मिपाचे सिद्धटवाळ लेखक्/लेखिका !!
णमस्कार्स लोक्स ,
वाद टाळण्यासाठीच काही खुलासे :
१) स्वरबासकर काकांची माफी मागत आहे !
२) देव काकांचा आदर आहेत , पण त्यांनी लिहीलेल्या लेखमालेची खिल्ली उडवणे हा हेतू नाही .
३) सर्वांनीच हलके घ्यायचे आहे बरं .. अन्यथा मी काही करू शकत नाही
४) ह्यात फक्त टवाळखोरांचाच समावेश करण्यात आला आहे ,उरलेले सगळे सिद्धहस्त लेखक लेखिका आहेत.
५) काही सिद्धहस्त लेखक आमच्या दृष्टीने टवाळकी विभागात मोडतात ते त्यांना ही समाविष्ट करण्यात आले आहे ..
६) प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार लेखकांचे लेख शोधावेत .. लेखाची/प्रतिक्रियांची लिंक देण्यार येणार णाही, आम्हास माफ करावे !
७) सर्व मते लेखकाची आहेत , कोणाचा प्रभाव किंवा पगडा नाही.
मंडळी मिपावर एकापेक्षा एक सिद्धटवाळ लेखक/लेखिका(ह्यात विडंबक/विडंबिकाही मोडतात) आहेत. त्यातल्या काही उल्लेखनीय वाचकप्रिय टग्यांचा मी थोडक्यात समाचार घेणार आहे.
पिवळा डांबीस :-
हे सिद्धहस्त असून देखिल सिद्धटवाळ आहेत.
सर्वात पहिले नाव अर्थातच पिवळा डांबीस उर्फ कॅलिफोर्नियाधीश ह्या महाटवाळ लेखकाचे घ्यावे लागेल.(पिडा हे आमचे खास आहेत म्हणून त्याची पिवळी करतोय असे कुणाला वाटेलही तर तो तसे वाटणार्याचा स्वप्नदोष आहे. त्याने तंबुतल्या जडीबुटीवाल्याकडून उपचार करून घ्यावेत) मिपावर आल्या पासून मी पिडांचे लेखन वाचत आलोय. आज पर्यंत मिसळपाव वरचा "बेष्ट टवाळ आयडी" म्हणून आजही पिवळा डांबीस हे बहूमताने णिवडूण येतील .. प्रोफाईल मधल्या माहितीतही ते १ णंबर्स आहेत ह्यात कोणाला शंका णाही. मिपावरील हे व्यक्तीमत्व मी आणि तात्यापेक्षाही वजनी आहे :) आपल्या णावाची जाण ठेवत ह्यांनीच आम्हाला णविण आलो तेंव्हा मार्गदर्शण केले होते , सर्व टवाळांसाठी डांबिसराव हे आग्रमाणांकीत आहेत .
विसोबा खेचर :-
हे ही टवाळकुमारांमधले वाटले :)
ह्यांना अंतर्जालावरचे "सौरव गांगूली" म्हणावेसे वाटते ते काँट्राव्हर्सी मुळेच, पुर्व इतिहास नाही माहीत पण ह्यांचे हितशत्रूंची संख्या जरा अजूबाजूला पाहिलं की उठून दिसते, पण सगळ्यांना पुरून उरलेला विसोबा, कधी कधी अत्यंत मोजक्या शब्दांत समोरच्याच्या तोंडची चव खराब करण्यात माहिर वाटतो. दुनियेला फाट्यावर मारून आपल्याच तानपुर्याच्या वायरी खाजवण्यात मग्न तात्या आम्हाला आवडतो. प्रोफाईल मधली काही वाक्येही खासंच .. बाकीच्या संस्थळांवरचा अणुभव ऐकता ,मिसळपाव वर आमच्या सारख्या किटकांना पोषक असे वातावरण दिल्याबद्दल सर्व किटक समाजातर्फे मी त्यांचा "धुतलेली शॉल" आणि "सोललेला णारळ" देऊन सत्कार करतो , त्यांनी त्याचा स्विकार करावा.
