Skip to main content

आठवण.... !

लेखक चंद्रशेखर महामुनी यांनी मंगळवार, 31/03/2009 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
आठवण.... !! आठवणींनी तुझ्या साजणी..र्‍ह्दयाला ग पीळ पडे.... कशी ऐकीशी साद सखे परि... मी इकडे अन तु तिकडे... हे गड्द जांभळे मेघ होउनी...वाटे यावे तव अंगणी... रातराणीचा सुवास होउन.... मी गंधावे तव सदनी... सागरास नदी मिळे कशी ग.. रिती-नीती चे बांध खडे कशी ऐकीशी साद सखे परि... [१] मेघ-वृक्ष अन पान-फ़ुले.. अवखळ निर्झर उंच कडे... चंद्र-चांदण्या हे वारे.. मज भास दाविती तुझे गडे... शोधि तुजला जीव खुळा बघ.. होउन पक्षी चोहिकडे कशी ऐकीशी साद सखे परि... [२] आज जरी तु दूर असे.. प्रिया न माझी मला दिसे... ऐलतीरी मी उभा साजणी..मनी प्रितीचे गीत वसे... ओठांवरचे भावतराणे.. सूर होउनी कानी पडे अशी ऐकीशी साद सखे.. जरी मी इकडे.. अन तु तिकडे.. अशी ऐकीशी साद सखे जरी... [३] - चंद्रशेखर...
लेखनविषय:

वाचने 1035
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

पहिलं कडवं जास्ती आवडलं. ऐकीशी.. की ऐकीसी?? :? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/