Skip to main content

(फोन मेसेज)

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 17/04/2009 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
धनंजयशेठना आलेला फोन मेसेज वाचून आम्हाला मागच्या झुम्म्याला आलेला फोन मेसेज आठवला

फोन मेसेज
! *****!
अरे हलो -
फोन नाहीस उचलत...
म्हणजे झोपला आहेस.
अजून?

उशीर झाला तरी
पाणी गरम कर.
नाहीतर खाशील तशीच
नेहमीसारखी
अंघोळीची गोळी
वास मारेल म्हणून...
! *****!


लेखनविषय:

वाचने 3134
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

खिखिखी.... वास मारणे आणि गोळी खाणे याचा संबंध मात्र मूळ काव्य-आकृतीबंधाच्या विचाराइतकाच गूढ राहिला. अभिनंदन.

प्र. के. अत्रेंची आठवण झाली. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

फोन मेसेज ! *****!
अरे हलो - फोन नाहीस उचलत... म्हणजे पैसे जमले नाहीत. अजून? उशीर झाला तरी पैसे नक्की परत कर. नाहीतर बदलशील फोन नंबर नेहमीसारखा पैसे बुडवायचे म्हणून... ! *****!
आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

मस्त विडंबन! गुर्जींची तैलबुद्धी म्हणजे बिनपाण्याने हजामत-मालीश.

(खुद के साथ बातां : रंगा, गुर्जीनी वर्णिलेला हा आत्मचरित्रात्मक प्रसंग तर नव्हे? :? ) (रोज (अं)घोळ करणारा)चतुरंग

केशवसुमारांना पैकीच्य पैकी मार्क दिले, मराठमोळ्यालाही तितकेच दिले. दोनोभी जबरा ! :)