सेंटिमेंटल आनंदयात्री :- "
आमचे अत्यंत जवळचे (वजनानेही बरं :) ) स्नेही , सडेतोड उत्तर देण्याच्या क्षमते मुळे आम्हास जवळचे वाटणारे , मात्र ह्यांचे व्यक्तिमत्व आणि प्रतिक्रियांची साईझ ह्यात काँट्रास्ट आहेच ... सेम थिंग अबाऊट डाण्या अल्सो .. तिकडे पण पर्सण्यालिटी आणि प्रतीक्रिया मॅच नाय करत, तर असो ... ह्यांना अंतरजालावर कोणी चिपकू मुहबोली बहेन भेटली की तळपायाची आग मस्तकी जाते आणि ते संपुर्ण शक्तीनीशी मैदाणात उतरतात , हजारो टिकाकार हे त्यांच्या आंगाखांद्यावर खेळवतात असं ऐकतो, टिकाकारांना एवढं मोठं मैदाण खेळण्यास उपलब्ध करून दिल्या बद्दल टिकाकारांना त्यांची निंदा करावी की स्तुती ? असा यक्षप्रश्ण पडतो .. असो , ह्यांचाही आम्ही "ओला णारळ" आणि "आजीची गोधडी" देउन सन्मान करणार आहोत , "पॅराडाईज" स्थळी त्यांनी ह्याचा स्विकार करावा .
थरमॉकॉलनरेश धम्या :-
हा टवाळ कमालीचा चपळ आहे . कॉफ्या प्यायच्या कमी आणि मॉणिटरवर उडवायच्या जास्त , हा त्यांचा उद्योग. ऑफिसबॉय ला मॉनिटर साफ करायच्या बहाण्याने वारंवार बोलवल्यामुळे त्याच्या मनात धम्या आपल्यावर लाईन मारतो की काय ? असा संशय येऊन आजपर्यंत कंपनीत ५ ऑफिसबॉईज ने पेपर टाकल्याची ब्रेकिंग ण्यूज आहे. "ठॉ करून फुटणे " ह्यासाठी प्रसिद्ध. सिगारेट पिताना कारखाण्यांच्या चिमणी सारखे आकाशात तोंड करून धूर सोडण्याची लकब , परंतू एकदा आमच्याच शेजारी उभे राहून हा फंडा वापरल्याने तो धूर खालून थेट आमच्या णाकपुड्यांत गेला .. आणि आम्हाला जोराचा ठसका लागला, आपली फ्रेंची कुरवाळणे (कृपया फ्रेंचीला दाढीमिशांची एक स्टाईल ह्याच अर्थाने घ्यावे ) मिपावर लिहीणे कमी आणि प्रतिसादवणे जास्ती. हे ही आहाला प्रिय आहेत , ह्यांना एक "रूमाल-सुपारी" देऊन सन्मानित करण्यात येते !
खत्रूड छोटा डॉण :-
मिसळपावाच्या सिद्धटवाळांमधे ह्यांच नाव घ्यावं की नाही ह्या मिलियण डॉलर प्रश्णामधे गुंतलेलो .. पण म्हंटलो घेउनच टाकू, कितीक जागा खाणार आहे ? कधीकधी श्वानमुका घेतल्यावर मरणाचं सिरीयस आणि प्रचंड खोलात म्हणजे पार्किंगच्या वजा ६व्या फ्लोर वर जाऊन लिहीतात, प्रतिक्रियांची साईझ म्हणाल तर ती बहुतांश वेळा लेखांपेक्षा मोठी असते , टायपिंगचा स्पिड जबरदस्त असावा, आपल्या टवालखोरीमुळे चालक/मालकांच्या "शरमेचे" कारण बर्याच वेळा बणले आहेत , परंतू हे पारतंत्र्य काळात स्वदेशींसाठी तुरूंगात जाण्यासारखे असल्याने सन्मानाचे चिन्ह आहे. ह्यांचा ही "रूमाल-सुपारी" देऊन सत्कार करण्यात येणार आहे .
