Skip to main content

खरंच मला बरंच काही करायचाय ...

लेखक अश्विनि३३७९ यांनी शुक्रवार, 24/04/2009 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
खरंच मला बरंच काही करायचायं आयुष्यातला प्रत्येक क्षण न क्षण तुझ्या साथीनी जगायचायं हातात हात गुंफून तुझ्या प्रत्येक स्वप्न पहायचाय !! अगणित चांदण्या मोजत रात्रभर जागायचाय आणि वाळूत रेषा ओढत सुर्यास्त बघायचाय !! प्रणयाला चंन्द्र साक्षीला हवा सोबत तुझी उब आणि हवेतील गारवा !! तुझ्या सोबतीनी मला गरुडा साऱखं उडायचाय मला जाणणारं तुझं मन मात्रा आयुष्यभर जपायचाय खरंच मला बरंच काही करायचायं !!
Taxonomy upgrade extras

मेहूण म्हणून ऍव्हलेबल! :)

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 24/04/2009 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
अवलियाच्या या लेखातील मेहुणाच्या आधुनिक कल्पनेनुसार, मी व माझी एक आवडती स्त्री कुणाकडेही मेहूण म्हणून भोजन झोडायला Available आहोत. कुणाकडे सत्यनारायणाची पूजा वगैरे असल्यास अवश्य कळवण्याचे करावे! :) आपला नम्र, तात्या अभ्यंकर.

डायरी डायरी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 24/04/2009 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्मिळ दुर्मिळ पत्रे जमवण्याचा आमचा छंद आपण जाणताच. अशाच घडामोडीत एक डायरी आमच्या हाताला लागली. काही पाने आहेत काहि नाहीत अशा अवस्थेतली ती डायरी मिपाकराची आहे कळाल्यावर आम्ही अत्यानंदीत झालो. त्या डायरीतील काहि नोंदी आपल्यासाठी. १ जानेवारी :- च्यायला वर्षाच्या सुरुवातीलाच नाट लागला. आमचा नववर्षाच्या शुभेच्छा हा धागा त्या प्रा. डॉ. बिरुटेंनी उडवला. का तर म्हणे एकाच विषयाचे २/३ धागे कशाला ? शुभेच्छा द्याव्या घ्याव्यात तेव्हड्या कमीच हे ह्यांना कधी कळणार ? आणी #$#@$#@$ आम्ही कायम लोकाच्या धाग्यावरच इतरांना शुभेच्छा देत बसायचे होय ? १२ जानेवारी :- गणपतीच्या स्वेटरवरुन रणकंदन माजले.

साय्लेंट मोड

लेखक मितालि यांनी शुक्रवार, 24/04/2009 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्यावर चालत असताना सतत फोनवर बोलणारे काही आनंदि चेहरे आणि पाळीव कुत्र्याला मैत्र बनवलेले काही चेहरे.. प्रत्येकामागे एक कारण असते..प्रत्येकाला सतत बोलायला आणि ऐकायला कुणीतरी हवे असते..

झुणका खाल्ला रे बोरीवलीच्या हाटलामधे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 24/04/2009 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
(विडंबन) आज सकाळी ट्रेड्मीलवर व्यायाम करीत होतो.कानाला इयरबड्स लावून आयपॉडवर हिंदी सिनेमानतली गाणी ऐकत होतो. "झुमका गिरा रे बरेलीके बाजार मे" हे गाणं कानावर पडून मनात दुसरेच शब्द गुणगुणायला लागले "झुणका खाल्ला रे "आणि नंतर त्या मुळ गाण्याचं विडंबन केल्यावाचून मला राहावेना.मग म्हटलं लिहायचंच.लिहिता लिहिता शब्द सुचत गेले.आणि गाणं तयार झालं. झुणका खाल्ला रे हाय झुणका खाल्ला रे बोरीवलीच्या हाटलामधे झुणका खाल्ला झुणका खाल्ला झुणका खाल्ला हाय हाय हाय तिखट झुणका खाल्ला रे सख्या आला नजर चुकवून खोलीत चोरी चोरी म्हणे मला ये भरवतो तुला माझ्या लाडक्या पोरी मी म्हणाले नको करू रे कसली तरी बळजोरी किती विन

