कंदील २
लेखनप्रकार
माझ्याकडच्या कंदीलाची कथा तुम्ही पुर्वी वाचली असेलच.
गेले ४ -५ वर्षे तो कंदील माळ्यावर कुठे तरी अडगळीत पडला होता. इथे त्याची कथा लिहील्या पासून मलाच त्याच्या विषयी थोडे कुतुहल वाटू लागले होते. दर वेळी सुट्टीत घरी गेलो की तो कंदील माळ्यावरच्या अडगळीत शोधायचे प्रयत्न सुरू होते. पण काही यश येत नव्हते. पण गेल्या आठवड्यात घरी गेलो असता २-३ दिवस नेटाने सगळा माळा धुंडाळला आणि परवा दिवशी (शनिवार) सकाळी एका खोक्यात तो कर्दनकाळ कंदील शांत पहूडलेला दिसला....
माझा आनंद गगनात मावेना...
लगेच तो कंदील खाली काढला. त्या वर साठलेली ४-५ वर्षाची धूळ / जळमट साफ केली. स्वछ पुसून तो कंदील आणून हॉल मधे ठेवला. नेहमी प्रमाणे बायको आणि आई या वेळीही एक होउन माझ्या नावे शंख करू लागल्या ...
" कशाला काढलाय तो कंदील " .. "आपण तो नदीत सोडूया"... "कुठल्या तरी देवळात देउन टाकूया"... वगैरे वगैर्रे.
"अग पूर्वी घडलेल्या गोष्टी योगायोगाने घडल्या होत्या.... असे कंदील लाउन लोक जायला लागले तर कसे होणार? आणि असा कुठे मंतरलेला आहे हा कंदील? त्या अमुक अमुक नी आपल्या बरोबरच घेतला होता असाच कंदील ... त्यानी तर तो देवघरात लावलाय... रोज चालू करतात ते.... इतका सुंदर शोपीस तुम्ही नदीत कशाला टाकताय? मी मुंबईला घेउन जातो..." इति अस्मादीक.
आणि शेवटी घरातल्या सगळ्याना बोलावून त्या कंदीलाचे समारंभ पूर्वक प्रज्वलन केले. आणि.........................
कंदील छान पेटला... शोकेस मधे अगदी खुलून दिसत होता.. प्रकाशही छान पडला होता... याच्या पलिकडे काहीच झाले नाही.
"जर काही घडले तर तो कंदील मुंबईला न्यायचा नाही." बायकोने सज्जड दम भरला. "काही होत नाही ग... काळजी नको करू" आमची सारवासारवी.
तो दिवस विशेष काहीही न घडता सरला.
दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्यागा भरून गाडीत टाकल्या. बागेतल्या झाडाचे नारळ, कैर्या, आवळे झालेच तर गव्हा तांदळाची बारकी ठिकी यामुळे गाडी आधीच फुल्ल झाली होती. कंदीलाला जागाच उरली नाही. त्यामुळे जड अंतःकरणाने कंदील घेउन जायचा बेत रद्द केला आणि पुढच्या फेरीत नक्की नेउ असे ठरवून गाडीला स्टार्टर मारला.
दुपारी ४ पर्यंत नविमुंबईत घरी पोचलो. चहा वगैरे घेउन निट पोचल्याचे घरी कळवण्यासाठी फोन केला. आम्ही सुखरूप पोचल्याचे कळाल्यावर आई म्हणाली,
"अरे आपला कंदील लागला बरका.... ती आपली अमुक तमुक... तिचे सासरे... तुम्ही गेला होता ना परवा भेटायला.... ते गेले आज सकाळी... तुम्ही इथून बाहेर पडलात आणि ५ मिनीटात फोन आला होता... "
वाचने
11361
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
आयला भेंडी
In reply to आयला भेंडी by आनंदयात्री
कंदिल आला
सुरु झालं पुन्हा सिरियल 'कंदील' किलिंग!
माझा आनंद
इच्चिभनं त्या खंदिलाच्या!
अकंदिलवाद ......
In reply to अकंदिलवाद ...... by अभिज्ञ
प्रबुद्ध मेंदू
In reply to प्रबुद्ध मेंदू by धमाल मुलगा
वृथा वाद?
In reply to वृथा वाद? by अभिज्ञ
काल मी फार
In reply to प्रबुद्ध मेंदू by धमाल मुलगा
अरे काय
तुमच्या
चुचु
In reply to चुचु by पर्नल नेने मराठे
त री च म्हं
काय हो
एकाद्याच्
In reply to एकाद्याच् by भडकमकर मास्तर
मास्तर, मास्तर!
In reply to मास्तर, मास्तर! by चतुरंग
मास्तरा!!!
In reply to एकाद्याच् by भडकमकर मास्तर
हसून हसून
झालं!!
In reply to झालं!! by प्राजु
मानवजातीच
In reply to मानवजातीच by दशानन
एक मिनिट
अर्रे
आंबोळ्या
ओ भौ, का
हा पण
प्रगोने चर्चेत या कथेचा
या दिवाळीत लावून पहा.