांनी शनिवार, 28/03/2009 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा ********************************* देवाने मुलींना अस का बनवलं? की बघताच मन पत्येकीवर बसावं सगळ्याच मला हव्याहव्याश्या वाटतात पण तिने कोणा दुसर्‍याच्याच गळ्यात का पडावं? कुणाचे डोळे, तर कुणाचे ओठ प्रत्येकीचा काहीतरी वेगळाच गुण दरिद्री मेलं मन, एकीवर बसत नाही पाहताच त्यांना वाजते हृदयात धून कुणी हसून आपलंसं करतं कुणी लाजून हृदयात शिरतं प्रत्येकीची खुबी निराळीच असते मग आपली निद्रा कुठे आपल्याजवळ उरते कुणी गुलुगुलू बोलून गार करतं कुणी नुसत्या नजरेनेच वार करतं किती अदा त्रासवण्याच्या असतात मन हे वेडं प्रत्येक नखर्‍यात फसतं सगळ्याच मुली कमाल क
Taxonomy upgrade extras

डरना मना है

लेखक मराठमोळा यांनी शनिवार, 28/03/2009 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
मी कॉलेजात असतानाची गोष्ट. अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्षाच्या परिक्षेचा शेवटचा दिवस. जून महिन्याचा दुसरा आठवडा. माझे दोन्ही सिनिअर रुम पार्टनर आदल्या दिवशीच परिक्षा आणी त्यानंतरची पार्टी संपवुन घरी गेलेले. माझी एक तोंडी परिक्षा बाकी असल्याने अजुन दोन दिवस थांबणे भाग होते. त्याचबरोबर रुम बदलायची असल्याने पॅकिंग करायचे होते आणी वस्तु दुसर्‍या रुमवर हलवायच्या असल्याने घरी जाता येत नव्हते. माझे मुंबईचे मित्र दोन दिवसांसाठी घरी निघुन गेल्याने मी एकटाच उरलो होतो. संध्याकाळी ५:३० ला परिक्षा संपल्याची घंटा वाजली आणी सगळेजण खुष होऊन एकमेकाना शुभेच्छा देऊन घरी जाण्याच्या तयारीला लागले.