Skip to main content

गाडीच्या गाडीवाना...

लेखक डॉ. आनंदा वारके यांनी बुधवार, 01/04/2009 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
गाडीच्या गाडीवाना गाडी चालली माळराना S S S तुज्या गाडीचा गा बैल बैलापाठी नक्षाची झुल तुज्या गाडीचं गा चाक चाक धावतया एकटाक गाडीच्या गाडीवाना गाडी चालली माळराना S S S तुज्या बैलाच्या गळ्यात चाळ चाळ वाजत्यात खुळखुळ तुज्या कपाळाचा गा घाम घाम देतोया दाम गाडीच्या गाडीवाना गाडी चालली माळराना S S S
Taxonomy upgrade extras

नर्सरी

लेखक जागु यांनी बुधवार, 01/04/2009 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
कालच माझ्या मुलीचा नर्सरीतील निरोप समारंभाचा सोहळा पार पडला. ह्या सोहळ्याच्या निमित्ताने नर्सरीच्या शिक्षकांनी मिळून मुलांचे काही नाच, कविता, गाणी बोलण्याचे कार्यक्रम ठेवले होते. नाच शिक्षकांनीच मुलांकडून बसवून घेतले होते. रितसर मुलांना खाऊ दिला. काही उत्सुक पालकांनी सगळ्या पालकांकडून पैसे जमा करून शाळे करीता भेट वस्तू देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या संचालक शिक्षिकेने आम्हा पालकांना काही मनोगत व्यक्त करायचे असेल तर करायला सांगितले. सगळ्या पालकांच्या वतिने मी बोलण्याचे ठरविले आणि फक्त त्यांचे आभार मानले. पण मनात थोडी खंत राहीली की अजुन मी माझे नर्सरी बद्दल मत मांडायला हवे होते.

पहिली भेट

लेखक जागु यांनी बुधवार, 01/04/2009 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
आठवते तुला भेट आपली पहिली पहिल्या भेटीतली गुपिते पहिली हवे तर विचार त्या लाटांना रोजच येतात त्या किनार्‍याच्या भेटीला सुर्यही तुझी वाट पाहत रेंगाळला होता तू आलेला पाहुन निर्धास्त मावळला होता यायला तुला खुप उशिरच झाला होता पण तुझ्या आगमनात अपराधी भावच नव्हता माझा रागही मी तेंव्हा व्यक्त केला नव्हता जवळून तुला न्याहाळण्याचा धिरही होत नव्हता बसलो होतो आपण ज्या दगडावर, विचार त्याला माझा थरथरता देह त्यानेच सावरला होता विचार त्या घोंघावत्या वार्‍याला तो ही सांगेल माझी ती ओशाळली स्थिती जेंव्हा तू हात माझा धरलास बांगडी पाहण्यासाठी दुरावा दुर करण्याचे तुझेही ते होते निमित्त पण तुझ्यात हरवले होते तेंव्ह
Taxonomy upgrade extras

आठवण.... !

लेखक चंद्रशेखर महामुनी यांनी मंगळवार, 31/03/2009 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
आठवण.... !! आठवणींनी तुझ्या साजणी..र्‍ह्दयाला ग पीळ पडे.... कशी ऐकीशी साद सखे परि... मी इकडे अन तु तिकडे... हे गड्द जांभळे मेघ होउनी...वाटे यावे तव अंगणी... रातराणीचा सुवास होउन.... मी गंधावे तव सदनी... सागरास नदी मिळे कशी ग.. रिती-नीती चे बांध खडे कशी ऐकीशी साद सखे परि... [१] मेघ-वृक्ष अन पान-फ़ुले.. अवखळ निर्झर उंच कडे... चंद्र-चांदण्या हे वारे.. मज भास दाविती तुझे गडे... शोधि तुजला जीव खुळा बघ.. होउन पक्षी चोहिकडे कशी ऐकीशी साद सखे परि... [२] आज जरी तु दूर असे.. प्रिया न माझी मला दिसे... ऐलतीरी मी उभा साजणी..मनी प्रितीचे गीत वसे... ओठांवरचे भावतराणे..

तुमचे एप्रिल फूल

लेखक निशिगंध यांनी मंगळवार, 31/03/2009 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक नविन विषय सुचला आहे. तुमचा प्रतीसाद आवश्यक आहे. कधी तरी तुम्ही कुनाला केले असाल किंवा तुम्ही कुणाचे झाला असाल हो. अहो एप्रिल फूल चे शिकार हो!!!!!!!!! तर मग करा त्या आठवणी ताज्या सर्वासोबत. माझे सांगतो तसे खुप प्रसंग आहेत. पण एक खास. मला एका मित्राचा फोन आला एप्रिल फुल च्या सकाळी. माझ्या लक्षातच नाही राहीले की आज एप्रिल फुल आहे म्हनुन. त्याच्या फोन मधुन बस चा गोंगाट होता. मला म्हणाला मी सोलापूर आलो आहे ( मी मुळचा सोलापूर चा). आणी मी अक्कलकोट ल चाललो आहे, तु जर येत असला तर ये.

सबप्राईम क्रायसिस--पुढे काय?

लेखक क्लिंटन यांनी मंगळवार, 31/03/2009 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेतील सबप्राईम क्रायसिसची सुरवात आणि ते संकट जगभर कसे पसरले याचा उहापोह बामनाच्या पोराने सुरू केलेल्या या चर्चेत झालाच आहे.आता या संकटाची पुढील पावले कशी पडतील यावर माझे भाष्य करत आहे.