Skip to main content

माझ पहिल मतदान

लेखक दवबिन्दु यांनी सोमवार, 20/04/2009 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, मी १८ वरषाचा झालो म्हणुन या वरषी पहिलच मतदान करनार आहे. इतर तरुणाप्रमाणे मलापन खुप खुप राज ठाकरे आवडतात. पन मी ठरवल आहे कि लोकसभेसाटी भाजप-सेना आनि विधानसभेसाठी मनसे कारन मनसे हा महाराष्ट्रामधला पक्श आहे तर भाजप-सेना देशपाळतीवरली युती आहे. आमच्या कड मतदानाच्या दिवशी उपास पाळतात. लौकर सकाळी ७ वाजता अंघोळ करुन देवाला नमस्कार करुन कपाळाला गन्ध लावुन नवे कपडे घालुन मतादानासाठी बाहेर पडतात. मग आल्यावर साबुदाना खिचडि आनि दुध-केळ खातो. तुमी लोक त्या दिवशी काय करता.

कंदील २

लेखक आंबोळी यांनी सोमवार, 20/04/2009 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडच्या कंदीलाची कथा तुम्ही पुर्वी वाचली असेलच. गेले ४ -५ वर्षे तो कंदील माळ्यावर कुठे तरी अडगळीत पडला होता. इथे त्याची कथा लिहील्या पासून मलाच त्याच्या विषयी थोडे कुतुहल वाटू लागले होते. दर वेळी सुट्टीत घरी गेलो की तो कंदील माळ्यावरच्या अडगळीत शोधायचे प्रयत्न सुरू होते. पण काही यश येत नव्हते. पण गेल्या आठवड्यात घरी गेलो असता २-३ दिवस नेटाने सगळा माळा धुंडाळला आणि परवा दिवशी (शनिवार) सकाळी एका खोक्यात तो कर्दनकाळ कंदील शांत पहूडलेला दिसला.... माझा आनंद गगनात मावेना... लगेच तो कंदील खाली काढला.

सारेगम ? प !!!

लेखक हेरंब यांनी सोमवार, 20/04/2009 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
इतर ठिकाणी मी लिहिलेल्या लिखाणाचे पुन्हा प्रसिध्दीकरण : - जास्तीतजास्त वाचकांपर्यंत पोचावे म्हणून. पधनीसारे' चा कार्यक्रम सुरू झाला होता. निवेदिका सांगत होती. " हल्लीच्या मुलांना ध,नी आणि वरचा सा हे ठाऊकच नसतं , अशी आमच्यावर टीका होऊ लागली ,म्हणून आम्ही कार्यक्रमाचे फक्त नांव बदलले आहे, बाकी स्वरुप आधीचेच राहील. सध्या आपण ४५ वरच्या वयाच्या स्पर्धकांना संधी देत आहोत. त्यानंतर यातल्या विजेत्या स्पर्धकांना परीक्षक करून आत्ताच्या परीक्षकांची स्पर्धा घेण्याचा विचार आहे." यावर एकही टाळी न पडल्यामुळे निवेदिकेने हक्काने टाळ्या पाडून घेतल्या.

बेत आहे..!

लेखक उपटसुंभ यांनी सोमवार, 20/04/2009 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज थोडेसे चुकीचे वागण्याचा बेत आहे. आज तुजला एकट्याने गाठण्याचा बेत आहे. भेटते मजला पुन्हा ती त्याच त्या वळणावरी का मज कळेना योग हा की गुंतण्याचा बेत आहे. अंगणी माझ्या कशाला कवडशांनी फेर धरला ही तुझी चाहूल की हा चांदण्याचा बेत आहे. टाकली पेटीत जेव्हा मी जराशी जास्त नाणी देव वदला, आज भलते मागण्याचा बेत आहे. एकदा भेटून स्वप्नी एकमेका धीर देऊ की तुझा ढाळीत अश्रू जागण्याचा बेत आहे. रोजच्यासम आज मरणा मी तुझ्या स्वाधीन नाही आज माझाही जरासा झुंजण्याचा बेत आहे. -- अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras

एक रुका हुवा फैसला १९८५ (परिक्षण)

लेखक आंबोळी यांनी सोमवार, 20/04/2009 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
एक रुका हुवा फ़ैसला (१९८५) निर्माता/दिग्दर्शक : बासु चटर्जी साधारण 1 महिन्यापूर्वी बॉस ने “बघच… छान आहे ” असे म्हणून हा चित्रपट दिला. बॉस ने दिला म्हणजे ऑफिसच्या कामापेक्षा महत्वाचे काम समजून आम्ही तो लगेच ऑफिसमधे बसल्या बसल्या संपवला. आणि खरच आवड़ला चित्रपट. एक सुंदर कोर्ट रूम ड्रामा. तांत्रिक सफाई थोड़ी कमी वाटली. त्याच बरोबर एडिटिंग वर अजून काम करायला पाहिजे होते असे वाटत राहिले. विशेषत: प्रसंग जोड़ून घेताना वगैरे.... पण ठीक आहे. बॉलिवूड मधे ८० च्या दशकात असला प्लॉट घेउन छान चित्रपट काढ़ल्या बद्दल निर्माता दिग्दर्शकाला एवढे माफ़ आहे असा विचार करून सोडुन दिले.

सर्व मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण !!!

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी सोमवार, 20/04/2009 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लग्नाची पत्रीका सर्व मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण देतोय लग्न दिनांक ७ मे २००९ गुरुवार ह्या दिवशी आहे

श्रद्धा

लेखक जागु यांनी सोमवार, 20/04/2009 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
जिकडे तिकडे अंधश्रद्धेचे थैमान, कुणा अशुभ कुणा शुभाचे वरदान ! जळी स्थळी भिन्न त्याचे माप, श्रद्धेवर अश्रद्धेने केलेला घात, दुबळ्या मनावर घडलेला अपघात ! मांजर आडवे जाता कर्म बिघाड, वाट पाहतात पिल्ले तिची रस्त्या पार ! घुबडाचे तोंड का असे अपशकून ? पाहून नये का जग तिने जन्म घेऊन ? टिटवीचे ओरडणे मारते कुणा, तिलाही होतच असतील मरण यातना ! पापणीची फडफड धरी स्वतःवरच रोष, देहाच्या त्रीदोषांपैकीच हा एक दोष ! आहे ना थोडी श्रद्धा विधात्यानेच सृष्टी निर्मिल्याची ? जे घडते ते त्याच्याच इशार्‍यांनी सारेच असे शुभ नसे कुणी अपशकूनी श्रद्धेला नेऊन ठेवा उच्च स्थानी .
Taxonomy upgrade extras