Skip to main content

सख्खे शेजारी

लेखक जागु यांनी शुक्रवार, 17/04/2009 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्यातली दोन मनं अगदी सख्खे शेजारी एक वेडं , तर एक शहाणं ! वेड्याच्या हाती तलवार तर शहाण्याच्या ढाल ! वेडं वाट चुकत असतं नको तिथं धावत सुटतं शहाणं वाट शोधून काढतं योग्य जागी नेऊन सोडतं ! वेडं सतत घाईतच असतं संयमाशी पटतच नसतं शहणं मात्र शांत असतं धिराच फळ त्याला हवं असतं ! वेडं मन हट्टाला पेटतं धगधगत्या श्वासांनी काळीज पेटवतं शहाणं त्याला जवळ घेतं समजूतीच्या ओलाव्याने त्याला शांत करतं !
Taxonomy upgrade extras

माझे उखाणे

लेखक Sona यांनी शुक्रवार, 17/04/2009 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लाल फुल गणपतिला वाहते वाकुन .......आणि......आणि...... चे नाव घेते तुम्च्या सर्वान्चा मान राखुन

सर्वाधिक वेळा पाहिलेले चित्रपट

लेखक मिसळभोक्ता यांनी शुक्रवार, 17/04/2009 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
लोक्स, आपण चित्रपट पहात असालच. काही चित्रपट आवडतात, काही नाही आवडत, खरे की नाय ? पण एखादा चित्रपट आवडला, तर कधी तो पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो !

हेअर डाय आणि हेअर कलर यात फरक काय?

लेखक नितिन थत्ते यांनी शुक्रवार, 17/04/2009 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी पांढरे (पिकलेले) केस काळे करण्यासाठी डाय (कलप) लावण्याची पद्धत होती. हल्ली हेअर डाय आणि हेअर कलर असे दोन प्रकार बाजारात आहेत. दोन्ही गोष्टी एकच आहेत की त्यात काही फरक आहे? जाणकारांनी खुलासा करावा.

सॉक्रेटीस आणि त्याची प्रश्नातुन शिक्षणपद्धत

लेखक अजय भागवत यांनी शुक्रवार, 17/04/2009 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
[खालील लेख भाषांतरीत आहे.] सॉक्रेटीस हा एक थोर शिक्षक गणला जातो. त्याची शिक्षणपद्धत ही हटके होती व तो प्रश्न विचारत-विचारत शिकवे व लोकांकडून उत्तरे मिळवे. "ex duco" चा अर्थ "lead out" होतो जो "education" ह्या शब्दाचा गाभा आहे. उत्तरे "मिळवणे" हे "lead out" किंवा त्यातूनच मार्ग दाखवणे अशा अर्थाने पाहिले तर अशा शिक्षणपद्धतीचे महत्व पटते. आज त्याच्या प्रश्नावलीबाबत आपल्याला जी माहिती आहे ती त्याच्या शिष्योत्तमामुळे. प्लॅटो व ऍरीस्टॉटल हे त्याचे शिष्य होते.

(फोन मेसेज)

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 17/04/2009 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
धनंजयशेठना आलेला फोन मेसेज वाचून आम्हाला मागच्या झुम्म्याला आलेला फोन मेसेज आठवला

फोन मेसेज
! *****!
अरे हलो -
फोन नाहीस उचलत...
म्हणजे झोपला आहेस.
अजून?

उशीर झाला तरी
पाणी गरम कर.
नाहीतर खाशील तशीच
नेहमीसारखी
अंघोळीची गोळी
वास मारेल म्हणून...
! *****!


वादळवारा

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 17/04/2009 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी फोटो काढत होतो तोच अचानक वादळवारा आला व त्यावेळी खेचलेले हे फोटो अंदाजे तासी ६०-७० च्या ही पेक्षा वेगाने वारा वाहत होता, स्थळ : फार्म हाऊस, मानेसर, गुडगांव.

"लक बाय चान्स"

लेखक मुक्तसुनीत यांनी शुक्रवार, 17/04/2009 06:12 या दिवशी प्रकाशित केले.
हा चित्रपट येऊन काही महिने उलटले तरी पहाण्याचा योग कालपर्यंत आला नव्हता. अनेक चित्रपट पाहिले जातात पण थोडेसेच लिहिण्यासारखे असतात. "लक बाय चान्स" हा त्यापैकी एक. डिस्क्लेमर : पुढील काही परिच्छेदांत , चित्रपटाच्या कथानकादि घटकांबद्द्ल माहिती आहे. ज्यांना त्याबद्दल वाचायचे टाळायचे असेल त्यांनी वाचू नये. हा चित्रपट एका होतकरू , चित्रपट-नायक बनू पहाणार्‍या तरुणाच्या - "स्ट्रगल"च्या दिवसांची कहाणी रेखाटतो.

रशियातली शिवजयंती

लेखक चिन्या१९८५ यांनी शुक्रवार, 17/04/2009 03:02 या दिवशी प्रकाशित केले.
गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार यावर्षीही तिथीप्रमाणे शिवजयंती सारातोव्ह्,रशियातील आमच्या होस्टेलमधे करण्याची ५ वर्षांची प्रथा आम्ही चालु ठेवली.१३मार्च२००९ रोजी संध्याकाळी ७ वाजता हा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमात शिवरायांची आरती,त्यांचा संक्षिप्त जीवनक्रम,काही कविता,फत्तेखानाची पुरंदरवरची फजिती आणि शाहिस्तेखानावर हल्ला ही कथाकथने,एक भाषण्,'राजा शिवछत्रपती'चे 'इंद्रजीमी जंबपर' व 'हिंदवी राज्य हे आले' ही गाणी झाली.