Skip to main content

मतदान करायचे तरी कोणाला?

लेखक वेताळ यांनी बुधवार, 22/04/2009 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्र ह्याचा लोकसभेला मतदान करताना ते फक्त राष्ट्रीयपक्षाना करावे हा लेख वाचला. त्यावर आलेल्या आतापर्यतच्या सर्व प्रतिक्रिया देखिल वाचल्या.मतदान करताना फक्त राष्ट्रीय पक्षाना करायचे ठरवले तर एक प्रश्न पडतो आजपर्यत त्याना मतदान केले त्यातुन काय निष्पन्न झाले. तर काहीच नाही.

उपाय सुचवा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 22/04/2009 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आग्रहाखातार मिपावासी झालेल्या आमच्या मित्राला आपण आता चांगलेच ओळखायला लागला आहात. काल आमचे हे मित्रवर्य पुन्हा एकदा त्यांचे दुर्मुखलेले थोबाड घेउन आमच्याकडे हजर झाले. आम्ही :- काय रे नरसाळ्या असा मसणऊद्यागत चेहरा करायला काय झाले ? मित्र :- वेडे वाकडे उडले राव मिपा वाले :( आम्ही :- का ? कसे काय ? मित्र :- एक तेजोभंगावर लेख काय लिहायला घेतला सगळ्यांनी पार टिकास्त्र सोडुन सोडुन तेजोभंग करुन टाकला माझा. बास आता ठरले... ह्या मिपाकर कंपुबाजांना त्राहि भगवन करुन सोडायचे ! उपाय सांग चल...

न्याय दे !

लेखक जागु यांनी बुधवार, 22/04/2009 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
न्याय दे, देवा न्याय दे, स्वर्गाचं उघडून तू दार ये ! गरीब मरतो उपाशी पोटी, धनिक राबतो प्रतिष्ठेसाठी ! तुझी प्रतिष्टा कायम राहू दे, गरीबाच्या पोटाचाही मान राहू दे ! न्याय दे ,देवा न्याय दे, कणा कणात जन्मून तू धाव घे ! अत्याचार मुरलाय जागोजागी, प्रामाणिक मुखवटा चेहर्‍यावरती ! तू आहेस प्रामाणिक दाखवून दे, सज्जनपणाला आता वाव दे ! न्याय दे, देवा न्याय दे, देव्हार्‍याचे माप ओलांडून ये ! लुटारुंच्या घरात सोन्याचा देव, लुटलेला मांडतो नवसाचा खेळ ! नवसाच्या खेळाला न्याय दे, न्यायदेवतेच्या डोळ्यांना
Taxonomy upgrade extras

मी पिंपळ

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 22/04/2009 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी पिंपळ... एक शतक तरी मी उभा आहे.. अलिप्त, नि:संग, एकटा... असंख्य चिमणी पाखरं माझ्या फाद्यांवर बसुन गेली वसंतातील कोकिळ कुंजने.. मी ही मनसोक्त ऐकली.. मी ऐकली प्रेमिकांची लाजरी कुजबुज.. त्यांचे रुसवे फुगवे.. लटकी भांडणे.. अश्रुंचे सांडणे.. समजावणे.. अन गजरा माळणे.. अनेक पांथस्थ , माझ्या सांनिध्यात विसावली. मी ही बनलो , त्यांच्या साठी सावली.. मी पाहिली माणसे , कोलमडलेली.. असंख्य वादळे , मी ही झेलली.. मी आहे अनेक लढ्यांचा , साक्षिदार... अन ऐकल्या गप्पाही , खुमासदार.. पण आता सारच संपलं या गावाचं म्हणे .. शहर झालं... आता पहिल्या सारख , नाही राहिलं
Taxonomy upgrade extras

जेव्हा डोळे पाणावतात.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 22/04/2009 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
मनोहरच्या आणि माझ्या नेहमीप्रमाणे गप्पा चालल्या होत्या. "अलिकडच्या मुलांना शाळा कॉलेजात इतका अभ्यास असतो,की मान वर काढायला वेळ मिळत नाही.कारण तशी समाजात जिकडे तिकडे चूरस चालली आहे.मग लाखोनी शिकणार्‍या मुलांच्या परिक्षेत आणि पुढच्या करिअरमधे तशीच चूरस कायम राहिली तर त्यात नवल काय.?" असं मनोहर मला म्हणाला. मनोहरचं म्हणणं अगदी खरं वाटलं मला.जसजसं जग पुढे चाललं आहे तसतसं बदल हा होतच राहणार.आमच्या वेळेला असं असं होतं म्हणून आताही तसंच असलं पाहिजे हा काही प्रगल्भ विचार म्हणता येणार नाहीत. "आमचे आजी आजोबा आणि आम्ही ह्या मधलं नातं,जवळीक,ह्या गोष्टी त्यावेळच्या त्या समाजाच्या जडणघडणीवर बर्‍याचश्या अवल

