Skip to main content

काय करावे ?

लेखक दशानन यांनी शनिवार, 04/04/2009 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज काम धंदा काही नाही आहे ;) काय करावे ह्या बद्दल जरा तुमची मते सांगता काय ? ** मस्करी करा पण त्याची कुस्करी होऊ नये ह्याची काळजी घ्या.

स्वच्छ हवेचा पहिला श्वास

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 04/04/2009 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
" मी वर्तमानकाळात राहण्याचा प्रयत्न करतो.शुद्ध हवेची नेहमीच महक घेतो.माझ्या पत्नीबरोबर सकाळीच एक कप कॉफी झुरकण्यात मजा लुटतो.बागेतली पिवळी जर्द फुलपाखरं उडताना पाहून आनंदी होतो." काही व्यक्तींच्या नशीबात सदैव दुःखच असतं.अर्थात नेहमी सुखाचे दिवस मिळणं जरा अपवादात्मक आहे.पण जीवन जगायला सुखदुःखाची कमी अधिक प्रमाणात जरूरी भासते.होऊन गेलेल्या घटना आठवणीत आणून मन रिझवण्यात मजा येते.

तु !

लेखक दशानन यांनी शनिवार, 04/04/2009 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
एका प्रेमवीराची मानसीक अवस्था जेव्हा त्याची ती त्याला असेच मध्ये सोडून जाते तेव्हा तो प्रेमवीर काय विचार करत असेल ह्यांची एक कल्पनामात्र... ************************************ किती सोपा शब्द आहे नाही, पण ह्यांचा अर्थ माझ्यापेक्षा कोण जाणेल.. ह्या शब्दांचे! तुझ्या शिवाय माझे अस्तिव काय ?

पैशाची कहाणी भाग १: वस्तूविनिमय पध्दती

लेखक क्लिंटन यांनी शुक्रवार, 03/04/2009 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
पैशाची कहाणी भाग १: वस्तूविनिमय पध्दती
जसाजसा मानवी संस्कृतीचा विकास होत गेला तशातशा माणसाच्या गरजाही वाढत गेल्या.अन्न,वस्त्र,निवारा या मूलभूत गरजांबरोबरच त्याला दागदागिने,चपला, लोहारकाम,मनोरंजना यासारख्या सेवांच्या गरजा वाढीस लागल्या.कोणीही व्यक्ती आपल्याला आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टींची/सेवांची पूर्तता करू शकत नाही हे त्याबरोबरच सर्वांच्या लक्षात आले.तेव्हा प्रत्येकाने आपल्याला जी गोष्ट चांगली बनवता येते ती बनवावी आणि त्या गोष्टींची देवाणघेवाण करून सर्वांच्या गरजा पूर्ण कराव्यात ही पध्दत रूढ झाली. उदाहरण सोपे करायला माणसाच्या गरजा द

आपणच........!

लेखक उमेश__ यांनी शुक्रवार, 03/04/2009 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
आपणच आपल्याला लिहलेली पत्रं वाचता वाचता ओले होणारे डोळे पुसून फडफडू द्यावित वा~यावर पानं.... थोडसं हसून आपणच आपल्याला सांगावी कधीतरी एखादी गोष्ट आपणच गावं आपल्यासाठी रिमझिमत्या स्वरांच एखादं गाणं....... आपणच जपावेत मनात; वा~यावर झुलणारे गवताचे तुरे एखादी धावणारी पायवाट, अन् जपावेत काही नसलेले भास्...... जिथं आपल्यासाठी फुलं उमलतील अशी जागा सगळ्यानाच सापडत नाही मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना आपणच द्यावेत थोडेसे श्वास........
Taxonomy upgrade extras

मिसळ्पावच्या सर्व खवय्यांना/सभासदांना नमस्कार!

लेखक नितिन बोरसे यांनी शुक्रवार, 03/04/2009 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव हे मला मिळालेल विशेष आणि आवडीच ठिकाण आहे,कारण एखाद्या मुसाफीराने पूर्ण शहर हॉटेलमध्ये जेवणासाठी पालथ पाडाव आणि दूर कुठून तरी खमंग मिसळपावचा वास येउन मनाची ओढ तिकडे जायला भाग पादावी. पेपर रोजच वाचले जातात, बातमी देखील रोज नवीन परंतू कोठल्याही बातमीची पूर्तता नाही, अफजलची केस निकालात लागेपर्यंत कासाब कोर्टात हजर होतोय, अफजलच पुढे काय याची छोटी बातमी देखील येत नाही.....कारण निवडणूका आल्यात बातम्यांना जागा पूरणार कोठून? आज एवढच सांगेन मिसळपाव खा आणि फ्रेश व्हा!!!

(ब्यूटी पार्लर अर्थात काव्यफुफाटा)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 03/04/2009 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
सक्काळी सक्काळी मिपावर आलो आणि 'ब्यूटी पार्लर अर्थात यौवन फुफाटा' ही कविता वाचून डोळे भरुन आले! काल भडकमकर मास्तरांनी जालिंदर जलालाबादींची ओळख काय करुन दिली आणि आज ही नवकविता वाचायला काय मिळाली, सगळेच विलक्षण! हे म्हणजे आज आर्त भावाने विठ्ठलाची भक्ती करावी आणि लगेच दुसर्‍या दिवशी साक्षात पांडूरंगाने आपल्याला डब्बलसीट न्यावे तसा प्रकार झाला!! धन्य आहेस माऊली धन्य आहेस!!

ब्यूटी पार्लर अर्थात यौवनफुफाटा

लेखक शरदिनी यांनी शुक्रवार, 03/04/2009 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
सांग दर्पणा कशी मी दिसते... ..... जामानिमा साग्रसंगीत कौशल्याचे कुवलयापीड .... मन जळे जीव उरे काजळावर कृष्ण पुटे .... हल्लीच फुटलीय कोंडी अन् परतवलेत आरंभशूर हल्ले ... फसव्या क्रांतीला झालीय बाधा यच्चयावतांची विचक्षण त्रेधा ... पीटिकांना मसाज अन् मलम पण मनावर कोणते कलम? ... कोणते सन्मान अन् कोणते पुरस्कार दिव्या दिव्या दीपत्कार...
Taxonomy upgrade extras

दोन राज्यांचे रेल्वे स्टेशन

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 03/04/2009 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
नवापुर - (हो तेच ते बर्ड फ्लू वाले) हे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्याच्या हद्दीवर वसलेले तालूक्याचे ठिकाण आहे. येथूनच राष्ट्रीय महामार्ग ६ (नागपूर- सुरत) जातो. ते नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात मोडते. स्वतंत्र महाराष्ट्र होण्यापुर्वी हे गाव गुजरात मध्ये जाणार होते. त्या वेळी तेथील लोकांनी ठराव करून हे गाव महाराष्ट्रात आणले. (गुजरात मधील सुब्बत्ता बघुन त्यांचे आत्मे आता पस्तावत असतील.) या गावात मराठी तसेच गुजराथी लोक गुण्यागोवींदाने राहतात. शहरात नगरपालिका स्वच्छ्तेची विषेश काळजी घेते असे दिसले. हे गाव उकाई धरणाच्या पाण्याच्या फुगवट्याच्या (मराठीत आपले 'बॅक वॉटर' हो)जवळ आहे.