तुरट ब्रिटिश टिंगी :-
टिपीकल पुणेरी शैलीची टिका , आपल्या नावास आणि कुळास जागतात. "किमाण शब्दात कमाल अपमाण " करण्यात माहीर .. जगाच्या उत्तर ध्रूव साईडने काऊंटर अटॅक करण्यासाठी सिद्धटवाळ संघटनेने त्यांना लंडणात बसवलं आहे. सर्व लेखांवर बारिक लक्ष !! गोडू बोलून मारण्यात हातखंडा, आपला खोबरं आणि खडिसाखर देऊन गौरवण्यात येत आहे .
खवट शेंगदाणा अर्थात कुंदन :-
कधीतरी मधेच येऊन काही तरी खडा टाकून जाणार आणि बाकीच्यांना हसून लोटपोट करणार , इतरांचे विचार जिथे संपतात तिथे यांचे ही संपतात .. पण विचार सुरू कुठून होतात ह्यावर ते स्वतःच रिसर्च करत आहेत ! मितभाषी असल्याने आपले विचार बहुदा व्यनि ने किंवा प्रायव्हेट चाट वरंच कळवतात :) बहुदा आखाती देशांत कुठे चावटपणा केल्याने बोलल्यास कापून काढू (जिभ .. जिभ हो .. ) अशी धमकी मिळाली असाव. आपला "खारिक-खोबरं" देऊन गौरवण्यात येत आहे.
विडंबक परिकथेतील राजकुमार :-
लोकं जितकी पितात तेवढी हे पिताना सांडतात असं ऐकून आहे ! अत्यंत कमी कालावधीत आपल्या टवाळ आणि टूकारपणा मुळे लवकर प्रसिद्ध पावले आहेत. खडूस सदाशिवपेठी शैली! टार्गेट करून हमला करण्यात हातखंडा !! जुणे पुराणे लेख/कविता/प्रतिसाद/खरडी उकरून काढून विडंबण मारणे हा त्यांच्या कडे किती वेळ आहे ते दर्शवतो ,, म्हणूनच पंगे करताना संभाळून .. राजकुमाराप्रमाणेच पर्सणॅलिटी :) आपल्याला हॉर्लेक्स आणि सेलेलॅक देऊन गौरवण्यात येत आहे .
आवलिया :-
मिसळपाव वरची "वण मॅण आर्मी" . एकला चलो रे ह्या वाक्याने प्रचंड प्रेरित की प्रभावित काय ते .. वाटतात . कधी कधी सन्यासाच्या गोष्टी करतात , आतल्या गाठीचे , मिसळपाव वरची काँन्फेडेण्शियल प्रोफाईल, काऊंटर अटॅक करण्यात स्पेषॅलिटी ... हल्ल्ली चावटगुरू महाप्रभुंबरोबर चांगले सुत काततात . सिरीयस आणि स्वतःचं लिखाण ही मजबूत करतात पण त्याबद्दल बोलणे हे अवांतर ठरेल, विडंबणे , प्रतिसाद ह्या बाबद कंसिस्टंट आहेत. नादी लागताना विचार करावा , 'ह्यांना ढिगभर कागद रद्दी आणि एरिमेल्डचं शाईपेन देऊन गौरवण्यात येत आहे .
चावटगूरू विनायक महाप्रभू :-
ह्यांना आधी आडवा दंडवत , सेहवाग जसा सिनीयर झाला तरी खेळाची स्टाईल चेंज करत नाही तसं ह्यांनी देखिल आपलं एक व्यक्तिमत्व ठेवलं आहे. ह्यांच्या चावटपणाला काही सिमा नाही, डबलमिनींग वाक्यांत दुसरा अर्थ पहिला असतो आणि पहिला अर्थ ... तो अज्जिबात ऍप्लिकेबल नसतो हे आतापर्यंत आपण जाणताच , ह्यांचा पहिला लेख आला तेंव्हा आम्ही ह्यांच्या लेखणशैलीवर टिकेचा सुरू उठवला होता, पण त्याच शैलीचे आज फॅन आहोत , व्यनी/खरडींतून येणारा क्रिप्ट हा शेन बाँडच्या यॉर्कर प्रमाणे असतो, बहुतांश फलंदाज ह्यावर स्वतःच्याच पायावर बॅट मारून स्वत:लाच जखमी करून घेतात, मोफत समुपदेशन करतात. ह्यांना देण्यासारखे काहीच नाही , म्हणून आम्ही आपल्याला लवकरच "भेट देऊन" आपला गौरव करणार आहोत :)
डिडिटी बिप्स कार्यकर्ते
तरूण तुर्क मधले डिडिटी अर्थात "दिनानाथ दामोदर थत्ते" , लेख जरी अंमळ सिरीयस लिहीत असले तरी ह्यांचा समावेश टावाळांमधे होऊ शकतो , कारण "आमच्या आमच्या सारखे " असतात. ऐन टायमाला फोन करण्याची खोड... प्रसंगी सल्लागार प्रसंगी टवाळकी , आमच्यातले वयोवृद्ध "दधिच ऋषी" ... चाट वर कायम बिझी स्टेटस पण गप्पा आणि टाईमपास करत असतात , कंपनीचं नेटबिल वाढवतात , आपल्यालाही भेट देऊन गौरवण्यात येईल.
