नमस्कार मिपाकरांनो,
हा प्रश्न कुणाला व्यनी किंवा खरड करुन सुटला असता की नाही मला माहित नाही. पण मी इथे का येतो किंवा नकळत मिपाकडे ओढला जातो या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा एक प्रयत्न.
मिपा एक सामाजिक संस्था आहे असे मला वाटते. ज्याप्रमाणे एखादी कंपनी पब्लिक लिमिटेड होते तेव्हा ती कुण्या एका व्यक्तीची न राहता लोकांची होते त्याप्रमाणेच एक सामाजिक संस्था कुण्या एका व्यक्तीची न राहता समाजाची होते. (नाहीतर मग तिची अवस्था सत्यम कंपनी सारखी होते.) तर मला समजलेली उद्दिष्टे आणी तत्वे मी मांडत आहे.
१. मराठी भाषेचा विकास साधणे
२. मराठी बांधवांना एकत्र आणणे.
३. नवकवी/साहित्यिकांना चालना देणे.
४. विविध मुद्द्यांवर चर्चा घडवुन आणणे आणी ज्ञानाचा प्रसार करणे.
५. नवे विचारी/बुद्धीजीवी किंवा चांगले मित्र जोडणे, जेणे करुन एकमेकाला संकटप्रसंगी मदत करता येईल.
ही तत्वे मनात ठेवुन मी मिपाचा सदस्य झालो. माझ्यासारख्या मराठीच्या भुकेल्या माणसाला हे एक वरदानच होते. नव्या गोष्टी समजल्या, काही विचारांना योग्य दिशा मिळाली, कविता, लेख, चर्चा, पाकृ यातुन माझी साहित्यिक/वैचारिक भूक भागवू लागलो.
पण हे करत असताना काही गोष्टी खटकत होत्या/ आहेत.
उदा. एखादा मिपाकर जर काही चुका करत असेल (जसे एका ओळीचे धागे काढणे, निरर्थक कौल काढणे, अर्धवट माहिती देणारा लेख लिहिणे) तर त्याला/तिला प्रतिसादातुन किंवा चार्-पाच जणांनी कोंडीत पकडुन, त्या लेखाचे घाणेरडे विडंबन करु पळवुन लावणे कितपत योग्य आहे? हे सर्व आपले मराठी बांधव वेगवेगळ्या परिस्थितितुन घडले आहेत, प्रत्येकाचे आचार/विचार वेगळे आहेत. आपआपल्या विचारांप्रमाणे प्रत्येकजण वाटचाल करत असतो, त्यात जर काही चुका असतील तर मग त्या व्यक्तीला समजावुन सांगायचे की पळवुन लावायचे आणी त्याची मजा घ्यायची? आपल्या घरातल्या व्यक्तींबरोबर आपण असे वागत नाही मग इथे का?
काही लोक तर स्वत:कडे कोणतेही साहित्यिक दर्जाचे गुण नसताना लोकांचे विचार आणी लेख निरर्थक ठरवुन मोकळे होतात आणी मित्रांच्या जीवावर भरपूर बहुमताने निवडुन येतात. आणी मग बाकीचे मिपाकर जिकडे बहुमत तिकडे आपले मत नोंदवुन मोकळे होतात असे का घडत असावे? (काही सायकॉलॉजी आहे का) मित्र/मैत्रिण आहे म्हणुन त्याने/तिने कितीही चुका केल्या तरी समर्थन का द्यायचे. खरा मित्र तोच जो चुका दाखवून देतो. काही लोक मुद्दाम मराठी शब्द चुकीचा लिहितात (गावरान भाषेत लिहिणे अपवाद), हे जाणुन बुजुन करणे म्हणजे मराठी भाषेचा अवमान आहे असे मला वाटते.
असो बरेच विचार उसळ्या मारत आहेत बाहेर येण्यासाठी, पण इथेच थांबतो.
सर्वाना ज्ञात आहे तरी एक चांगले तत्व म्हणजे "एकमेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ"
मालक व संपादक मंडळास विनंती आहे की हा धागा निरर्थक वाटल्यास अप्रकाशित करावा, तरी इथे मुद्देसुद आणी विचारी प्रतिसाद यावेत अशी अपेक्षा करतो.
आपला,
मराठमोळा
वाचने
8486
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला असे
फु ट लो
In reply to मला असे by अविनाशकुलकर्णी
मिसळपाव बद्दल
In reply to मला असे by अविनाशकुलकर्णी
+१ सहमत
तुम्ही
तुम्ही
तेज्यायला
In reply to तुम्ही by अवलिया
माझे प्रांजळ मत.
In reply to तेज्यायला by परिकथेतील राजकुमार
पण हल्ली
In reply to माझे प्रांजळ मत. by अनंता
पण हल्ली
In reply to माझे प्रांजळ मत. by अनंता
आंतरजाल
In reply to पण हल्ली by बाकरवडी
कोणे-एके काळी अश्याही चर्चा
In reply to तेज्यायला by परिकथेतील राजकुमार
नाना, >>तुम्
In reply to तुम्ही by अवलिया
पण ती
In reply to नाना, >>तुम् by मराठमोळा
>>हम्म,
In reply to पण ती by अवलिया
छे छे धागा
In reply to >>हम्म, by मराठमोळा
मिपाची
:)
In reply to मिपाची by नितिन थत्ते
दिलीपशेटश
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चर्चेत अंशतः सहभाग
स्वभावविशेष
मी चुकी एस्टीत तर चढलो नाही ना?
जवळ जवळ
मिपा,
येक नामी विलाज
तर
वा !! मस्त
In reply to तर by विसोबा खेचर
तात्या, तुम
In reply to तर by विसोबा खेचर
मराठमोळा
In reply to तात्या, तुम by मराठमोळा
+१
In reply to मराठमोळा by Nile
सहमत
In reply to तात्या, तुम by मराठमोळा
भेंडी
In reply to सहमत by चिरोटा
आता कस बोल्ला भेन्डी भाउ
मला मिपा कसा वाटला
ममो, चांगला पण सद्ध्या बिन
अगदी पटण्यासारखे आहेत विचार