Skip to main content

प्राजक्त

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 08/06/2009 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
झुकली पापणी अन एकवटला देह सारा मौन बरसला प्राजक्त ...........मी वेचलाच नाही! चुंबितो मातीस काळ्या धुंद आषाढ हिरवा मुग्ध मोहरला प्राजक्त ...........मी ऐकलाच नाही! भेदुन गंधाळ धरती डोकावी हिरवी पाती ओघळला सवे प्राजक्त ...........मी पेललाच नाही! संन्यस्त माळ लावतो ध्यान उन्ह सावल्यांचे मुक कोसळला प्राजक्त ...........मी झेललाच नाही! दंवबिंदुंचे हळवे स्पंदन पालवीचे हिरवे रुदन रेंगाळला स्तब्ध प्राजक्त ...........मी माळलाच नाही! विशाल...

रत्नपारखी शिवराय-भाग-१-बाजी पासलकर पुस्तकाचे प्रकाशन

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 08/06/2009 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
तात्या आणि समस्त मिपा कर, सप्रे नमस्कार ! कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो की सदर पुस्तकाचे प्रकाशन काल म्हणजे रविवार दिनांक ७ जून २००९ रोजी ठाणे येथे शुभंकरोती हॉल येथे आमदार आणि ठाणे जिल्ह्याचे शिक्षण पालकमंत्री श्री.संजय केळकर यांच्या हस्ते झाले.सदर पुस्तक हे ३० पानी पुस्तिकाच आहे , हे पहिलेच रत्न आहे !

मिसळपाव ची उद्दिष्टे आणी तत्त्वे काय आहेत

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 08/06/2009 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, हा प्रश्न कुणाला व्यनी किंवा खरड करुन सुटला असता की नाही मला माहित नाही. पण मी इथे का येतो किंवा नकळत मिपाकडे ओढला जातो या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा एक प्रयत्न. मिपा एक सामाजिक संस्था आहे असे मला वाटते. ज्याप्रमाणे एखादी कंपनी पब्लिक लिमिटेड होते तेव्हा ती कुण्या एका व्यक्तीची न राहता लोकांची होते त्याप्रमाणेच एक सामाजिक संस्था कुण्या एका व्यक्तीची न राहता समाजाची होते. (नाहीतर मग तिची अवस्था सत्यम कंपनी सारखी होते.) तर मला समजलेली उद्दिष्टे आणी तत्वे मी मांडत आहे. १. मराठी भाषेचा विकास साधणे २. मराठी बांधवांना एकत्र आणणे. ३. नवकवी/साहित्यिकांना चालना देणे. ४.

हतबल

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 08/06/2009 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एका क्लायंटला भेटायला म्हणुन "द लीला" च्या लॉबीत वाट बघत बसलो होतो. समोरच्या कोचावर एक बापलेक बसले होते. बडी असामी असणार ! पोरगी बापाला म्हणाली "डॅडी, ये बॉयफ्रेंडभी छोडके गया मुझे! " मला धक्काच बसला. ती चक्क पित्याला सांगत होती ही गोष्ट. अजुन मोठा धक्का पुढे होता, बापाची प्रतिक्रिया होती, "सो व्हॉट?". पण आवाज जरी निर्विकार असला तरी डोळे काही वेगळंच सांगत होते. त्याचे डोळे पाहून जे सुचलं ते हे.... डॅड, आय लॉस्ट माय सिक्स्थ बॉयफ़्रेंड! ती थुलथुलीत षोडशा, वैतागलेल्या चेहेर्‍याने, आणि वाढलेल्या पोटाने ..... आपल्या बापाला सांगत होती ! सो व्हॉट डिअर? लिस्ट संपली का तुझी? माझ्या एच.आर.

