कार्यबाहुल्या मुळे गेले काही महिने जालावर फारसा वावर करता आला नाही.. आज थोडा निवांत वेळ मिळाला आणि आमच्या गुरुजींना केलेले खोडसाळ
गंड काव्य आमच्या वाचनात आले . ते वाचून आम्हाला ही गंड झाला ..
मी कवी आहे, मला ही कंड आहे
फक्त वृत्ता चा मला हा गंड आहे
'र' पुढे 'ट' ठेवुनी मी रोज लिहितो
पाडला नाही कधी मी खंड आहे!
वाचले तर पाहिजे हे काव्य कोणी
दोनशे कडव्यात लिहिला खंड आहे
चांगल्या मिळती न आता जमीनी
ह्या मुळे धंदा विडंबन थंड आहे
मुक्तछंदालाच आम्ही काव्य म्हणतो