पौष्टिक मुगाचे डोसे

लेखक सायली पानसे यांनी बुधवार, 22/04/2009 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य मुगाची डाळ - हिरवी सालासकट येते ती.- २ वाट्या आले - पाउण इंच मिर्च्या - ३-४ ( तिखट आवदत असल्यास जास्त घ्याव्यात.) लसुण - ६-७ कळ्या जिरे- १/२ चमचा मीठ - चविनुसार. कृती डाळ ५-६ तास पाण्यात भिजवुन घ्या... रात्रभर ठेवली तरी चालते. मग त्यातले पाणी काढुन मिक्सर मधे वाटुन घ्या. वाट्ताना त्यात आले मिर्चि लसुण व जिरे घाला. वाटताना थोडे पाणी घाला. आपण डोस्याला करतो तितपत पातळ करावे. चविनुसार मीठ घालुन अर्धातास ठेउन द्यावे. नॉनस्टीक पॅन मधे थोडा थोडा तेल टिश्युपेपर ने लावुन घ्या आणि डोसा करुन घ्या.......बाजुने थोडेसे तेल सोडा.

सत्कार्.....तेव्हढाही.....

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 22/04/2009 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
सत्कार .....तेव्हढाही ..... हाय् ! मी न उरलो , माझाच एव्हढाही सलगीत कुंतलांच्या रहातोय केवडाही ! साथीस शब्द होते , होत्या भणंग गझला सर्वस्व मी उधळले , ज्या हातें.....तोकडाही ! प्रेमातली उधारी बाकी तुझीच होती ; झोळीस पेलला ना व्यवहार रोकडाही ! झालीस दूर जेंव्हा झिडकारुनी मला तू , ओठी न आला शिकवा ना शब्द वाकडाही ! माझ्याच आसवांची व्याप्ती मला कळेना माझा मला नुरावा*अधिकार तेव्हढाही ? * नुरला : न उरला पाहून मला वळताना तू दाबलास जो हुंदका , पचवीन मी स्वतःचा सत्कार तेव्हढाही ! सत्कार्.....सत्कार्.....स्..स्..स्.
Taxonomy upgrade extras

फक्त 'बी'

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 22/04/2009 05:59 या दिवशी प्रकाशित केले.
दहा वाजता ठाणे स्टेशनला उतरलो. आता रिक्षाची कटकट. रात्री दहा वाजता स्टेशनला रिक्षा मिळण्यासाठी 'पुर्वपुण्याई' सुद्धा पुरत नाही. त्यादिवशी काही पुण्यकर्म केले असेल तरच. बाहेर येतो तर ही मोठी लाईन. चालायला सुरु केले. म्ह्टल बघु मधे कुठे मिळाली तर. दहा पावले चाललो नसेन, बाजुला एक रिक्षा उभी राहीली. रिक्षातुन एक चेहेरा डोकावला. "या सर, तुम्हाला सोडतो". लगेच बसलो रिक्षात. "रामवाडी, ना" चेहेरा बोलला. "लुईस वाडी" मी काही हरकत नाही, मी घोड्बंदरला चाललो आहे. माझ्या काही लक्षात येइना. हा कोण ते. मला गप्प बघुन तो म्हणाला, "काय, सर ओळखले नाही का"? " नाही ब्वॉ" मी त्याने खुलासा केला, आणि लक्षात आले.

थंडगार फालुदा

लेखक दिपाली पाटिल यांनी बुधवार, 22/04/2009 04:23 या दिवशी प्रकाशित केले.
इकडे ही ssssssssssss गरमी वाढलीये म्हणून म्हटलं जरा थंड गार फालुदा बनवावा.. वाढणी: ४ साहित्यः १ कप फालुदा शेव १ मोठा चमचा (tbs)सब्जा -- ५-१० मि. पाण्यात भिजवून ठेवणे. २ मोठे चमचे रोज (Rose) सिरप २ कप थंड दुध आइस्क्रिम (कुठले हि चालेल पण वनिला किंवा अमेरिके त एक गुलकंद चे आइस्क्रिम मिळते ते बेस्ट आहे.) नहितर लाइट व्हिप्ड क्रिम पण छान लागते. कृति: थोड्या पाण्यात फालुदा शेव उकडून घ्यावी. अंदाजे ५-७ मि. लागतात. चाळणी त शेव गाळून घ्यावीत.

सौजन्याची ऐशी तैशी...

लेखक शितल यांनी बुधवार, 22/04/2009 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यो आमचा वाडा... या असं हिकडून... वाईच थांबा पर... न्हायी,म्हनलं आमच्या वाड्यामन्दी यायच्या आधी एक गोस्ट इच्चारायची र्‍हायली... तुमच्या आंगी सौजन्य हाये न्हवं? मंग झालं तर... का सांगतुया की... आमच्या वाड्या मन्दी येकून बिर्‍हाडं म्हन्ताल तर खालच्या आंगाला पाच आन वरच्या अंगाला दोन. तुम्हासनी कंच्या आंगाच्या लोकासनी भ्येटायचं हाय त्ये आदुगर कळालं पाईजे म्हंजी म्या तुम्हासनी बराबर न्येतू की नाय त्ये बघा... तर बघा खालच्या आंगाच्या लोकांची गुन-इशेश सांगते... तर ह्ये हाय यकदम कोपर्‍यात राहानारं दिंडोरे कुटुंब... म्हनावं तर पाच माणसंच घरी नवरा बायको आनी दोन ल्येकी आन येक शेंबडा ल्योक...