मृगणयणी :-
वाटेला जाल तर याद राखा, आपली व्यवस्थित गेम वाजवली जाईल :) ग्रंथांच्या लांबीच्या कविता , प्रासंगिक कविता, विनोदी कविता, प्रेमकविता , आणि कविता लाड .. अर्रर्र सॉरी .. कविता करतात एवढंच पुरे .. करडफळ्यावर कधीकाळी बोलबाला होता, अत्यंत गोड आवाज आणि हसण्याची स्टाईलही ~!~ असो , टवालपणात आम्हाला ह्यांची बर्याच ठिकाणी मदत झाली आहे !
राज जैन :-
हे एक टवाळ .. अति टवाळ म्हनावं का ? लहाण पणा पासून पळण्याची सवय अजुन सुटलेली नाही, एकदा सुरू झाले की पळत सुटतात ... मिसळपाव वरचे "अकला बुकल" आणि "डेव डी" .. खरडवह्या भरवने ,.,,,, चेन सेरिज मधे प्रतिसाद देणे , कंपुहल्ला करणे ह्यात रस ... लहाणपणापासूनच एक प्रॉब्लेम चाईल्ड ..
हिडिस टारझन :-
ह्याच्या विषयी आमच्यातलंच कोणीतरी लिहू शकेल =)) ( ते काय .. खाली आंद्या म्हणतो तसंच ) अंमळ येडपट आहोत ह्याची कल्पना आहेच :)
समारोप :
काही नावं राहिली आहेत !!
वाचने
17583
वाचनखूण
प्रतिक्रिया
46
पिडा हे
In reply to पिडा हे by विसोबा खेचर
ओ तात्या ...
In reply to पिडा हे by विसोबा खेचर
शन्का:
हिडीस ठारझण
In reply to हिडीस ठारझण by आनंदयात्री
आंद्या,
In reply to हिडीस ठारझण by आनंदयात्री
+१
In reply to हिडीस ठारझण by आनंदयात्री
धन्यवाद
In reply to हिडीस ठारझण by आनंदयात्री
आज
लै भारी......
In reply to लै भारी...... by जेन
इतरां विषयी लिहणे सोप्पे असते
ठ्या:
हाहाहा!
हा हा हा लई भारी!!
महान!!!!!!!!!
In reply to महान!!!!!!!!! by बिपिन कार्यकर्ते
बिपिनदाशी सहमत आहे.
काही नावे राहिली आहेत..
टार्या
च्यायचं ह ल क ट !!!!
काहीच्या
ज्यांना
:)
अतिरथी.... महारथी...
हेहे भारी
>>पुर्व
"ण" महामंडळ ,
In reply to "ण" महामंडळ , by मनीषा
+१
आपली
निशब्द
In reply to निशब्द by दशानन
टारझणा....
सर्वांचे
In reply to सर्वांचे by टारझन
फक्त स्तुत्यांचे स्वागत आहे का ??
टारझणभो..
लेख मस्त
टारझण भौ! लय भारी!
लेख
काही
In reply to काही by विसोबा खेचर
धागा
टारझ'ण' भौ...
टार्याचा णिषेध!!!!
अरे...
In reply to अरे... by आपला अभिजित
च्यायला ..
जहबर्या,
टारझन यांची लिहायची शैली आवडली
मस्तच जबरा
मस्त लेख!
समारोप : काही नावं राहिली