बाप

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 08/06/2009 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
"सर, तुमचे आय्.टी बद्दल काय मत आहे?" मला एक पालकांनी विचारले. ह्यांच्या चिरंजिवाना १० वी त माझी मदत झाल्याने ९०% मार्क मिळतील अशी खात्री होती. " अहो, रिझल्ट लागु दे मग बघु." मी "मी त्याला आय्.टी डीप्लोमा ला वी.जे.टी.आय ला घालायचे ठरवले आहे. डीप्लोमा करेल आणि मग डीग्री ला जाईल. मग ददात नाही." पालक " हा निर्णय घेताना तुम्ही मुलाला विचारलय का"? मी "त्यात काय विचारायचे, बाप म्हणुन हा निर्णय मी घेतला आहे. आज जरा मंदी आहे म्हणुन आय्.टी डाउन आहे. पण येत्या सहा वर्षात परत वर येईल ह्याची खात्री आहे मला. तुम्हाला काय वाटते? " मी नॉस्ट्रॅडेमस नाही हो.

एजीओजी - मराठीत चॅटींगची सोय

लेखक ॐकार यांनी रविवार, 07/06/2009 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
गमभन मध्ये वापरता असलेल्या भारतीय भाषांमध्ये चॅटींगची सोय एजीओजी.कॉम या संकेतस्थळावर सुरू केली आहे. इथेही गमभन वापरले आहे. ह्याबद्दल अधिक माहिती - http://www.ejioji.com/about/ सदस्यत्व घेण्याकरता - http://www.ejioji.com/register.php प्रवेश - http://www.ejioji.com/ नविन पासवर्ड अथवा पासवर्ड बदलण्याकरता - http://www.ejioji.com/regpass.php संकेतस्थळ नुकतेच सुरू होत आहे.

बडीशोप सरबत

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी रविवार, 07/06/2009 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: १ वाटी बडीशोप ( कच्ची ) , २ वाट्या साखर , मीठ , पाणी. कृती: बडीशोप १ वाटीभर पाण्यात २ तास भिजत ठेवावी , साखर २ वाट्या पाण्यात विरघळवून घ्यावी. बडीशोप मिक्सर मधून वाटून घ्या (पाण्यासकट) पूर्णपणे वस्त्रगाळ करून घ्यावी. मग साखरेच्या पाण्यात मिक्स करावे. आणि सर्व्ह करताना १ भाग मिश्रणात ४ भाग थंड पाणी आणि चवीपुरते मीठ घालून सर्व्ह करावे.

असे पाहुणे येती, आणिक स्मृती ठेऊनी जाती...

लेखक सुबक ठेंगणी यांनी रविवार, 07/06/2009 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
मि. पा च्या मेटामोर्फसिसच्या काळात हा लेख गहाळ झाला होता. तो आता प्रतिक्रियांसकट इथे चिकटवत आहे. आतापर्यंत किडे ही फक्त करायची गोष्ट आहे अशी माझी प्रामाणिक समजूत होती. पण जपानला आल्यावर आपण आजपर्यंत करत आलो त्याला ’किडे करणे’ हे नाव किती सार्थ आहे हे कळून चुकलं एवढे विविध किडे पाहिले. इथल्या माणसांवरून इथल्या किड्यांच्या आकाराची कल्पना कृपया करू नये. म्हणजे इथली माणसं (सुमो सोडल्यास) अगदी सुबक ठेंगणी कॅटेगरीतली असली तरी किडे मात्र गुटगुटीत आणि बाळसेदार असतात. असतात.

काव्य

लेखक केशवसुमार यांनी रविवार, 07/06/2009 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा अजय जोशी यांची रचना प्रेम वाचकाला वाचताना कष्ट झाले पाहिजे त्याचसाठी फक्त.. करता काव्य आले पाहिजे मी लिहावे की नको हा प्रश्न मग उरतो कुठे? अर्थ ओळींचे कशाला ते... कळाले पाहिजे! 'कान' हा पकडू 'नका' अपुलाच पहिल्या वाचनी जाणण्या हे.. काव्य थोडेसे कळाले पाहिजे तेल डोळा घालुनी ते वाचकांना सांगती.. रत्न जाली यायच्या आधी पळाले पाहिजे! मी विडंबन पाडण्याला नेहमी आतूर पण.. चांगले मज.. काव्य एखादे मिळाले पाहिजे! जोडले मी हात "केश्या" काव्य लिहिण्याला तुझ्या... कोपर्‍या पासून मेल्या का जुळाले पाहिजे?