Skip to main content

तुमचे स्वागत आहे....

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 15/06/2009 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
तुमचे स्वागत आहे.... खरच, वय काय असते? एक नंबर, १८-२०-४० वर्षे.. मग त्यावरुन ठरते सज्ञान कि अज्ञान मतदान केंव्हा करायचे. लग्नास वय योग्य कि अयोग्य? मरायच वय किति.... वेळ..एक भ्रम आमच्या कडे बघा.. आम्हाला कुठलेच नियम लागु नाहित... बंधन नाहि आम्हाला, वय, वेळ, काळाचे... आम्हि मुक्त आहोत.. या आमच्या दुनियेत... तुमचे स्वागत आहे.... अरे घाबरलात...???हा हा हा... [घाबरुन काय होणार??? आज ना उद्या यावेच लागेल] [आधारित] ------------------------------------------- अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन

ऐसी रत्ने मेळवीन-

लेखक रामदास यांनी सोमवार, 15/06/2009 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या रविवारची सकाळ. सकाळचे सात साडेसात वाजले असावेत. मास्तरांचा फोन आला.

दिल मिले ना मिले...

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 15/06/2009 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
`माणूस पहिल्यांदा कोणता विचार करतो?'... त्यानं मला विचारलं, आणि मी उत्तर न देता त्याच्याकडे बघत राहिलो. त्याच्या प्रश्‍नाचा संदर्भ माझ्या लक्षात येत नव्हता. मी निवडणुकीविषयी बोलत होतो आणि त्यानं अचानक हा प्रश्‍न माझ्यासमोर फेकला होता. `अर्थातच, समाजाचा!'... माझा कोरा चेहरा पाहून त्यानंच काही क्षणानंतर उत्तर दिलं. तरीही माझा चेहरा कोराच होता. इतके दिवस, निवडणुकीचे रागरंग न्याहाळत फिरताना भेटलेली माणसं आपापल्या समस्यांनी त्रासली आहेत, असं मला वाटत होतं. प्रत्येकाच्या समस्या मात्र समान होत्या.

बालमजूर

लेखक जागु यांनी सोमवार, 15/06/2009 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
हाय नशिबा माझी कहाणी बालमजूर मी, बाल्यावस्थेची समाधी बापाची माया लुटली जुगारी मायची मारझोड उघड्या नजरी आक्रंदती काळीज ममतेसाठी ममताही मायची दव्यातच उरली तिन्ही पोटचा मी भार वाही देवही ना प्रसन्न उपाशी पोटी शिक्षण ना चव हलव्याची मालकाच्या लाथा अन तुकडा पदरी कोवळे शरीर चिकटतसे सापळी लाल रक्त जळून भिने काळ्या रंगी खेळ, बागडण्यास ना त्राण अंगी मायच्या जखमेची चिंता सदा उरावरी.
Taxonomy upgrade extras

मी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 15/06/2009 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
मज वाटे धर्म मी संस्कृतीचे मर्म मी कथिले भगवंताने ते वांछित कर्म मी मज वाटे मूळ मी कर्तव्याचे फुल मी टिपलेली धरित्रीने पाचोळ्याची धूळ मी मज वाटे चंद्र मी मार्तंड तो सुर्य मी जपणारे अंध धर्मा आततायी शौर्य मी अस्मितेचा विचार मी अतिरेकी आचार मी जोपासतो मतांधता अभिमानी विकार मी स्वत्व मी, संस्कार मी फसलेला आकार मी सरलेले ते द्वैत सारे उरलो निराकार मी विशाल

काळे प्रणाली

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 15/06/2009 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
काळे प्रणाली जगातल्या बहुतेक इतर कायद्यांप्रमाणे "काळे प्रणालीचा" जन्मसुद्धा ध्यानी-मनी नसताना अचानक "अपघाती"च झाला. पण या प्रणालीची पुढील प्रगती मात्र सद्यकालीन परिस्थिती जगाचा अर्वाचीन इतिहास व बिनतोड युक्तिवाद इत्यादींच्या संशोधनावर व सखोल अभ्यासावर आधारलेली आहे. मुख्य फायदा हा की या प्रणालीची प्रचीती पहाण्यासाठीं फारसे कष्ट करावे लागत नाहीत व प्रचीती नाहीं आली तर पुन्हा "मूळपदा"वरही आरामांत येता येते. काळे प्रणाली थोडक्यांत सांगायची तर " हे जग मिशीवाल्यांचे नाहीं" या चार शब्दांच्या एका वाक्यांत सांगता येईल.

समयाकडून मिळणारा दिव्य दिलासा.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 15/06/2009 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
वनिता शर्मा माझ्या मुलीची शाळकरी मैत्रीण.कॉलेज संपून नंतर लग्न झाल्यावर ह्या मैत्रीणी आपआपल्या निर्माण केलेल्या जगात संसार करायला निघून गेल्या.पण पृथ्वी गोल आहे आणि जग लहान होत चालंय.परवां तिच्या ह्या मैत्रीणीचा फोन आला.घरी मी एकटाच होतो.माझ्या मुलीची तिने चौकशी केली. कुणीतरी तिला पत्ता आणि फोन नंबर दिला होता.

सहजिवनात आली ही .....

लेखक टारझन यांनी सोमवार, 15/06/2009 02:42 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , गोष्ट आहे साधारण नऊ दहा वर्षांपुर्वीची .... दहावीत असेल .. नुकतंच मिसरूड फुटू लागलं होतं ... आणि सारख "कुछ कुछ होता है" असं वाटत होतं .. नक्की काय होतंय का होतंय हे कळायची अक्कल नव्हती .. आणि जरी बडबड्या स्वभाव असला तरी काही गोष्टी कोणाबरोबर बोलण्याची सोय नव्हती .. ते केवळ शारिरीक आकर्षण नव्हतं एवढं खरं .. त्याच्या कितीतरी पुढचं होतं ते .. मन कोणाच्या तरी शोधात होतं .. कोण ? स्वप्नसुंदरी ? त्यावेळी एक मराठी सिनेमा पाहिलेला .. नाव नाही आठवत .. त्यात एक अत्तिशय सुंदर गाणं होतं ..

तुळशीबाग - एक अनुभव

लेखक मराठमोळा यांनी रविवार, 14/06/2009 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख एक पुरुष का लिहितोय असा प्रश्न कदाचित तुम्हाला पड्ला असेल, सांगतो. गेल्या आठवड्यात पण तेच झालं. पुण्याबाहेरचे कुणी पाहुणे घरी आले कि त्यांना पुणेदर्शन करायचे असते. त्यात जर महिलामंडळ असेल तर मग विचारायलाच नको. तुळशीबाग म्हणजे तर अविभाज्य भाग. आणी आमचा रोल ठरलेला - "ड्रायवर".

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ४

लेखक प्रसन्न केसकर यांनी रविवार, 14/06/2009 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.