शोकांतिका

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 24/04/2009 06:43 या दिवशी प्रकाशित केले.
का वाढत आहे ही दरी कुठे गेली माझी पावसाची परी पैंजणी नादावर नाजुक कमरेवर झुलणार्‍या नागीणींचा झालो होतो मी दास गडगडासकट वाढणार्‍या मेदाच्या मिठीत आज अडकतो आहे श्वास का वाढत आहे दरी कुठे गेली माझी पावसाची परी मादक कटाक्ष तुझे ओढ लावी उरी जड पावलांना का वाटत नाही आज यावेसे घरी खळखणार्‍या हास्याची मिठी छुरी का झाली कापणारी रामपुरी का वाढत आहे दरी कुठे गेली माझी पावसाची दरी
Taxonomy upgrade extras

सवाल-जवाब..मी आणि "II राजे II"

लेखक नाटक्या यांनी शुक्रवार, 24/04/2009 03:02 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, आपले लाडके मिपाकर "II राजे II" यांनी मला खरडीतुन एक कविता पाठवली. तुमचा बार आहे काय जर नसेल बार तर कसे करता तुम्ही कॉकटेल तयार? जळवता आम्हाला फार कळतात नाटक्या तुमची थेरं अपरंपार ! व्हिस्की नसेल तर ज्युस देता करुन तयार तुमच्या लेखामध्ये जिव जडला निरंतर यार ! आता एव्हढे आम्हाला हरभर्‍याच्या झाडावर चढवल्यावर (आम्हाला चढल्यावर नव्हे!!) आम्ही कसले मागे हटतो.

चक्रव्यूह

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 23/04/2009 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
साध्या सोप्या संदर्भांचा अर्थ लावणंही कठीण होतंय भोवळ येईतो फिरत रहाणं, एवढंच हाती राहिलंय का? अज्ञात भविष्याच्या दोरीवरून अधांतरी चालताना मनाचा तोल सावरत रहाणं, एवढंच हाती राहिलंय का? नाचवणारी बोटं कुठली, धागा कुठला, दिसत नाही बाहुल्या होऊन नाचत रहाणं, एवढंच हाती राहिलंय का? अश्वत्थाम्याच्या जखमेसारखा भळभळणारा शापित जन्म जखमा फुलवत हसत रहाणं, एवढंच हाती राहिलंय का? चक्रव्यूहात तडफडणा-या अभिमन्यूच्या अगतिकतेनं दैवाच्या गुंत्यात अडकून जाणं, एवढंच हाती राहिलंय का?

मी वसंत मी वसंत..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 23/04/2009 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
शिशिरी मळभ दूर झाले, उत्तरायणी रवी आले, बेहोषला आसमंत, मी वसंत मी वसंत... खुलते आज कळीकळी, पानोपानी ही झळाळी, भ्रमराला ना आज उसंत, मी वसंत मी वसंत... ध्यान उभे बैराग्याचे, सळसळणारे मन त्याचे, पिंपळाचा श्वास संथ , मी वसंत मी वसंत... आज तयाला भान नुरे, सुवर्णाचे नाजूक तुरे, राजस आम्र उन्मत्त, मी वसंत मी वसंत... धरा होती ती ल्यायली, दाट धुक्याच्या त्या शाली, सुवर्णरेखा ही दिगंत, मी वसंत मी वसंत... तृणांकुराचे हे थवे, आज भासती नवे नवे, पानगळीची उगा खंत, मी वसंत मी वसंत... भरून गेली किल्बिल सारी, विहंगाची उंच भरारी, सृष्टीची ही नशा जिवंत, मी वसंत मी वसंत...

दैव !!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 23/04/2009 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय निखील, कसा आहेस रे ? खुप दिवस झाले, तुला लिहीन , लिहीन म्हणतोय पण सालं लक्षातच राहत नाही ! आताशा फार विसरायला होतं मला. माफ कर मित्रा. तुला आठवतं आपली पहिली भेट झाली होती ती शाळेतल्या "स्मरणशक्ती" च्या परिक्षेच्या वेळी? नेहेमी सहजपणे जिंकणारा तु, यावेळी मात्र बाजी मी मारली होती. पण तु ते स्पोर्टिंगली घेतलंस आणि आपली ओळख झाली. पुढे या ओळखीचं हळु हळु मैत्रीत रुपांतर होत गेलं. ते दिवस कसे सुरेख होते ना ? शाळेत कुठलीही स्पर्धा असली कि आपल्या दोघांत चुरस सुरु व्हायची. मग तु जिंकतो का मी याचे अंदाज इतरांकडुन ऐकायला खुप मजा यायची.